My Favorite Teacher Essay in Marathi : शिक्षक ही अशी व्यक्ती आहे जी ज्ञान, मूल्ये, सद्गुण प्रदान करते आणि शाळेत विद्यार्थ्यांना प्रेरणा देते. एक शिक्षक आपल्या जीवनात गुरु, पालक, शिक्षण प्रशिक्षक, आणि मार्गदर्शक अशा अनेक उल्लेखनीय भूमिका बजावतो आणि आपल्याला जीवनातील यशाचा मार्ग दाखवतो.
येथे, आम्ही “माझा आवडता शिक्षक निबंध” मुलांसाठी आणत आहोत जेणेकरून ते इयत्ता १ ते १२ च्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकावरील My Favorite Teacher Essay In Marathi हा निबंध वाचू शकतील. आम्हाला आशा आहे की माझा आवडता शिक्षक निबंध मराठी हा तुमच्या मुलांना माझ्या आवडत्या शिक्षिकेवर निबंध लिहिण्यास मदत करेल आणि तो/ती त्याच्या/तिच्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करू शकेल.
माझा आवडता शिक्षक निबंध मराठी – My Favorite Teacher Essay in Marathi
Table of Contents
माझा आवडता शिक्षक निबंध १० ओळी – 10 Lines on My Teacher in Marathi
- माझ्या आवडत्या शिक्षिकेचे नाव श्रीमती निकिता आहे.
- ती माझी वर्गशिक्षिका आहे आणि रोज आमची हजेरी घेते.
- तिचे व्यक्तिमत्व कठोर असले तरी ती स्वभावाने खूप काळजी घेणारी आणि दयाळू आहे.
- ती खूप शिस्तप्रिय आणि वक्तशीर आहे आणि नेहमी वेळेवर वर्गात येते.
- ती आम्हाला मराठी विषय शिकवते आणि अनेक मनोरंजक कथा सांगते.
- आम्ही दररोज आमच्या वर्गात येण्यापूर्वी आणि बाहेर जाण्यापूर्वी माझे शिक्षक आम्हाला प्रेमाने आवाज देतात.
- शाळेतील कोणत्याही कार्यक्रमात किंवा स्पर्धेदरम्यान ती आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन करते.
- ती आम्हाला अभ्यास करायला शिकवते आणि आमच्या वर्गमित्रांमध्ये गोष्टी सामायिक करायला शिकवते आणि आम्हाला दररोज खूप गृहपाठ देत नाही.
- ती आम्हाला आमच्या अभ्यासात मदत करते आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी हा एक मनोरंजक शिकण्याचा अनुभव बनवते.
- माझे वर्ग शिक्षक हे मार्गदर्शकासारखे आहेत जे आम्हाला नियमितपणे आमच्या अभ्यासात चांगले करण्यास प्रवृत्त करतात.
माझा आवडता शिक्षक निबंध मराठी – My Favorite Teacher Essay In Marathi
[मुद्दे : वर्गशिक्षक – आवडते शिक्षक – शिकवणे उत्तम – खूप पाठांतर पाठ्यपुस्तकाबाहेरची उदाहरणे – नीटनेटका पोशाख – सुंदर हस्ताक्षर – अन्य उपक्रमांमध्ये सहभाग – सर्वांशी समानतेने वागणे.]
सगळ्या शिक्षकांमध्ये मला आमचे वर्गशिक्षक श्री. देसाई सर खूप आवडतात. आमच्या वर्गातल्या सर्व मुलांचे ते आवडते शिक्षक आहेत.
देसाई सर आम्हांला मराठी आणि इतिहास हे विषय शिकवतात. ते तल्लीन होऊन शिकवतात. त्यांचे शिकवणे आम्हां सर्वांना खूप आवडते. त्यांचे पाठांतर खूप चांगले आहे. कविता शिकवताना पाठ्यपुस्तकाबाहेरची कविताही वर्गात म्हणून दाखवतात. शिकवताना शब्दांच्या गमतीही सांगतात. इतिहास शिकवताना इतिहासातील खूप महत्त्वाचे प्रसंग सांगतात. त्यामुळे ते शिकवत असताना आम्ही गुंग होऊन जातो.
देसाई सरांचा पोशाख नीटनेटका असतो. त्यांचे हस्ताक्षर सुरेख आहे. ते फळ्यावर लिहितात, तेव्हा फळा सुंदर दिसतो. त्यांना वर्गातील सर्व मुलांची नावे पाठ आहेत. ते सर्व उपक्रमांमध्ये आम्हांला मार्गदर्शन करतात. ते सर्वांशी समानतेने वागतात.
माझे आवडते शिक्षक निबंध मराठी लेखन – Maze Avadte Shikshak Nibandh Marathi
लहान मूल एक मातीचा गोळा असते. त्याला आकार देण्याचे काम आई, वडील आणि गुरुवर्य करत असतात. मला माझ्या आईवडिलांप्रमाणेच घडविण्याचे कार्य माझ्या गुरूवर्यांनी केले. ते माझे गुरुवर्य म्हणजे सीताराम पाटील!
मी चौथीच्या वर्गात शिकत होते. त्यावेळी माझ्या आयुष्याला अचानक कलाटणी मिळाली. सीताराम पाटील यांच्या रुपाने ज्ञानाचा नवा खजिनाच सापडला. हरहुन्नरीपणा, शिस्तबद्धता आणि अष्टपैलुत्व लाभलेले शिक्षक सीताराम पाटील आम्हाला मनापासून आवडू लागले. त्यांच्यात लपलेला कलाकार आम्हाला आवडू लागला.
गुरुजींनी भूमितीचा तास चार भिंतीच्या आत कधीच घेतला नाही. अंगणात, शेताच्या बांधावर जाऊन आम्ही भूमितीच्या संकल्पना शिकलो. गुरुजी रामायणातल्या, महाभारतातल्या गोष्टी सांगायला लागले म्हणजे आम्ही त्या गोष्टींतच हरवून जायचो गुरुजींच्या कार्यानुभव, चित्रकला आणि शारीरिक शिक्षणाच्या तासाला कधीच कंटाळा येत नसे. कविता, गाणी साभिनय सादर करायला लागले म्हणजे आम्ही मंत्रमुग्ध होऊन जायचो.
गुरुजींनी शाळेसाठी, माझ्यासाठी, शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खूप कष्ट सोसले. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने घेतली. १९८७ साली भारतातील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळाला. माझ्या गुरुजींना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आणि आम्ही विद्यार्थी धन्य झालो.
माझी वर्गशिक्षिका निबंध मराठी – My Teacher Essay in Marathi
मी पाचवीचा विद्यार्थी आहे. आम्हाला एक वर्गशिक्षिका आहे. त्या खूप सुंदर आणि सुडौल आहेत. त्याचं नाव सरस्वती सहगल आहे. फारच जीव ओतून शिकवतात शिस्तभंग केल्यावर त्या आम्हाला थोडीफार शिक्षा पण करतात. त्या नेहमी हसत राहातात. कधी-कधी आम्हाला त्या फारच रोमाचंक गोष्टी पण सांगतात.
सरस्वती मॅडम अविवाहीत आहेत आणि फारच मनमिळावू आहेत. त्या आम्हाला इंग्रजी शिकवतात. पहिला तास त्यांचाच असतो. सर्वप्रथम त्या आमची हजेरी घेतात. नंतर काय शिकवणार आहेत त्याची कल्पलना देतात. त्यानंतर शिकवायला सुरूवात करतात. त्यांचे अक्षर पण खूप सुंदर आहे. गीत पण त्या खूप फार गोड गातात त्या देखील आमच्यासोबतच शाळेत बसने ये-जा करतात. आम्ही सर्वजण त्यांचा खूप आदर करतो.
मला त्यांच्यापासून खूप प्रेरणा मिळते. मला देखील त्यांच्यासाखं शिक्षक व्हावं वाटतं. शिक्षकाला राष्ट्रनिर्माता म्हटल्या जाते. त्याची अनेक कारणं आहेत. माझे आई-बाबा सरस्वती मॅडमला चांगले ओळखतात. शिक्षक-पालक बैठकीत ते त्यांना भेटतात. त्या पण आईबाबांचं खूप कौतूक करत असतात. मला वाटतं की त्यांनी आमच्या घरी जरूर यावं.
माझे आवडते शिक्षक निबंध इन मराठी – Short Essay on My Favourite Teacher in Marathi
माझ्या वर्गशिक्षिका विजया नाईक आहेत. त्या खूप हुशार आहेत. त्यांचा आवाज अतिशय गोड आहे. त्या कधीच आमच्यावर रागावत नाहीत. त्या आम्हाला छान छान गोष्टी सांगतात.
त्या आम्हाला सतत स्वच्छतेबद्दल सांगतात. अवघड गोष्टी सोप्या करून शिकवतात. त्या गोड आवाजात गाणी व कविता म्हणून दाखवितात. त्या आम्हाला सहलीला घेऊन जातात. त्या म्हणतात, स्मुले म्हणजे देवाघरची फुले. त्यांना मुले खूप आवडतात.
आमचे गुरुजी निबंध मराठी – Majhe Avadte Shikshak Nibandh
मी इयत्ता पाचवीचा विद्यार्थी आहे. श्री. जोशी हे आमचे वर्गशिक्षक आहेत. आमचे गुरुजी सडपातळ व गोरेपान आहेत. त्यांचा चेहरा फार करारी आहे. त्यामुळे त्यांना बघितले की प्रथम थोडीशी भीती वाटते. त्यांचा पोशाख बुशकोट व पॅन्ट असा साधासुधा आहे. त्यांचा स्वभाव प्रेमळ आहे.
आमचे गुरुजी आम्हाला गणित विषय शिकवतात. त्यांचे गणित विषयाचे ज्ञान फार चांगले आहे. विषय सोपा करून शिकवण्याची त्यांची पद्धत फार चांगली आहे. कधी कधी ते. आकड्यांच्या गंमती सांगतात व कोडी घालतात. त्यामुळे गणित ह्या विषयाची आवड निर्माण झाली. अभ्यासाची टाळाटाळ केलेली मात्र त्यांना आवडत नाही. पण सर्व विद्यार्थ्यांवर त्यांचे प्रेम आहे. आमचे जोशी गुरुजी मला फार आवडतात.
माझे वर्गशिक्षक निबंध मराठी – Adarsh Shikshak Nibandh in Marathi
माझ्या वर्गशिक्षिकांचे नाव आहे जया सहस्त्रबुद्धे. त्या खूप चांगल्या आहेत. मी ह्याच वर्षी ह्या शाळेत प्रवेश घेतला त्यामुळे नवी शाळा कशी असेल ह्याचे दडपण माझ्या मनावर आले होते परंतु सहस्त्रबुद्धेबाईंचा हसरा चेहरा पहिल्या दिवशीच पाहिला आणि मनावरचे सगळे दडपण निघून गेले.
बाई खूप प्रेमळ आहेत. त्या सर्व विषय समरस होऊन शिकवतात. आम्हाला गृहपाठही खूप जास्त देत नाहीत.
त्यांचे वर्गातील सर्व मुलांकडे चांगले लक्ष असते. कुणी जास्त दिवस शाळेत आले नाही तर त्यांना काळजी वाटते. आम्हाला त्या अभ्यासक्रमाबाहेरच्या कविता आणि गोष्टीही सांगतात. जी मुले कमी गुण मिळवतात त्यांच्याकडे त्या जास्त लक्ष देतात. त्या मुलांना काय कळत नाही ते समजावून घेतात आणि त्यांना ते पुन्हा पुन्हा समजावून देतात.
शिस्त पाळावी, अक्षर चांगले काढावे, स्वच्छता पाळावी ह्या गोष्टी त्या आम्हाला शिकवतात. माझ्या चांगल्या अक्षराचे बाईंना खूप कौतुक वाटते. मला त्यांनी वगांची मॉनिटर केले आहे.
आमच्या वर्गाच्या हस्तलिखित मासिकाच्या तयारीसाठी आम्ही मुले बाईंच्या घरी गेलो होतो. बाईंचे घरही नीटनेटके आहे.
बाईंचा मला आधार वाटतो. शाळा सोडल्यावरही मी बाईंना कधीही विसरणार नाही.
माझे आवडते शिक्षक या विषयावर निबंध – Maze Avadte Shikshak Nibandh Marathi
मुलांना शाळेत जावेसे वाटण्यासाठी त्यांची वर्गशिक्षिका खूप प्रेमळ असणे फार गरजेचे असते असे मला वाटते. मुले दिवसाचे सहा ते सात तास शाळेत असतात. त्यांच्यावर त्यांच्या वर्गशिक्षिकेचा खूपच प्रभाव पडतो. कित्येक मुले तर शाळेतल्या बाई सांगतील तसेच वागतात. म्हणून मग कधीकधी आईसुद्धा शाळेतल्या बाईंना म्हणते की ,” टीचर, तुम्ही जर ह्याला सांगितले तरच त्याला ते पटेल. माझे काही ऐकतच नाही तो.”
सानेगुरूजींनी म्हटले आहे की ” करील रंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे.” आमच्या वर्गशिक्षिका नाडकर्णीबाई अगदी तशाच आहेत.
त्या आम्हाला अजिबात ओरडत नाहीत किंवा मारतसुद्धा नाहीत. परंतु त्या वर्गात असल्या की आम्हालाच गडबड करावीशी वाटत नाही. त्या आम्हाला मराठी हा विषय शिकवतात. त्यांचे शिकवणे इतके मन लावून असते की अगदी ‘ढ’ तला ‘ढ’ मुलगासुद्धा त्यांच्या तासाला कान देऊन ऐकतो.
त्या आम्हाला फक्त पुस्तकापुरतेच शिकवत नाहीत तर त्याशिवाय त्या आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. कविता म्हणून दाखवतात. आमच्या शाळेत पुस्तकांची पेटी आहे. ही पेटी आठवड्यातून एकदा त्या वर्गात आणतात आणि आम्हा मुलांना त्यातली पुस्तके घरी न्यायला सांगतात. घरी वाचायला नेलेल्या पुस्तकातील काय काय आवडले ह्याबद्दल आम्ही वर्गात चर्चा करतो. आम्हा मुलांना वाचनाची आवड लावण्याचे सगळे श्रेय मी आमच्या नाडकर्णीबाईंनाच देईन.
कुणाला कमी गुण मिळाले किंवा तो नापास झाला तर बाईंना खूप वाईट वाटते. माझे हस्ताक्षर चांगले नव्हते तेव्हा बाईंनी माझ्या मागे लागून लागून माझे अक्षर चांगले घोटून घेतले म्हणूनच ते चांगले झाले आहे. .
वर्गाचे हस्तलिखित मासिक तयार करताना आम्हाला बाईंची खूप मदत झाली. आम्ही त्यांच्या घरी जाऊन मासिकातला मजकुर लिहित होतो. तेव्हा त्यांनी स्वतः बनवलेला लाडू आणि चिवडा आम्हाला खायला दिला होता.
अशा आमच्या वर्गशिक्षिका आम्हाला खूप आवडतात.
माझी वर्गशिक्षिका निबंध मराठी – Essay on Teacher in Marathi
आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये एका वर्गातील विद्यार्थ्यांकडून निरनिराळ्या विषयांचा अभ्यास शिक्षक करवून घेतात. विद्यार्थी त्यामुळे बऱ्याच शिक्षकांच्या संपर्कात येतात. विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या मनावर शिक्षक शिक्षिकांचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. परंतु त्यांचा सर्वात जास्त संबंध आपल्या वर्गशिक्षिकेशी येतो. वर्गशिक्षिका रोज विद्यार्थ्यांची उपस्थिती घेतात. प्रत्येक विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती त्यांना असते.
श्रीमती सरोज जोशी माझ्या वर्गशिक्षिका आहेत. भरपूर उंची असणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या, गोरा रंग, मोठे डोळे, दाट लांब केस असणाऱ्या जोशी बाईंचे वय ३५ वर्षांचे असावे. त्या प्रेमळ आहेत पण बेशिस्त, उद्धट विद्यार्थ्यांना रागावण्यास किंचितही मागेपुढे पाहत नाहीत. त्या आम्हाला संस्कृत शिकवितात. भाषेवर त्यांचे पूर्ण प्रभुत्व आहे. व्याकरण शिकविण्यात त्यांचा हातखंडा आहे. शिकविताना खूप उदाहरणे देतात, त्यामुळे विषय पूर्ण स्पष्ट होतो. श्लोकांचा अर्थ समजावून सांगताना त्याला पर्यायी मराठी कविता सांगतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत अडचणीही त्या सोडवितात. रिकाम्या वेळात जेव्हा इतर शिक्षिका गप्पा मारत बसतात तेव्हा जोशीवाई वया तपासतात किंवा एखादे पुस्तक वा वर्तमानपत्र वाचतात.
आमच्या या वर्गशिक्षिका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संचालिका आहेत. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेण्यास त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात. शाळेत सगळे त्यांना मान देतात. मुख्याध्यापक पण त्यांच्या कामाची प्रशंसा करतात. त्या सुंदर कविता करतात. त्या मासिकात, वर्तमानपत्रात प्रकाशित होतात. त्यांच्या कविता मला अतिशय आवडतात.
त्यांच्या विषयात विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण मिळवितात, इतकेच नव्हे तर प्रावीण्य मिळवून शाळेला गौरव प्राप्त करून देतात. अशा या जोशीबाई मला खूप आवडतात. त्याच्याविषयी मला आदर वाटतो. मी माझ्या या वर्गशिक्षिकेमुळे इतकी प्रभावित झाले आहे की मला शिक्षिका बनण्याचीच इच्छा आहे.
माझा आवडता शिक्षक निबंध – Essay on Teacher in Marathi
मुलांना शाळेत जावेसे वाटण्यासाठी त्यांचे शिक्षक खूप प्रेमळ असणे फार गरजेचे असते असे मला वाटते. कारण मूल जेव्हा घरातून बाहेरच्या जगात जाते तेव्हा सर्वप्रथम ते शाळेत जाते.शाळेतच त्याला बाह्य जगाचे दर्शन घडते. हे दर्शन घडताना आईवडिलांचा हात सुटलेला असतो. अशा वेळेस जर माथ्यावर चांगल्या शिक्षकांचा हात असला तर मूल आपले व्यक्तिमत्व उत्तम घडवू शकते. आम्ही मुले दिवसाचे सहा ते सात तास शाळेत असतो.
आमच्यावर आमच्या शिक्षकांचा खूपच प्रभाव पडतो. कित्येक बालवाडीतील मुले तर शाळेतल्या बाई सांगतील तसेच वागतात. म्हणून मग कधीकधी आईसुद्धा शाळेतल्या बाईंना म्हणते की ,” टीचर, तुम्ही जर ह्याला सांगितले तरच त्याला ते पटेल.माझे काही ऐकतच नाही तो.”
सानेगुरूजींनी म्हटले आहे की ” करील रंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे.” आमचे पाटकर सर अगदी तसेच आहेत.
ते आम्हाला अजिबात ओरडत नाहीत, मारत तर नाहीतच. परंतु ते वर्गात असले की आम्हालाच गडबड करावीशी वाटत नाही. ते आम्हाला गणित हा विषय शिकवतात. त्यांचे शिकवणे इतके मन लावून असते की अगदी ‘ढ’ तला ‘ढ’ मुलगासुद्धा त्यांच्या तासाला कान देऊन ऐकतो.
ते आम्हाला फक्त पुस्तकापुरतेच शिकवत नाहीत तर त्याशिवाय ते आम्हाला वेगवेगळी कोडी घालतात. गणितातील वेगवेगळ्या क्लृप्त्या शिकवतात. काही मुलांना गणित हा विषय खूप कठीण वाटतो. अशा वेळेस ते शाळा सुटल्यावर त्यांचा वेगळा वर्ग घेतात. त्यामुळे सरांबद्दल सर्व मुलांना खूप आदर वाटतो. कित्येक मुले म्हणतात की पाटकर सरांनी आमचे गणित घेतले म्हणून आम्ही ह्या विषयात उत्तीर्ण झालो. शालेय शिक्षण संपल्यावरही मुले सरांकडे जातात आणि आपल्या प्रगतीबद्दल सांगतात तेव्हा सरांना आनंदाने गहिवरून येते.
कुणाला कमी गुण मिळाले किंवा तो नापास झाला तर सरांना खूप वाईट वाटते. सरांना मुलांबद्दल वाटणारी कळकळ आम्हा मुलांच्या काळजाला भिडते म्हणूनच सर आम्हा सर्वांना खूप आवडतात.
म्हणूनच मला वाटते की शिक्षक होण्यासाठी आपला विषय नीट आला पाहिजे हे तर आहेच, पण त्या शिवाय ती व्यक्ती चांगली माणूस असली पाहिजे, तिच्या मनात मुलांविषयी आस्था आणि कळकळ असली पाहिजे. कारण उद्याचे नागरिक घडवण्याचे कार्य ती व्यक्ती करीत असते. आमचे पाटकर सर अगदी असेच आहेत.
माझा आवडता शिक्षक निबंध मराठी लेखन – Essay on Teacher in Marathi
शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता असतो आणि आपल्या भविष्याला दिशा दाखवतो. अध्यापन हा एक उदात्त व्यवसाय आहे. ते आपले शिक्षित करतात आणि एक जबाबदार नागरिक बनण्यास मदत करतात.
मी विद्यार्थी आहे आणि शाळेतील माझ्या आवडत्या शिक्षिका अनिता मॅडम आहेत. त्यांचे पूर्ण नाव अनिता ठक्कर आहे. ती आमची वर्गशिक्षिका आहे आणि आम्हाला इंग्रजी शिकवते. ती खूप गोड, आनंदी आणि दयाळू आहे.
ती खरोखर छान शिकवते. ती शिकवते तेव्हा आम्ही गप्प बसतो. ती खात्री करून घेते की आम्हाला विषय चांगला समजला आहे. आम्हाला कोणताही विषय समजला नाही तर ती पुन्हा खूप छानपणे समजावून सांगते. तिची शिकवण्याची आणि सादरीकरणाची कौशल्ये खरोखर चांगली आहेत. म्हणूनच प्रत्येक अध्याय समजून घेणे सोपे आहे. मी तिचा क्लास कधीच चुकवत नाही.
शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करते आणि चांगल्या सवयी शिकवते. ती कडक पण सुंदर आहे. म्हणूनच आम्ही तिला खूप आवडतो आणि आम्हाला तिच्या वर्गात जायला आवडते.
कधी कधी ती आम्हाला किस्सेही सांगते. कोणत्याही खास प्रसंगी ती आम्हाला केक आणि चॉकलेट देते. आम्ही आमच्या वाढदिवसाला मॅडमसाठी केक देखील आणतो. मागच्या वर्षी आम्ही तिचा वाढदिवसही साजरा केला होता. मी तिला माझे एक रेखाचित्र भेट दिले. ती खरच खुश होती.
प्रत्येक शिक्षक ही राष्ट्राची खरोखरच मोठी संपत्ती आहे. अनिता मॅडम यांनी शिकवल्यामुळे आम्ही खूप भाग्यवान आहोत. आम्हाला आमच्या वर्गशिक्षकाचा अभिमान आहे. तिचे बरेच विद्यार्थी आज यशस्वी आहेत. भविष्यात तिचे यशस्वी विद्यार्थी व्हावे अशी आमची इच्छा आहे.
मला वाटते की सर्वोत्तम शिक्षक ही आपल्यासाठी देवाची देणगी आहे. अनिता मॅडम सारख्या चांगल्या शिक्षिका मिळाल्याबद्दल आम्ही नेहमी देवाचे आभार मानतो.
माझे आवडते शिक्षक या विषयावर निबंध
माणसाचा पहिला गुरू आई आणि दुसरा गुरू शिक्षक. शिक्षक म्हटले की शाळा, वर्ग, खडू, फळा आणि शिस्त आठवतात. आमच्या शाळेतही ह्या सगळ्या बाबी आहेत. पण प्रेम आणि ज्ञान ह्या गोष्टींचा संगम होतो तो आमच्या शाळेत.
आईची माया आणि सानेगुरूजी आठवतात ते आम्हाला आमचे श्री. देसाई सर यांच्यात.
माझे आवडते शिक्षक श्री. देसाई सर यांचा पोशाख अगदी साधा. पण साधी राहणी उच्च विचारसरणी. त्यांच्या मिशा पाहिल्या की शिवाजीमहाराजांसारखे करारी वाटतात ते. शरीरानेही मजबूत आहेत. पण नारळाच्या आतील भागाप्रमाणे ते प्रेमळ, शुद्ध व चांगले आहेत. रागहा शब्दच त्यांच्या कोशात नाही. ते कधीही कोणालाही मारीत नाहीत.
मराठी, हिंदीच्या कविता ते गाताना रफीसारखे वाटतात. तर इतिहास शिकविताना वाटते की खरंच युद्धच चालू आहे. गणितात त्यांची सोपी पद्धत, उदाहरणे, सराव यामुळे गणितासारखा अवघड विषय हातचा मळ वाटतो.
ते खेळ शिकविताना मात्र कडक होऊनच शिकवितात. ते खोखो खूप चांगले खेळतात. त्यांची शिकवण म्हणजे स्सत्य बोला, वेळेचे पालन करा. म्हणजे माणसाची प्रगती होते. म्हणून श्री. देसाई सर मला खूप आवडतात.
पुढे वाचा:
- माझी मायबोली मराठी निबंध
- माझा महाराष्ट्र निबंध मराठी
- माझे आजोळ निबंध मराठी
- स्वतःवर निबंध मराठी
- माझी बहिण निबंध
- माझी बहीण निबंध 10 ओळी
- माझी शाळा मराठी निबंध
- माझी आई निबंध मराठी
- दिवाळी सणाची माहिती मराठीत
- दिवाळी निबंध मराठी
- दिवाळी निबंध मराठी 10 ओळी
- माझे आजोबा निबंध मराठी
- माझी आजी निबंध मराठी
- माझे बाबा निबंध मराठी
- मी पाहिलेला अपघात निबंध
- माझा आवडता खेळ निबंध
- माझा जिवलग मित्र मराठी निबंध
- माझे कुटुंब निबंध मराठी
- शिक्षक दिन निबंध मराठी
- माझी शाळा निबंध 10 ओळी
FAQ: माझा आवडता शिक्षक निबंध
प्रश्न १. मला माझे शिक्षक का आवडतात?
उत्तर- शिक्षक नेहमी हसतमुख आणि विद्यार्थ्यांशी प्रेमळ असतात. त्यांची मैत्रीपूर्ण पद्धत वर्गातील सगळ्यांनाच आवडते. ते खूप छान शिकवतात आणि विषय समजून सांगतात. शिक्षक शिकवण्यात खूप उत्साही असतात आणि जेव्हा आम्ही त्यांना वर्गात प्रश्न विचारतो तेव्हा ते आमच्या सर्व शंका दूर कर
प्रश्न २. आम्ही शिक्षकांचे कौतुक का करतो?
उत्तर- शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी अथक परिश्रम घेतात.
शिक्षक हे सर्जनशीलतेचे अखंड स्त्रोत आहेत.
शिक्षक त्यांच्या विषयातील तज्ञ असतात.
शिक्षक जे करतात त्याबद्दल ते उत्कट असतात.
शिक्षकांचा शिक्षणातील समानतेवर विश्वास आहे.
शिक्षक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पलीकडे जीवनासाठी तयार करतात.