हत्ती हा मोठा प्राणी आहे. हत्ती सर्व जमिनीवरील प्राण्यांमध्ये सर्वात मोठा आहे. ते खूप विश्वासू आणि बुद्धिमान आहेत. आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी हत्तीवरील निबंध प्रदान केला आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही एक निबंध किंवा परिच्छेद निवडू शकता.
माझा आवडता प्राणी हत्ती निबंध – Maza Avadta Prani Hatti Nibandh Marathi
Table of Contents
Set 1 – माझा आवडता प्राणी हत्ती निबंध – Maza Avadta Prani Hatti
हत्ती हा सर्वात शक्तिवान प्राणी आहे. तो जंगलात राहातो. लोक हत्तीला जंगलातून पकडून आणून त्याला पाळीव बनवतात. त्याचा रंग काळा असतो. त्याचे पाय खांबासारखे मजबूत व मोठे असतात. त्याचे कान सुपासारखे असतात. त्याचे डोळे बारीक असतात. त्याची सोंड लांब असते. सोंडेच्या दोन्ही बाजूंना दोन मोठे लांब दांत असतात, त्यांना सुळे म्हणतात.
हत्ती झाडपाला, ऊस, बांबूंचे अंकुर वगैरे खातो. तो शाकाहारी प्राणी आहे. तो सोंडेने मोठमोठे वृक्ष उपटू शकतो. त्याच्या ओरडण्याला चीत्कार असे म्हणतात. हत्ती ओझी व माणसे वाहून नेतो. हस्तिदंत म्हणजे हत्तीचे दांत फार मौल्यवान ठरले आहेत. त्याच्यापासून सुंदर वस्तू तयार करतात. हत्ती काहीसा लहरी असला तरी गरीब स्वभावाचा असतो. आपल्या माहुताच्या आज्ञेत तो राहतो.
Set 2 – माझा आवडता प्राणी हत्ती निबंध – Maza Avadta Prani Hatti
हत्ती हा आपल्याला दिसतो तो सर्कसमध्ये किंवा रस्त्यावर कधी तरी. तसा हत्ती हा रानटी प्राणी आहे. काळा कुट्ट परंतु धष्टपुष्ट व विशाल देहाचा हा प्राणी आहे.
त्याचे पाय खांबासारखे, कान सुपासारखे सतत हलणारे असतात.
चिमुकले डोळे व एक छोटीशी शेपटीही असते. समोर दोन मोठे, पांढऱ्या रंगाचे सुळे आणि एक जाड अशी लांब सोंड असते. याच सोंडेचा तो चारा खाण्यासाठी व पाणी पिण्यासाठी उपयोग करतो. हत्ती कळपात राहतात. हत्तीला सांभाळणाऱ्या माणसाला माहूत म्हणतात. हत्ती वडाच्या फांद्या, गवत आणि ऊसही खातो. काही लोक त्याला पाळतातही.
Set 3 – माझा आवडता प्राणी हत्ती निबंध – Maza Avadta Prani Hatti
[मुद्दे : आवडता प्राणी कोणता? – कोठे भेटतो? त्याच्या सवयी आवड – खाद्यपदार्थ – माणसाला उपयोगी – मृत्यूनंतरही उपयोगी.]
मला सर्व प्राण्यांमध्ये भारदस्त हत्तीच खूप आवडतो!
माझा हा आवडता प्राणी मला कोठे कोठे भेटतो? कधी सर्कसमध्ये, तर कधी प्राणिसंग्रहालयात, तर कधी चित्रांत. कधी कधी रस्त्यावर एखादया मालाची जाहिरात करताना दिसतो. कधी एखादया मिरवणुकीत. दिमाखाने मिरवताना दिसतो.
पूर्वी गजराजाचे स्थान राजवाड्याच्या वा श्रीमंत सरदारांच्या माहूतखान्यात असे. आजही दक्षिण भारतातील अनेक मंदिरांतून हे गजराज देवाच्या सेवेसाठी उपस्थित असतात. म्हैसूरच्या दसऱ्याच्या मिरवणुकीत असे अनेक गजराज वैभवाने मिरवत असतात.
मला हत्ती हा प्राणी विशेष आवडतो तो त्याच्या अवाढव्य देहयष्टीमुळे आणि तितक्याच तल्लख बुद्धिमत्तेमुळे. हत्ती हा पूर्ण शाकाहारी आहे. गवत आणि ऊस हे त्याचे अन्न. पाण्यात डुंबणे आणि आपल्या सहकाऱ्यांसह पाण्यात खेळणे त्याला खूप आवडते. हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे. हा वनातील प्राणी अनेक कामांत माणसांचा मित्र झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या दातांना खूप मागणी असते. असा सदैव आपल्याला उपयोगी पडणारा हा प्राणी मला खूप आवडतो.
Set 4 – माझा आवडता प्राणी हत्ती निबंध – Maza Avadta Prani Hatti
हत्ती हा खूप मोठे प्राणी आहेत . त्यांना चार पाय आहेत जे मोठ्या खांबांसारखे दिसतात. त्यांना दोन कान आहेत जे मोठ्या पंख्यासारखे आहेत. हत्तींच्या शरीराचा एक विशेष भाग असतो जो त्यांची सोंड असतो. याव्यतिरिक्त, त्यांच्याकडे एक लहान शेपटी आहे. नर हत्तीला दोन दात असतात जे खूप लांब असतात आणि त्यांना टस्क म्हणतात.
हत्ती शाकाहारी आहेत आणि पाने, वनस्पती, धान्य, फळे आणि बरेच काही खातात. ते मुख्यतः आफ्रिका आणि आशियामध्ये आढळतात. बहुतेक हत्तींचा रंग राखाडी असतो, तथापि, थायलंडमध्ये त्यांच्याकडे पांढरे हत्ती असतात.
याव्यतिरिक्त, हत्ती हा सर्वात जास्त काळ जगणारा प्राणी आहे ज्याचे सरासरी आयुष्य सुमारे 5-70 वर्षे आहे. पण, आजवरच्या सर्वात वृद्ध हत्तीचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.
शिवाय, ते मुख्यतः जंगलात राहतात परंतु मानवांनी त्यांना प्राणीसंग्रहालय आणि सर्कसमध्ये काम करण्यास भाग पाडले आहे. हत्ती हा सर्वात बुद्धिमान प्राण्यांपैकी एक मानला जातो.
त्याचप्रमाणे, ते खूप आज्ञाधारक आहेत. सहसा, मादी हत्ती गटात राहतात परंतु नर हत्ती एकाकी राहणे पसंत करतात. शिवाय, या वन्य प्राण्याची शिकण्याची क्षमता उत्तम आहे. मानव त्यांचा वापर वाहतूक आणि मनोरंजनासाठी करतात. पृथ्वी आणि मानवजातीसाठी हत्तींना खूप महत्त्व आहे. अशा प्रकारे, निसर्गाच्या चक्रात असंतुलन निर्माण होऊ नये म्हणून आपण त्यांचे संरक्षण केले पाहिजे.
Set 5 – माझा आवडता प्राणी हत्ती निबंध – Elephant Essay in Marathi
हत्ती हा जंगली पशू असला तरी तो खूप बुद्धिमान आणि चाणाक्ष असतो. त्याचा देह अवाढव्य असतो. काळा रंग, खांबासारखे पाय, सुपासारखे कान, बारीक डोळे, दोरीसारखी बारीकशी शेपटी, लांब सोंड आणि तोंडातून बाहेर आलेले सुळे असा हत्तीचा अवतार अगदी बघण्यासारखा असतो.
हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे. तो जंगलात कळप करून राहातो. हत्तीला त्याच्या आकारामुळे निसर्गात फार कुणी शत्रू नाहीत.
हत्ती सर्कशीत खूप चांगले काम करतो. त्याला वेगवेगळ्या कसरती शिकवता येतात. जंगलात लाकडाचे ओंडके वाहाण्याचे कामही हत्तीला देतात. जुन्या काळी सैन्यात हत्तींचे दळ असे. त्या हत्तींच्या पायाखाली येऊन दोन्ही पक्षांतील कितीतरी सैनिक मरत असत. हत्तीच्या पाठीवर अंबारी ठेवली जात असे. त्या अंबारीत राजा बसत असे. हत्तीला सांभाळणा-या माणसाला माहूत म्हणतात. हा माहूत हत्तीची सगळी काळजी घेत असे.
आजकाल फक्त देवस्थानात पाळीव हत्ती असतात, अन्यत्र नाही कारण हत्तीला खायला घालण्याचा खर्च भरमसाट असतो. म्हैसूरच्या जंगलात आणि आसामात खूप हत्ती आहेत. हत्तीचे दात खूप किंमती असतात. पण ते दात काढण्यासाठी हत्तींना मारावे लागते म्हणून त्यावर सरकारने बंदी घातली आहे.
हत्ती हा प्राणी वैभवाचे प्रतिक आहे म्हणून मला तो खूप आवडतो.
Set 6 – माझा आवडता प्राणी हत्ती निबंध – Maza Avadta Prani Hatti
हत्ती एक महाकाय प्राणी आहे. जितका तो दिसायला जाडजूड आणि रूबाबदार आहे, तितकाच तो समजदार पण आहे. त्याची बुद्धी तीव्र असते. त्याच्यावर केलेले उपकार आणि त्यांच्यासोबत केलेला दुर्व्यवहार तो लक्षात ठेवतो.
स्तंभासमान त्याचे चार पाय, नाकाच्या ठिकाणी लांब सोंड आणि सुपासारखे दोन कान असतात. डोळे छोटी-छोटी असतात. त्याची चाल फारच गतीमान असते. तो वेगाने पण धावू शकतो. जंगलातले हत्ती बहुधा कळपाने राहातात. एका कळपात अनेक माद्या, पिल्ले आणि एक मोठा नर असतो.
हत्तीला पिण्यासाठी आणि अंघोळीसाठी खूप पाणी लागतं. म्हणून तो एखादी नदी, तळे आणि डबक्याजवळ रहातो. झाडाची पाने, गवत त्याचा चारा असतो. हत्ती आपल्या खूप उपयोगाचा प्राणी आहे. जुन्या काळात हत्तींचा उपयोग युद्धासाठी देखील केल्या जात होता. सैन्याचा ते अविभाज्य भाग असत. ओझे उचलण्यासाठी देखील त्यांचा उपयोग केला जात असे. शोभेसाठी देखील त्यांचा उपयोग केला जातो. मिरवणूकीत त्यांना चांगले सजवून बसलवलेले असते. मंदिरात त्यांना देवी-देवतांना वाहून नेण्यासाठी उपयोगात आणले जाते.
अनेक पर्यटनस्थळी पर्यटकांना फेरफटका मारून आणण्यासाठी देखील हत्तींना ठेवले जाते. हत्तीवर बसण्यात एक प्रकारची मजा आणि आनंद असतो. त्याच्यावर बसण्याला सवारी म्हणतात. सवारी करणे महाग असते. नर हत्तीचे दात मोठे आणि पुढे आलेले असतात. त्यांना फार किंमत असते. दातांची किंमत खूप असल्यामुळेच काहीजण त्यांची शिकार करतात. हत्तीच्या दातांचे अमूल्य वस्तू बनवतात. आशिया आणि अफ्रिकेत हत्ती आढळतात. आशियाचा हत्ती अफ्रिकेच्या हत्तीपेक्षा उंचीने कमी असतो.
Set 7 – माझा आवडता प्राणी हत्ती निबंध – Maza Avadta Prani Hatti
जगात अनेक प्रकारचे प्राणी आहेत पण सर्वात भक्कम पशू हत्ती होय. हत्ती विशालकाय असतो. त्याला नाकाच्या ठिकाणी एक लांब सोंड असते. सोंडेच्या सहाय्याने तो खातो व पाणी पितो. लाकडाचे ओंडके उचलण्याचे अवजड काम पण करतो. हत्ती मुख्यतः आफ्रिका व आशियात सापडतात. तो शाकाहारी व अतिशय बुद्धीमान प्राणी आहे. जंगलात हत्ती कळप करून राहतात. हत्तीच्या पायाचे तळवे मुलायम असतात. खडबडीत जागेवर जर तो चालला तर त्याच्या पायाला जखमा होतात. म्हणून तो मऊ मातीत वा वाळूत चालतो. हत्तीची चाल माणसापेक्षा जलद असते. जर हत्ती मागे लागला तर त्याच्यापासून सुटका होणे कठीण असते.
अवजड कामे करण्यासाठी हत्तींचा उपयोग केला जातो. हत्तींची शिकार करण्यासाठी त्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर हत्तीच्या उंचीइतका एक खड्डा खोदण्यात येतो. त्याला गवताने झाकले जाते. हत्तींचा कळप जेव्हा तिथून जाते तेव्हा एक तरी हत्ती त्यात पडतोच. मग दोर-काठयांच्या साह्याने हत्तीला बाहेर काढण्यात येते.
प्राचीन काळात राजा हत्तीवर स्वार होऊन युद्धावर आणि शिकारीसाठी जात असे. दक्षिण भारतात आजही उत्सवात हत्तीला सामील करून घेतले जाते. त्याच्याशिवाय उत्सव पूर्ण होत नाही. सर्कशीत हत्ती निरनिराळ्या प्रकारच्या कसरती करून दाखवितो. ओझे वाहून नेण्यासाठी हत्तींचा वापर केला जातो.
हत्तीचे दांत फार किमती असतात. त्यापासून दागिने व गृहसजावटीच्या वस्तू बनवितात. लग्नात वधूला हस्तिदंती बांगड्या घालतात. प्राचीन काळी राजासिंहासनावर हस्तिदंताचे नक्षीकाम केले जात असे. परंतु हस्तीदंतासाठी त्यांची अंदाधुंद शिकार होत आहे. हे थांबायला हवे. त्यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे.
Set 8 – माझा आवडता प्राणी हत्ती निबंध – Maza Avadta Prani Hatti Nibandh Marathi
आजच्या जगातील सर्वात महाकाय प्राणी कुठला असेल तर तो हत्तीच होय. त्याच्या अंगात भरपूर ताकद असतेच पण तो बुद्धिमानही असतो. सोंड हा हत्तीचा अवयव जगातल्या इतर कुठल्याही पशूकडे नाही. ही सोंड वापरून तो अन्न खातो आणि पाणीही पितो. हत्तीशाकाहारी आहे.
तो जंगलात कळप करून राहातो. जगात सर्वत्र हत्ती सापडत नाहीत. आफ्रिका आणि आशिया हेच त्यांचे वस्तीस्थान आहे. लाकडी ओंडक्यांसारख्या अवजड वस्तू उचलून नेण्यासाठी हत्तीचा वापर आजही करण्यात येतो.
हत्तींची शिकार करताना त्यांच्या येण्याजाण्याच्या वाटेवर हत्तीच्या उंचीएवढा खड्डा खणून गवताने झाकून टाकतात. हत्तीचा कळप तिथून जातो तेव्हा एक हत्ती तरी त्यात पडतोच.मगदोर आणि काठ्यांच्या सहाय्याने त्याला बाहेर काढतात.
जुन्या काळी राजेलोकांपाशी हत्ती असत. हत्तीवरच्या अंबारीत स्वार होऊन राजा युद्धावर आणि शिकारीला जात असे. जिंकून आल्यावरच्या विजययात्रेत हत्तीच्या अंबारीत बसलेल्या राजावर त्याचे प्रजाजन फुले उधळीत. हत्तीला सांभाळणा-या सेवकास माहूत म्हणतात. हा माहुत हत्तीची खूप काळजी घेतो. माहूत सांगेल ते हत्ती ऐकतो. जुन्या काळी दिल्या जाणा-या शिक्षांमध्ये ‘हत्तीच्या पायाखाली देणे’ हीसुद्धा एक शिक्षा होती.
आज भारतात प्रामुख्याने आसाम आणि दक्षिण भारत इथे हत्ती सापडतात. तिथल्या धार्मिक उत्सवात आजही हत्तीला सामील करून घेतले जाते. सर्कशीतही हत्तींचा वापर पुष्कळ केला जातो. एवढा अगडबंब हत्ती पण तोही निमूटपणे स्टुलावर उभा राहातो तेव्हा लहान मुलांना खूप हसूयेते.
नर हत्तींना मोठमोठे सुळे असतात त्यांना हस्तिदंत असे म्हणतात. हस्तिदंत खूप किमती असल्यामुळे त्याचा वापर शोभेच्या वस्तूंमध्ये आणि दागिन्यांमध्ये पूर्वी केला जात असे. परंतु हत्तींची अंदाधुंद शिकार केल्यामुळे त्यांची संख्या रोडावली. म्हणूनच भारतात हत्तीच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे.
हत्तीला जंगलात नैसर्गिक शत्रू कुणीच नसतो त्यामुळे म्हातारा झालेला हत्ती उपासमारीनेचजंगलात मरतो. असे आहे हे हत्तीपुराण.
Set 9 – हत्ती विषयी माहिती मराठी निबंध – Elephant Information in Marathi
जगात अनेक प्रकारचे प्राणी आहेत पण सर्वात भक्कम पशू हत्ती होय. हत्ती विशालकाय असतो. त्याला नाकाच्या ठिकाणी एक लांब सोंड असते. जिने तो खातो व पाणी पितो. लाकडावे ओंडके उचलण्याचे अवजड काम पण करतो.
जंगलात हत्ती कळप करून राहतात. जर आपल्या कळपापासून तो दूर गेला तर घाबरून जातो. हत्तींच्या कळपाचे नेतृत्व हत्तीण करते. जर कुणी दुसरा हत्ती नेता बनू इच्छित असेल तर त्याला पहिल्या नेत्याशी झगडावे लागते. जर तो जिंकला तर कळपाचा नेता बनतो व बाकीचे हत्ती त्याच्या मागे मागे जातात.
हत्तीच्या पायाचे तळवे मुलायम असतात. म्हणून खडबडीत जागेवर जर तो चालला तर त्याच्या पायाला जखमा होतात. म्हणून तो मऊ मातीत वा वाळूत चालतो.
हत्तीची चाल माणसापेक्षा जलद असते. जर हत्ती मागे लागला तर त्यापासून सुटका होणे कठीण असते. जर हत्ती मागे लागला तर सरळ मार्गाने धावू नये तर नागमोडी वळणे घेत धावावे. कारण हत्तीला असे पळता येणे कठीण जाते. जर रस्ता उताराचा असेल तर खाली धावत जावे म्हणजे धावण्याची गती वाढते. हत्तीची गती अशा रस्त्यावर वाढत नाही.
हत्तींची शिकार करण्यासाठी हत्तीच्या उंचीइतका एक खड्डा खोदण्यात येतो. त्याला गवताने झाकले जाते. हत्तींचा कळप जेव्हा तिथून जाते तेव्हा एक तरी हत्ती त्यात पडतोच. मग काठीच्या साह्याने हत्तीला बाहेर काढण्यात येते.
असे म्हणतात की हत्तीच्या मस्तकावर मणी असतो, परंतु हा मणी नसतो तर हत्तीच्या मस्तकातून जेव्हा मद स्त्रवतो तेव्हा तो त्याच्या गालाच्या सुरकुत्यांमध्ये गोळा होतो. जेव्हा तो कडक होतो तेव्हा लोक तो काढून घेतात. आणि घासून त्याला विशिष्ट आकार, देतात आणि गळ्यात घालतात. त्यास ‘गजमुक्ता’ असे म्हणतात.
प्राचीन काळात राजा हत्तीवर स्वार होऊन युद्धावर आणि शिकारीसाठी जात असे. दक्षिण भारतात आजही उत्सवात हत्तीला सामील करून घेतले जाते. त्याच्याशिवाय उत्सव पूर्ण होत नाही. सर्कशीत हत्ती निरनिराळ्या प्रकारच्या कसरती करून दाखवितो. ओझे वाहून नेण्यासाठी हत्तीचा वापर केला जाते. असे समजले जाते की, ज्या हत्तीच्या पुढच्या पायाला पाच-पाच बोटे असतात आणि मागच्या पायाला चार चार बोटे असतात तो हत्ती शुभ असतो.
हत्तीचे दात फार किमती असतात. त्यापासून दागिने व गृहसजावटीच्या वस्तू बनवितात. लग्नात वधूला हस्तिदंती बांगड्या घालतात. प्राचीन काळी राजासिंहासनावर हस्तिदंताचे नक्षीकाम केले जालत असे.
जेंव्हा हत्तीच्या गंडस्थळातून मद निघतो तेव्हा तो बेफाम होतो व आवरला जात नाही. माहुताचे म्हणणेसुद्धा तो ऐकत नाही.
काही न खाणाऱ्या हत्तीचे मल-मूत्र औषधासाठी वापरतात. हत्ती पाळणे हे राजाचे काम आहे. सामान्य लोक हत्ती पाळू शकत नाहीत कारण त्याला खायला खूप लागते.
पुढे वाचा:
- माझा आवडता पक्षी पोपट
- पोपट पक्षी माहिती मराठी
- ख्रिसमस नाताळ निबंध मराठी 10 ओळी
- शिवाजी महाराज निबंध मराठी
- माझा आवडता शिक्षक निबंध मराठी
- माझी मायबोली मराठी निबंध
- माझा महाराष्ट्र निबंध मराठी
- माझे आजोळ निबंध मराठी
- स्वतःवर निबंध मराठी
- माझी बहिण निबंध
- माझी बहीण निबंध 10 ओळी
- माझी शाळा मराठी निबंध
- माझी आई निबंध मराठी
- दिवाळी सणाची माहिती मराठीत
- दिवाळी निबंध मराठी
- दिवाळी निबंध मराठी 10 ओळी
- माझे आजोबा निबंध मराठी
- माझी आजी निबंध मराठी
- माझे बाबा निबंध मराठी
- मी पाहिलेला अपघात निबंध
- माझा आवडता खेळ निबंध
- माझा जिवलग मित्र मराठी निबंध
- माझे कुटुंब निबंध मराठी
- शिक्षक दिन निबंध मराठी
- माझी शाळा निबंध 10 ओळी
हत्तीवरील निबंधावरील वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न १. हत्ती महत्त्वाचे का आहेत?
उत्तर- हत्ती केवळ मानवांसाठीच नाही तर वन्यजीव आणि वनस्पतींसाठीही महत्त्वाचे आहेत. ते कोरड्या हंगामात इतर प्राण्यांसाठी पाण्याचे स्त्रोत प्रदान करतात. त्यांच्या खाण्याच्या पद्धतीमुळे नवीन रोपांची वाढ होण्यास मदत होते. ते सवाना परिसंस्थेचे संतुलन राखतात.
प्रश्न २. हत्तींना धोक्यात घालणे हानिकारक का आहे?
उत्तर- मानवी क्रियाकलापांमुळे हत्तींना धोका निर्माण झाला आहे. या प्राण्यांच्या नामशेषामुळे पर्यावरणात गंभीरपणे असंतुलन निर्माण होईल. हा धोका थांबवण्यासाठी आपण पावले उचलली पाहिजेत जेणेकरून ते नामशेष होण्यापासून वाचवता येतील.