आपले शेजारी देश निबंध मराठी-Aple Shejari Desh Essay in Marathi
आपले शेजारी देश निबंध मराठी-Aple Shejari Desh Essay in Marathi

Set 1: आपले शेजारी देश निबंध मराठी – Aple Shejari Desh Essay in Marathi

एखाद्या देशाला शेजारी देश कसे मिळाले आहेत त्यावर त्या देशाची प्रगती आणि विकास अवलंबून असतो. उदाहरणार्थ, युरोपातील फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड इत्यादी देशांमध्ये सीमेवर मोठ्या संख्येने सैनिक तैनात केलेले नसतात. मुळात हे देश आकाराने लहान आहेत. त्यांची लोकसंख्याही कमीच आहे. शिवाय सर्वात मुख्य मुद्दा म्हणजे दुस-या महायुद्धानंतर त्या सर्वांनी लढाईची भयंकर फळे भोगली आहेत. त्यामुळेच आज त्यांच्यापाशी फारसे सैन्य नाही. देशात निर्माण होणारे सर्व उत्पन्न ते देशाच्या विकासासाठी वापरू शकतात. आशियातही पाहिले तर मलेशिया आणि सिंगापूर इत्यादी देशांनी मागील पन्नास वर्षांच्या काळात समृद्धी मिळवली कारण त्यांना थेट शत्रू कुणी नाही आणि लढायाही कराव्या लागत नाहीत.

त्याविरूद्ध आपल्या देशाला पाकिस्तान आणि चीनसारखे नाठाळ शत्रू मिळाले आहेत. लढाई म्हणजे विनाश असतो. राष्ट्राच्या संपत्तीची ती नासधूस असते. सैन्यावर आणि शस्त्रास्त्रांवर केलेल्या खर्चामुळे जनतेचा विकास करण्यासाठी वापरायचा पैसा अनुत्पादक गोष्टींवर वापरला जातो. स्वातंत्र्य मिळाले तेव्हाचे आपले पंतप्रधान पंडित नेहरू ह्यांना देशाला प्रगतीपथावर नेण्याची इच्छा होती. त्यासाठी सैन्य आणि शस्त्रास्त्रे ह्यासारखा अनुत्पादक खर्च जास्त न करता विकासकामे करावीत अशी त्यांची इच्छा होती. परंतु १९६२ साली चीनने आपल्यावर हल्ला केला. त्यानंतर १९६५ साली आणि १९७१ साली पाकिस्तानशी लढावे लागले.

तसेच १९९९ साली कारगीलची लढाईसुद्धा पाकिस्तानने आपल्यावर लादली. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन आपल्याला आपला लष्करी खर्च सतत वाढता ठेवावा लागतो.गेली काही दहशतवादाचा सुळसुळाट झाला आहे. भारताशी थेट लढाई करणे आपल्याला शक्य नाही हे पाकिस्तानला कळले आहे त्यामुळे काश्मीरमध्ये आणि पंजाबात घुसखोर घुसवण्याची शक्कल तो नेहमीच लढवत असतो. ह्या सर्व कारणांमुळे आपल्याला लष्कराबाबत दक्षच राहावे लागते.

पाकिस्तान आणि चीन वगळता आपले अन्य शेजारी आहेत–नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि काही प्रमाणात अफगाणिस्तान. ह्या बाकीच्या शेजायांशी आपले सौहार्दाचे संबंध आहेत. त्यांना आपण भरपूर मदत करीत असतो.
असे आहेत आपले शेजारी देश.

Set 2: आपले शेजारी देश निबंध मराठी – Aple Shejari Desh Essay in Marathi

भारत एक उपमहाद्वीप असून एक मोठा देश आहे. याच्या सीमा पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, भूतान, नेपाळ आणि चीन या देशांशी मिळतात. भारताचे सर्व शेजारी देशांशी चांगले संबंध आहेत.

भारतापासून ८० किलोमीटर दूर हिंदी महासागरात श्रीलंका हा एक देश आहे. हे एक द्वीप आहे. पूर्वी याला सिलोन म्हणत असत. ४ फेब्रुवारी, १९४८ ला हा देश स्वतंत्र झाला. कोलंबो ही त्याची राजधानी आहे. हा देश बौद्धधर्मी आहे.

भारताच्या पूर्वेला म्यानमार देश आहे. हाच पूर्वीचा ब्रह्मदेश. याची राजधानी रंगून आहे. येथील लोक ब्रह्मी भाषा बोलतात. बौद्ध धर्म येथील प्रमुख धर्म आहे. ४ फेब्रुवारी १९४८ हा देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. येथे तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. येथे लष्करी शासन पद्धती आहे. हा देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. आन सूची या लोकप्रिय नेत्या येथे लोकशाही करव्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.

बांगलादेश हा नवा देशही भारताच्या पूर्वेला आहे. पूर्वी हा पाकिस्तानचाच एक भाग होता. त्याला तेव्हा पूर्व पाकिस्तान म्हणत. १६ डिसेंबर १९७१ ला हा देश स्वतंत्र झाला. त्याला स्वतंत्र करण्यात भारताचे सहकार्य होते. बंगाली येथील प्रमुख भाषा आहे आणि धर्म इस्लाम, बांगला देशाला स्वतंत्र होण्यासाठी कठीण संघर्ष करावा लागला. रवींद्रनाथ टागोरलिखित “आमार सोनार बांगला” हे त्यांचे राष्ट्रगीत आहे. बांगला देश जगातील दुसरे मोठे मुस्लिम राष्ट्र आहे. शेख मुजीबुर रेहमान हे बांगला देशचे पहिले राष्ट्रपती होते.

भूतान हे आपले आणखी एक शेजारी राष्ट्र आहे. पूर्व हिमालयातील हा एक छोटासा देश आहे. पर्वतीय प्रदेशात असल्यामुळे जमीन सुपीक असून घनदाट वने आहेत. थिम्पू ही राजधानी आहे. तर प्रमुख धर्म बौद्ध आहे. जिग्में सिंगे वांगचुक येथील राजा आहे. राजेशाही आणि लोकशाहीचे संमिश्र स्वरूप येथे आहे. तांदूळ येथील प्रमुख पीक आहे.

हिमालयातील नेपाळ हा भारताचा शेजारी देश आहे. याची राजधानी काठमांडू आहे. प्रमुख धर्म बुद्ध तर भाषा नेपाळी आहे. राजेशाही आणि लोकशाहीचे संमिश्र स्वरूप येथे पाहावयास मिळते. येथे सगळीकडे घनदाट जंगले आहेत. पर्यटनातून या देशाला बरीच आर्थिक प्राप्ती होते. जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर नेपाळमध्येच आहे.

चीन भारताचे सर्वात मोठे शेजारी राष्ट्र आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने याचा जगात पहिला क्रमांक असला तरी क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. चिनी ही प्रमुख भाषा तर बिजिंग हे राजधानीचे शहर आहे. येथे लोकशाही असून कम्युनिस्ट सरकार आहे. भारताप्रमाणेच हा कृषिप्रधान देश आहे. तांदूळ, चहा, ऊस ही प्रमुख पिके आहेत. चीन एक विकासशील शक्तिशाली देश आहे.

आपले शेजारी देश निबंध मराठी – Aple Shejari Desh Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply