Maza Avadta Prani Kutra Nibandh : पाळीव प्राणी खास असतात आणि पाळीव प्राणी जर कुत्रा असेल तर तो त्याच्या मालकासाठी अधिक खास बनतो. याचे कारण असे की आपण कुत्र्यांना जे प्रेम देतो त्याच्या शंभरपट ते परत देतात आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याशी एकनिष्ठ राहतात.

मला माझ्या पाळीव कुत्र्यावर खूप प्रेम आहे. तो घराचे रक्षण करतो, एकनिष्ठ आहे आणि माझ्यावर मनापासून प्रेम करतो. मला त्याच्यासोबत वेळ घालवायला आवडते. मलाच नाही तर माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ते आवडते.

आज मी तुम्हाला माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी मध्ये अनेक लहान मोठे खाली दिले आहेत. त्याचा उपयोग तुम्ही Maza Avadta Prani Kutra निबंध लिहिताना करू शकता.

माझा आवडता प्राणी कुत्रा
माझा आवडता प्राणी कुत्रा

माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी – Maza Avadta Prani Kutra Nibandh

Table of Contents

Set 1 : माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी – Maza Avadta Prani Kutra Nibandh

कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. लोक घराची राखण करण्यासाठी कुत्रा पाळतात. सर्व पाळीव प्राण्यात प्रामाणिकपणा जर शोधायचा असेल तर तो फक्त कुत्रा या प्राण्यातच आढळतो.

शेतकऱ्याकडे, धनगरांकडे एक तरी कुत्रा असतो. आता तर शहरातही लोक हौसेखातर कुत्रा पाळतात. कुत्रा दूध, चपाती, पाव व मांसाहारी पदार्थ खातो. कुत्रा जेव्हा खूश होतो तेव्हा स्वतःची शेपटी हलवितो.

शिकारीसाठी तसेच चोर, दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांना त्याचा उपयोग होतो.

कुत्र्यांचे रंग व आकार वेगवेगळे असतात. कुत्रा शेतकऱ्याच्या घराचे रक्षण करतो. शेतकरी रात्री बिनधास्त झोपतो. पण कुत्रा मात्र रात्रभर जागत असतो व आपल्या धन्याची सेवा करतो.

माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी-Maza Avadta Prani Kutra
माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी

Set 2 : माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी – Maza Avadta Prani Kutra Nibandh

एकदा माझ्या मित्राच्या घरी कुत्रीला तीन पिल्ले झाली. त्यातले एक पिल्लू पांढरेशुभ्र व गुबगुबीत होते. त्याचे डोळे मण्यांसारखे चमकत होते. त्याचे छोटेसे कान ऐटबाज दिसत होते. ते गोड पिल्लू मी घरी आणले.

आम्ही त्याचे नाव मोती ठेवले. घरातल्या सर्वांना मोती फार आवडला. मोती कुई कुईऽ करत सर्व घरभर फिरला. मी त्याच्यासाठी सुंदर पट्टा व साखळी आणली. आई त्याला रोज दूधपोळी देते. शिवाय पावसुद्धा त्याला देते.

आता तो खूप मोठा झाला आहे. मोती खूप हुशार आहे. मी त्याला शिकवतो. आपण हाताचा पंजा पुढे केला की, त्यावर तो आपला पंजा ठेवतो. दूर फेकलेली वस्तू तो तोंडात धरून आणून देतो. मी शाळेत निघालो की नाक्यापर्यंत बरोबर येतो. मोती माझा पक्का दोस्त आहे. तो आमच्या घराचे रक्षण करतो.

Maza Avadta Prani Kutra Nibandh
Maza Avadta Prani Kutra Nibandh

Set 3 : माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी – Maza Avadta Prani Kutra Nibandh

आमचा मोत्या आमच्या घरातील सगळ्यांचाच मित्र आहे. लहान पिल्लू असताना तो आमच्या घरात आला. आता तो मोठा झाला आहे.

आमचा मोत्या फार छान दिसतो. त्याचा रंग पांढरा आहे. त्याच्या कपाळावर, पाठीवर व शेपटीवर काळे ठिपके आहेत. त्याची पावले पूर्णपणे काळी आहेत. त्याची चाल ऐटदार आहे. तो चालताना अधूनमधून जमिनीचा वास घेतो. आम्ही दिलेले काहीही खातो; पण त्याला मांसाहार जास्त आवडतो.

मोत्या नेहमी सावध असतो. तो आमच्या घराचे रक्षण करतो. कोणी अनोळखी माणूस आला की, तो भुंकतो. कधी कधी रात्रीच्या वेळी एखादा प्राणी घराच्या आसपास येतो, त्या वेळी मोत्या भुंकून घर डोक्यावर घेतो. असा हा आमचा मोती मला खूप आवडतो.

पाळीव प्राणी कुत्रा निबंध
पाळीव प्राणी कुत्रा निबंध

Set 3 : माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी – Maza Avadta Prani Kutra Nibandh

माझ्या बाबांना कुत्रा हा प्राणी खूप प्रिय आहे. त्यामुळे आमच्या घरात नेहमी एक-दोन कुत्री पाळलेली असतात. त्यांपैकी एक म्हणजे आमची गोल्डी. मी दुसरीत असताना बाबांनी हे पिलू विकत आणले. त्यामुळे ते माझ्याबरोबरच मोठे झाले आणि माझी खास मैत्रीण बनले.

ही कुत्री आहे आणि ती खास लॅब्रेडॉर जातीची आहे. तिला विकणाऱ्याने तिच्या घराण्याचा सर्व इतिहास व तिची माहिती दिली होती. आमच्या घरी आली, तेव्हा ती फक्त सहा आठवड्यांची होती. पांढरा, सोनेरी असा लोकरीचा गुबगुबीत गुंडा! आजीने तिच्या रंगावरून तिचे ‘गोल्डी’ नाव ठेवले.

पाहता पाहता गोल्डी मोठी झाली. आमच्याकडे येणारे लोक तिचा आकार पाहूनच घाबरतात. ती पूर्ण शाकाहारी आहे. टोमॅटो, काकडी, बटाटे तिला प्रिय. लपवलेली वस्तू शोधून काढण्याचा खेळ तिला आवडतो. ती सर्वांना ‘शेक हॅन्ड’ करते. गाडीत बसून फिरायला जाताना ती फार खूश असते. गोल्डी अतिशय स्वच्छताप्रिय आहे. ती अतिशय प्रेमळ आहे. त्यामुळे नंतर आमच्या घरी आणलेल्या इतर कुत्र्यांवरही ती प्रेम करते. आता ती वृद्ध झाली आहे, पण तिचा रुबाब तसाच टिकून आहे.

Set 4 : माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी – Maza Avadta Prani Kutra Nibandh

कुत्रा हा प्राणी फार इमानदार असतो. तो आपल्या मालकावर खूप प्रेम करतो. घरातली माणसे बाहेरून परत आली की उड्या मारून आणि त्यांचे अंग चाटून तो आपले प्रेम व्यक्त करतो. परंतु अनोळखी माणसांवर मात्र भुंकतो.

पूर्वी जंगलात कुत्र्यांच्या झुंडी असत. परंतु नंतर हा प्राणी माणसाळला. कुत्र्यांच्या वेगवेगळ्या जाती असतात. अगदी बारक्या, केसाळ कुत्र्यापासून ते खूप धिप्पाड कुत्र्यांपर्यंत कुत्र्यांच्या पुष्कळ जाती आहेत.

धनगराला आपल्या मेंढ्यांचे रक्षण करायला कुत्र्याचा फार उपयोग होतो. तसेच घराची राखण करण्यासाठीसुद्धा कुत्र्याचा उपयोग होतो.

काही लोकांना हौस म्हणून कुत्रा पाळायला आवडते. अशा वेळी त्यांची नीट निगा राखावी लागते, त्यांना वेळेवर औषधे द्यावी लागतात, रेबीज हा आजार होऊ नये म्हणून इंजेक्शनही द्यावे लागते.

शिवाजी महाराजांचा एक निष्ठावंत कुत्रा होता. महाराजांच्या निधनानंतर त्यानेही मरण स्वीकारले. रायगडावर त्या कुत्र्याची समाधी आहे.
कुत्र्याला मोत्या, टिप्या, टॉमी अशी नावे ठेवतात. आंधळ्या माणसांनाही कुत्र्यांची खूप मदत होते.

लहान मुलांना कुत्रा खूप आवडतो कारण तो त्यांच्याशी चेंडू खेळतो.

खरोखर, कुत्रा पाळणे म्हणजे लहान मुलाला वाढवण्यासारखेच असते. असा हा कुत्रा मला खूप आवडतो.

my favorite animal dog essay in marathi
My Favorite Animal Dog Essay in Marathi

Set 5 : माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी – Maza Avadta Prani Kutra Nibandh

कुत्रा हा प्राणी सर्वांना माहीत आहे. तो सर्वत्र आढळतो. हा एक पाळीव प्राणि आहे. त्याची उपयोगीता स्वयंसिद्ध आहे. ईमानदारीसाठी कुत्र्याचे उदाहरण दिल्या जाते. कुत्रा तसा फारच समजदार प्राणि आहे. त्याची वास घेण्याची शक्ती तर अदभूत आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी कुत्र्याच्या या गुणाचा उपयोग करून घेतला जातो. पोलिस आणि सैन्याजवळ अशाप्रकारचे कुत्रे असतात त्यांना श्वान असे म्हणतात.

कुत्रा आपल्या मालकासाठी आपला जीव पण देवू शकतो. कुत्र्यांचे अनेक प्रकार आहेत. त्यांचे आकार देखील वेगवेगळे असतात. एखादा कुत्रा सशाप्रकारे छोटा असू शकतो तर दुसरा चित्त्याप्रमाणे मोठा. त्याला चार पाय, एक शेपटी आणि दोन कान, दोन डोळे असतात. त्यांचे पाय चांगलेच मजबूत असतात. तो अतिशय वेगानं धावू शकतो. म्हणून कुत्र्याचा उपयोग शिकार करण्यासाठी केला जातो.

कुत्रा अतिशय सावध, सतर्क, स्फुर्तीदायक आणि स्वामीभक्त असतो. आपल्या घराच्या दृष्टिने कुत्र्याला खूप महत्त्व आहे. कुत्र्याच्या भीतीने लुटारू फिरकत नाहीत. कोणीही अनोळखी व्यक्ती भटकत नाही. थोडासा आवाज किंवा चाहूल लागली तरी कुत्रा मोठ्याने भुंकायला लागतो.

मनुष्य आणि कुत्र्याची मैत्री अतिशय जुनी आहे. कदाचित सर्वप्रथम मानवाने, कुत्र्यालाच पाळीव बनवले असेल आणि आपल्याजवळ ठेवले असावे. जंगली कुत्रे अतिशय खतरनाक असतात. ते मोठ-मोठ्या टोळ्यांनी राहातात. एकत्र मिळून एखाद्या मोठ्या प्राण्याची शिकार करतात. आवारा कुत्रे आपल्यासाठी हानिकारक असतात.

Set 6 : माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी – Maza Avadta Prani Kutra Nibandh

कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. कुत्रा स्वामीभक्त असतो. घरांच्या रक्षणासाठी तो फार उपयोगी आहे. कुत्र्याच्या अनेक जाती असतात. काही कुत्रे फार समजदार असतात. त्यांची गंधसंवेदना फार तीव्र असते. म्हणून पोलिस गुन्हेगारांना पकडण्यासाठी कुत्र्यांची मदत घेतात.

कुत्र्याला चार पाय, दोन डोळे, दोन कान, शेपूट असते. कुत्रे अनेक रंगाचे असतात. त्यांचे आकारही वेगवेगळे असतात. काही सशासारखे लहान व गोजिरवाणे तर काही वाघा एवढे मोठे व मजबूत असतात. अनेक लोक घराच्या राखणीसाठी कुत्रे पाळतात. दारावरची घंटी वाजताच कुत्रे सावध होते. अनोळखी माणसे पाहिली की भुंकू लागते. रात्रीच्या वेळी चोर आले तर त्याच्या भुंकण्याने लोक जागे होतात. मग चोर एक तर पळून जातो किंवा पकडला जातो. काही लोक आवड किंवा हौस म्हणून कुत्रे पाळतात.

कुत्रा जरी उपयोगी प्राणी असला तरी तो पिसाळला की धोकादायक बनतो तो चावला तर इंजेक्शन घेणे अत्यावश्यक असते. असे न केल्यास ज्याला कुत्रे चावले तो पिसाळू शकतो. भटक्या जमातीचे लोक नेहमी आपल्याबरोबर कुत्रे बाळगतात. त्यात शिकारी कुत्रे पण असतात. त्यांचे मालक लहान, जंगली जनावरांची शिकार करताना या कुत्र्यांची मदत घेतात.

कुत्र्याच्या स्वामीभक्तीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. धर्मराजाला स्वर्गापर्यंत घेऊन • जाणारा एक कुत्राच होता. असा हा इमानदार प्राणी माणसाचा खरा मित्र आहे.

Set 7 : माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी – Maza Avadta Prani Kutra Nibandh

कुत्रा हा पण एक पाळीव प्राणी आहे. कुत्रा स्वामीभक्त असतो. तो फार उपयोगी आहे. कुत्र्याच्या अनेक जाती असतात. काही कुत्रे फार समजदार असतात. त्यांची गंधसंवेदना फार तीव्र असते. म्हणून पोलिस गुन्हेगारांना पकण्यासाठी कुत्र्याची मदत घेतात.

कुत्र्याला चार पाय, दोन डोळे, दोन कान, शेपूट असते. कुत्रे अनेक रंगांचे असतात. त्यांचे आकारही वेगवेगळे असतात. काही सशासारखे लहान व गोजिरवाणे तर काही मोठे. श्रीमंत लोक घराच्या राखणीसाठी कुत्रे पाळतात. दारावरची घंटी वाजतात कुत्रे सावध होते. अनोळखी माणसे पाहिली की, भुंकू लागते. रात्रीच्या वेळी चोर आले तर त्याच्या भुंकण्याने लोक जागे होतात मग चोर एक तर पळून जातो किंवा पकडला जातो.

पाळलेल्या कुत्र्यांची देखभाल त्याचे मालक करतात. त्याला साखळीने बांधून ठेवतात. त्याला आंघोळ घालतात, खाऊ घालतात, गल्लीत बेवारशी फिरणाऱ्या कुत्र्यांची संख्याही खूप मोठी असते. हे कुत्रे खाण्यासाठी भटकत असतात. कुठे त्यांना खायला मिळते तर कुठे त्यांना मारून हाकलतात. थंडी, ऊन, पावसात भटकतात. कधी-कधी नगरपालिकेचे लोक अशा कुत्र्यांना पकडून घेऊन जातात.

कुत्रा जरी उपयोगी प्राणी असला तरी तो पिसाळला की धोकादायक बनतो तो चावला तर इंजेक्शन घेणे अत्यावश्यक असते. असे न केल्यास ज्याला कुत्रे चावले तो पिसाळू शकतो.

भटक्या जमातीचे लोक नेहमी आपल्याबरोबर कुत्रे बाळगतात. त्यात शिकारी कुत्रे पण असतात. त्यांचे मालक लहान, जंगली जनावरांची शिकार करताना या कुत्र्यांची मदत घेतात.

कुत्र्याच्या स्वामीभक्तीच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. धर्मराजाला स्वर्गापर्यंत घेऊन जाणारा एक कुत्राच होता. पाळलेल्या तसेच इतर कुत्र्यांपासून सावध राहिले पाहिजे.

Set 9 : माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध मराठी – Maza Avadta Prani Kutra Nibandh

एकदा काय झाले की आमच्या फाटकाबाहेर कुत्र्याचे छोटेसे गोंडस पिल्लू आले. मला ते एवढे आवडले म्हणून सांगू? ते माझ्या पायात येऊन घोटाळू लागले आणि शेपूट हलवत माझ्याकडे पाहू लागले. मी हळूच त्याला उचलले तेव्हा त्याने प्रेमानं गुरगुराट केला. मला वाटले की आपण ह्याला पाळावेच. म्हणून मग मी आईकडे गेलो आणि तिला म्हटले,” आई, तू नाहीतरी म्हणत असतेस ना की आपण एक कुत्रा पाळला पाहिजे म्हणून? मग अनायासे हा कुत्रा आपल्याकडे आला आहे तर तो मी पाळू का?” त्यावर आई म्हणाली,” अरे, हा कुठला कोण रस्त्यावरचा कुत्रा.

आपण चांगला अल्सेशियन नाहीतर जर्मन शेफर्ड असा नामवंत जातीचा कुत्रा बाबांना आणायला सांगू.” पण मला मात्र हा माझा छोटा दोस्तच पसंत होता. मी तिला म्हटलं,” ते काही नाही, आई, मला हाच कुत्रा हवा.” शेवटी आईनं माझं म्हणणं ऐकले. ते पिल्लू अगदी पांढरे शुभ्र होते. त्याच्या कानांवर तांबूस ठिपके होते. म्हणून त्याचं नाव मी ‘मोती’ असे ठेवले.

थोड्याच दिवसात मोती आमच्या घरातल्यांचा फार लाडका झाला. तो पोळी सुद्धा आवडीने खाऊ लागला.

रोज सकाळी मी त्याला समुद्रावर आणि वाडीत फिरायला घेऊन जात असे. माझ्याशी चेंडू खेळायला एक नवा सवंगडी मिळाला. मोतीला आंघोळ अजिबात आवडत नसे. पण मी काय करीत असे की वाडीत फिरताफिरता विहिरीजवळ आलो की पटकन तिथल्या डोणीतून बादलीभर पाणी घेऊन मोतीच्या अंगावर ओतत असे त्यासरशी मोती तिथून एवढा धूम पळत सुटे म्हणून सांगू.

मोती आज्ञाधारक होता. बस म्हटले की बसायचा आणि उठ म्हटले की उठायचा. पण तसे असले तरी तो पडवीत असल्यावर काय बिशाद होती चोराची आमच्या घरात येण्याची?

एकदा घरात साप आला तेव्हा मोतीच्या भुंकण्यामुळेच आम्हाला तो समजला. खिडकीवाटे साप निघून गेला तेव्हा कुठे मोतीचे भुंकणे थांबले.
सध्या मात्र काय झाले आहे की पुढील शिक्षणासाठी मी गाव सोडून पुण्याला आलो आहे आणि मोती मात्र गावाला आईकडेच आहे. माझी आठवण काढून तो सुरूवातीला खूपच अस्वस्थ होता. आता मी दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत घरी गेलो की तो माझ्या अंगावर आनंदाने उड्या मारतो. नाचतच सुटतो अगदी. मी परत जाताना मात्र एवढेस्से तोंड करून पडवीत बसतो. तो त्याचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोरूनदोनतीन दिवस हलतच नाही.

असा आहे माझा लाडका, जीवाभावाचा दोस्त-मोती.

पुढे वाचा:

प्रश्न १. कुत्र्याचे आयुष्य किती असते?

उत्तर – 10 ते 13 वर्षे

प्रश्न २. जर्मन शेफर्डचे कुत्र्याचे आयुष्य किती असते?

उत्तर – 9 ते 13 वर्षे

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

मना घडवी संस्कार मराठी निबंध

“मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”

भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | Bhartatil Vansanpatti Essay Marathi

भारतीय लोकशाही मराठी निबंध | Bhartiya Lokshahi Marathi Nibandh

Leave a Reply