Set 1: दिल्लीची कथा निबंध मराठी
जगातील प्राचीन शहरांपैकी दिल्ली हे एक आहे. त्याची कथा खूप जुनी मनोरंजक आहे. सुरवातीपासूनच दिल्ली शहर घटना आणि इतिहासाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. निश्चितपणे तिचे वय सांगता येणे कठीण आहे. ज्या यमुना नदीच्या तटावर दिल्ली वसली आहे ती यमुना आणि दिल्ली अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. दिल्लीचा अतिप्राचीन इतिहास पांडवांपर्यंत जातो. ही त्यांची राजधानी होती त्यावेळी तिला इंद्रप्रस्थ म्हणत. आज ज्या ठिकाणी जुना किल्ला आहे तेथेच इंद्रप्रस्थ नगरी वसलेली होती.
ज्ञात असलेल्या इतिहासावरून लालकोट आणि रायपिथौरा ही दिल्लीची जुनी नावे होती. ११ व्या शतकात तोमर राजांनी हे शहर वसविले. नंतर ते चौहान राजांच्या अधिपत्याखाली आले. पृथ्वीराज चौहान हा त्यांच्यापैकीच एक प्रसिद्ध राजा होता. महंमद घोरीच्या काळापासून पुढील ९ शतकांपर्यंत दिल्लीवर मुसलमान राजांचे वर्चस्व होते. या सर्व राजांनी आपापल्या ढंगाने दिल्लीला सजविले, नटविले. भव्य प्रचंड किल्ले, महाल, राजधान्या आणि अन्य इमारती उभारल्या. दिल्लीचा प्रसिद्ध कुतुबमिनार इंसवी सन १२०० मध्ये कुतुबशासकांनी बनविला. १३०० मध्ये अल्लाउद्दीन याने येथील प्रसिद्ध, अलाई दरवाजा बनविला होता. अन्य बादशहांनी पण इथे किती तरी इमारती, मशिदी बांधल्या किंवा ज्या होत्या त्यांचा विस्तार केला.
मोगल सम्राट अकबर, जहांगीर आणि शहाजहानने दिल्लीची उपेक्षा केली आणि आग्रा ही आपली राजधानी केली. परंतु लवकरच त्यास दिल्लीत यावे लागले. हा दिल्लीचा एक नवा, सातवा अवतार होता. त्यानेच लाल किल्ला, जामा मशीद आणि अनेक भव्य दरवाजे उभे केले. औरंगजेबाने लाल किल्ल्यात सुंदर मोती मशीद बांधली. चांदनी चौक त्याच काळातील आहे. येथील शीशगंज गुरुद्वारा एक महत्त्वाचे पूजास्थल आणी ऐतिहासिक स्मारक आहे. इथेच जहांगीराच्या सांगण्यावरून गुरू गोविंद सिंगांचे बलिदान झाले.
आजच्या आधुनिक दिल्लीची कथा १७११ पासून सुरू होते. यावेळी इंग्रजांनी आपली राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला आणली. नवी दिल्लीतील भव्य इमारतींची निर्मिती सर एडविन ल्यूटिन्स आणि सर हर्बर्ट बेकरने केली. राष्ट्रपती भवन, सचिवालय, संसद भवन इ. यात मुख्य आहेत. कॅनॉट प्लेस पण त्याच काळात उभारले गेले होते. दिल्ली आजही भारताची राजधानी आहे. संपूर्ण देशाचा श्वास आणि हृदय आहे. राजकीय घडामोडीखरीज शिक्षण, संस्कृती, व्यापाराचेही मुख्य केंद्र आहे. आज दिल्लीची लोकसंख्या एक कोटीपेक्षा जास्त आहे. रोज हजारो देशी विदेशी पर्यटक, व्यापारी, राजकीय मुत्सद्दी पुढारी आणि इतर महत्त्वाचे लोक इथे येतात.
इथे प्रगतो, विकास, शिक्षण, व्यवसाय यासाठी अमर्याद साधने उपलब्ध आहेत. बदलत्या काळानुसार दिल्लीचे रूप ही बदलत आहे. त्यामुळे तिचे सौंदर्य उत्तरोत्तर खुलत जाणार आहे. मेट्रो रेल्वेची निर्मिती आणि उद्योगांना रहिवाशाच्या जागेतून काढले जाणे हा याचाच शुभ संकेत आहे.
Set 2: दिल्लीची कथा निबंध मराठी
जगातील प्राचीन शहरांपैकी दिल्ली हे एक आहे. त्याची कथा खूप जुनी मनोरंजक आहे. सुरवातीपासूनच ती घटना आणि इतिहासाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. निश्चितपणे तिचे वय सांगता येणे शक्त असले तरी कठीण आहे. अनेक उतार-चढ़ाव, उत्थान पतन, क्रांत्या, रक्तपात, उत्सव, राज्याभिषेक दिल्लीने पाहिले आहेत. ज्याचा हिशेब नाही. ज्या यमुना नदीच्या तटावर दिल्ली वसली आहे ती यमुना आणि दिल्ली अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार आहे. दिल्लीचा अतिप्राचीन इतिहास पांडवांपर्यंत जातो. ही त्यांचीराजधानी होती त्यावेळी तिला इंद्रप्रस्थ म्हणत.
आज ज्या ठिकानी जुना किल्ला आहे तेथेच इंद्रप्रस्थ नगरी वसलेली होती. ज्ञात असलेल्या इतिहासावरून लालकोट आणि रायपिथौरा ही दिल्लीची जुनी नावे होती. ११ व्या शतकात तोमर राजांनी हे शहर वसविले. नंतर ते चौहान राजांच्या अधिपत्याखाली आले. पृथ्वीराज चौहान हा त्यांच्यापैकीच एक प्रसिद्ध राजा होता. दिल्ली आणि अजमेर त्याच्या राज्यात होते. तेव्हा दिल्ली फार प्रसिद्ध होते. त्यावेळी उत्तर भारतात कनोज हे दुसरे प्रसिद्ध राज्य होते व जयचंद राजा होता. १७९१ मध्ये महंमद घोरीने दिल्लीवर आक्रमण केले परंतु पृथ्वीराजाच्या सैन्याने त्याला पराजित केले. १७९२ मध्ये त्याने पुन्हा आक्रमण केले यावेळी मात्र पृथ्वीराज हरला.
महंमद घोरीच्या काळापासून पुढील ९ शतकांपर्यंत दिल्लीवर मुसलमान राजांचे वर्चस्व होते. अनुक्रमे गुलामवंश, सुलतान, तुघलक, सय्यद आणि लोधी वंशाचे राज्य होते. या सर्व राजांनी आपापल्या ढंगाने दिल्लीला सजविले, नटविले, भव्य प्रचंड किल्ले, महाल, राजधान्या आणि अन्य इमारती उभारल्या. दिल्लीचा प्रसिद्ध कुतुबमिनार १२०० मध्ये कुतुबशासकांनी तिथे असणाऱ्या अंदाजे २७ हिंदू आणि जैन मंदिरांना पाडून त्याच्या दगड विटांपासून तो बनविला. १३०० मध्ये अल्लाउद्दीन याने येथील प्रसिद्ध, अलाई दरवाजा बनविला होता. अन्य बादशहांनी पण इथे किती तरी इमारती, मशिदी बांधल्या किंवा ज्या होत्या त्यांचा विस्तार केला.
गियासुद्दीन तुघलकाने १३२१ मध्ये आणखी एक दिल्ली वसविली व त्याला तुघलकाबाद हे नाव दिले. जुन्या किल्ल्याचे बांधकाम शेरशहा सुरी आणि हुमायूनच्या काळात झाले. इथेच शेरशहाची शेरमंजिल आणि हुमायूनचे ग्रंथालय होते. हुमायून या ग्रंथालयाच्या पाय-यावरून पडूनच मेला होता. इथून थोड्या अंतरावरच हुमायूनची कबर आहे. दिल्लीला कितीदा तरी परकियांनी लुटले व उद्ध्वस्त केले. तैमूरलंग १३९८ आणि नादिरशहाने १७३९ मध्ये दिल्ली उद्ध्वस्त केली. पण दरवेळी ती पुन्हा नव्या उत्साहाने, ऐश्वर्याने पुनरुज्जीवित झाली.
पहिला मोगल सम्राट अकबर, जहांगीर आणि शहाजहानने दिल्लीची उपेक्षा केली आणि आग्ऱ्याला आपली राजधानी केली. ही उपेक्षा फार काळ चालली नाही. १६३९ मध्ये शहाजहानला दिल्लीत यावे लागले. त्याने जुनी दिल्ली व शहाजहानाबाद वसविले. हा दिल्लीचा एक नवा सातवा अवतार होता. त्यानेच लाल किल्ला, जामा मशीद आणि अनेक भव्य दरवाजे उभे केले. औरंगजेबाने लाल किल्ल्यात सुंदर मोती मशीद बांधली. चांदनी चौक त्याच काळातील आहे. येथील शीशगंज गुरुद्वारा एक महत्त्वाचे पूजास्थल आणी ऐतिहासिक स्मारक आहे. इथेच १६७५ मध्ये जहांगीराच्या सांगण्यावरून गुरू गोंविद सिंगांचे बलिदान झाले.
पुढे वाचा:
- भारताची राजधानी दिल्ली निबंध मराठी
- भारताची राजधानी कोणती आहे
- भारताच्या सीमेवरील देशांची नावे आणि राजधानी
- ताजमहाल निबंध मराठी
- आपले शेजारी देश निबंध मराठी
- दिनदर्शिका निबंध मराठी
- दारूबंदी निबंध मराठी
- गरिबी एक शाप मराठी निबंध
- दप्तराचे मनोगत निबंध मराठी
- घारीचे मनोगत निबंध मराठी
- काश्मीरचे मनोगत निबंध मराठी
- एका समाजसेवकाचे मनोगत मराठी निबंध
- एका वृद्धाचे मनोगत मराठी निबंध
- एका आदिवासीचे मनोगत मराठी निबंध
- घरकाम करणारे आमचे सदाकाका मराठी निबंध
- घड्याळ नसते तर मराठी निबंध
- ग्रीष्म ऋतु मराठी निबंध
- ग्रंथालयाचे मनोगत निबंध मराठी
- ग्रंथप्रदर्शन निबंध मराठी
- ग्रंथ आपले गुरू निबंध मराठी
- गुलाबाच्या फुलाची आत्मकथा
- गांधीजींचे विचार निबंध मराठी