Set 1: दूध निबंध मराठी – Milk Nibandh in Marathi

दूध एक चांगला पेय पदार्थ आहे. तो आमच्या आहाराचा एक आवश्यक भाग आहे. सकाळ-संध्याकाळ एक ग्लास दूध पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. गाय, बकरी, म्हैस, हत्तीण, घोडी, सांडणी, मेंढीचे दूध उपयोगी मानले जाते. त्या-त्या भागात आढळणाऱ्या प्राण्यांपासून मिळणारे दूध आहारात वापरले जाते.

दुधामुळे पोषण होते. लहान थोरांच्या आरोग्यासाठी दूध चांगले. एक ग्लास दूध प्याल्यास आपणास प्रथिने आणि खनिजे मिळतात. योगाभ्यास करणारांनीसुद्धा रोज एक ग्लास दूध घ्यावे. दुधामुळे शरीराची उंची आणि शक्ती वाढते. लहान मुलांनी तर हाडांच्या मजबुतीसाठी दूध घेतलेच पाहिजे. शरीराची प्रतिकारशक्तीसुद्धा दुधामुळे वाढते व चेहऱ्यावर तेज येते.

दुधाचा आहारात निरनिराळ्या प्रकारे उपयोग करता येतो. त्यापासून खीर, पनीर, खवा, दही, ताक, लोणी, तूप, आईस्क्रीम इत्यादी अनेक चवदार पदार्थ बनतात. आता दूध प्लॅस्टिकच्या पिशव्यांत मिळते. हे दूध जंतूविरहित केलेले असते. .

दूध नेहमी गरम करूनच प्याले पाहिजे. त्यामुळे त्यातील जंतू मरतात. काही लोक दूध निरसेच (न तापविता) पितात. बकरीचे दूध फार लवकर पचते. म्हणून गांधीजी बकरीचे दूध पीत असत. आईचे दूध बाळाच्या आरोग्यासाठी चांगले असते. दूध थंड झाल्यावर त्यावर साय येते. रात्री झोपण्यापूर्वी दूध घेतल्यास बद्धकोष्ठाची तक्रार राहत नाही. कच्चे दूध आणि दह्याने केस धुतल्यास केसांची मुळे मजबूत होतात. केस लांब व चमकदार होतात. डोक्यात कोंडा होत नाही.

आजकाल पावडरच्या रूपातही दूध मिळते. ते जास्त काळ टिकते. प्रवासात हे दूध नेण्यास सोपे. पाण्यात दूध पावडर घालून ढवळून गरम केले की दूध तयार. अशा प्रकारे, दुधाचा समावेश आपल्या आहारात करणे आवश्यक आहे.

Set 2: दूध निबंध मराठी – Milk Nibandh in Marathi

दूध हे खरोखरच पृथ्वीवरील अमृत मानले पाहिजे. आपल्या भारतीय संस्कृतीत तर ते पूर्णान्नच मानले जाते. ह्या जगात नवीन बाळ जन्माला येते तेव्हा ते पूर्णपणे आपल्या मातेच्या दुधावरच अवलंबून असते. त्या दुधातून त्याला पोषण मिळते, रोगप्रतिकारक शक्ती मिळते आणि मातेचे प्रेमही मिळते.

मोठ्या लोकांच्याही आहारात दुधाचा समावेश असतोच कारण दूध हे आरोग्या-साठी चांगले असते. रोज एक पेला दूध प्यायले असता शरीराला आवश्यक असलेले कॅल्शियम आणि प्रथिने मिळतात. गाय, म्हैस, शेळी ह्यांच्याकडून आपल्याला दूध मिळते. शेळीचे दूध पचनास हलके असते त्यामुळे गांधीजी नेहमी शेळीचेच दूध पित असत.

दुध आपण नुसतेच पिऊ शकतो किंवा चहा आणि कॉफीतही त्याचा वापर करता येतो. हल्ली सोयाबीनपासूनही दूध तयार केले जाते. दुधापासून दही, ताक, लोणी, तूप, पनीर असे अनेक पदार्थ तर मिळतातच. त्याशिवाय खीर, बासुंदी, रबडी, श्रीखंड, फ्रुट सॅलड, कुल्फी, चॉकलेट आणि आईस्क्रिम अशीही पक्वान्ने आपण तयार करू शकतो. दुधापासूनच तयार झालेल्या खव्यामुळे बर्फी, पेढे, गुलाबजामून, रसगुल्ले आदी गोड पदार्थ बनतात. मात्र सणासुदीच्या काळात त्यात भेसळ होण्याची शक्यता फार वाढते.

हल्ली प्लास्टीकच्या पिशव्यांतून निर्जंतुक केलेले दूध मिळते. त्याला पाश्चरायझेशन असे नाव आहे. पावडरच्या रूपातही दूध उपलब्ध असते. हवे तेव्हा आपण त्यात पाणी घालून दूध बनवू शकतो. वापरण्याच्या दृष्टीने ही पावडर फार सोयीची पडते. हल्ली सहकारी तत्वावर दुधाचे उत्पादन आणि विक्री करणा-या संस्था उदयास आल्या आहेत. अमूल, वारणा, महानंद इत्यादी दूध- उत्पादक संघ शेतक-यांकडून दूध विकत घेतात आणि त्यांच्यावर प्रक्रिया करून ते दूध दूरदूरच्या ठिकाणी पुरवतात. त्यामुळे शेतक-यांनाही दुधाला चांगला भाव मिळतो.

मात्र हल्ली मुंबईसारख्या शहरात काही ठिकाणी पिशवीच्या दुधात भेसळ करणा-या टोळ्या दिसू लागल्या आहेत. त्या दुधाच्या पिशवीतले दूध इंजेक्शनने काढून घेतात आणि त्या जागी पाणी भरतात. त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करता येते. परंतु कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे.

दूध हे खरोखर पृथ्वीवरील अमृत आहे आणि प्रत्येकाने दर रोज त्याचे सेवन केले पाहिजे.

Set 3: दूध निबंध मराठी – Milk Nibandh in Marathi

दूध हे भारतीय संस्कृतीत पूर्णान्न मानले जाते. ह्या जगात जेव्हा नवीन बाळ जन्माला येते तेव्हा ते पूर्णपणे आपल्या मातेच्या दुधावरच अवलंबून असते. त्या दुधातून त्याला पोषण मिळते, रोगप्रतिकारक शक्ती मिळते आणि मातेकडून प्रेमही मिळते.

आपण मोठे झाल्यावरही आपल्या आहारात दुधाचा समावेश असतोच कारण दूध हे आरोग्यासाठी चांगले असते. रोज एक पेला दूध प्यायले असता शरीराला आवश्यक असलेल्या मात्रेत कॅल्शियम आणि प्रथिने मिळतात. दूध आपल्याला गाय, म्हैस, शेळी ह्यांच्याकडून मिळते. शेळीचे दूध पचनास हलके असते त्यामुळे गांधीजी नेहमी शेळीचेच दूध पित असत. दूध आपण नुसतेच पिऊ शकतो किंवा चहा आणि कॉफीतही त्याचा वापर करता येतो. हल्ली सोयाबीनपासूनही दूध तयार केले जाते.

दुधापासून दही, ताक, लोणी, तूप, पनीर असे अनेक पदार्थ तर मिळतातच. त्याशिवाय खीर, बासुंदी, रबडी, श्रीखंड, फ्रुट सॅलड, कुल्फी, चॉकलेट आणि आईस्क्रिम अशीही पक्वान्ने आपण तयार करू शकतो. दुधापासूनच तयार झालेल्या खव्यामुळे बर्फी, पेढे, गुलाबजामून, रसगुल्ले आदी गोड पदार्थ बनतात.

हल्ली प्लास्टीकच्या पिशव्यांतून निर्जंतुक केलेले दूध मिळते. तसेच पावडरच्या रूपातही दूध उपलब्ध असते. जेव्हा हवे तेव्हा आपण त्यात पाणी घालून दूध बनवूशकतो. वापरण्याच्या दृष्टीने ही पावडर फार सोयीची पडते.

हल्ली सहकारी तत्वावर दुधाचे उत्पादन आणि विक्री करणा-या संस्था उदयास आल्या आहेत. अमूल, वारणा, महानंद इत्यादी दूध- उत्पादक संघ शेतकयांकडून दूध विकत घेतात आणि त्यांच्यावर प्रक्रिया करून ते दूध दूरदूरच्या ठिकाणी पुरवतात. त्यामुळे शेतक-यांनाही दुधाला चांगला भाव मिळतो.

मात्र हल्ली मुंबईसारख्या शहरात काही ठिकाणी पिशवीच्या दुधात भेसळ करणा-या टोळ्या दिसू लागल्या आहेत. त्या दुधाच्या पिशवीतले दूध इंजेक्शनने काढून घेतात आणि त्या जागी पाणी भरतात. त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करता येते. परंतु कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. असा आहे दुधाचा महिमा.

दूध निबंध मराठी – Milk Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply