Set 1: ताजमहाल निबंध मराठी – Taj Mahal Nibandh in Marathi

ताजमहल जगातील सर्वात सुंदर स्मारकापैकी एक आहे. याला जगातील आश्चर्यापैकी एक समजले जाते. जगातील सर्वच देशातील नागरीक त्याला पहायला येतात. भारतात देखील ते आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. संगमरवराने बनलेला ताजमहल प्रेमाची अद्भूत भेट आहे. याचे बांधकाम आणि नक्षीकाम मुग्ध करणारं आहे.

ताजमहल यमुनेच्या किणारी बांधला आहे. आग्रा एक प्राचीन आणि ऐतिहासीक शहर आहे. आपली शान, समृद्धी आणि कलेसाठी नेहमीच प्रसिद्ध राहिलेलं आहे. इथे अनेक ऐतिहासीक भवन आणि इमारती आहे. परंतु प्रसिद्ध आहे तो ताजमहल. मुगल शासक अकबर, जहांगीर आणि शाहजहाने या ठिकाणावरूनच भारतावर राज्य केलं.

याची चार भव्य आणि उंच-उंच मीनार आहेत. ते दूरवरूनच नजरेस पडतात. मुख्य घुमट खूप मोठा आणि भव्य आहे. याच्या बरोबर खाली बेगम मुमताज महल आणि शहंशाह शाहजहां यांची कबर आहे. ताजमहलच्या अंगणात विशाल उद्यान आणि फवारे आहेत. हिरवेगार लुसलुसीत गवत आणि रंगी-बेरंगी फुलांनी ताजमहलची शोभा अधिकच वाढली आहे. जीवनात एकदा तरी ताजमहल पहायला मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे.

Set 2: ताजमहाल निबंध मराठी – Taj Mahal Nibandh in Marathi

जगात एकुण सात आश्चर्ये आहेत आणि ह्या सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आपल्या भारत देशात आहे. ते म्हणजे यमुनाकाठी असलेला ताजमहाल. दिल्लीचा मोगल बादशहा शहाजहान आणि त्याची आवडती बेगम मुमताझ महल ह्यांच्यातील प्रेमाची कहाणी हा ताजमहाल सांगतो. आग्रा येथे वसलेला हा ताजमहाल म्हणजे भारतीय आणि विदेशी पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण केंद्रच आहे. मोगल काळात मुमताझ बेगम ही शहाजहानची आवडती राणी होती. तिच्या मृत्यूनंतर दुःखी झालेल्या शहाजहानने ताजमहालच्या रूपाने तिचे स्मारक उभारले आणि त्या जागी तिचे दफन केले.

त्या काळात त्याने आपली राजधानी दिल्ली येथून आग्र्याला हलवली होती. म्हणूनच त्याने आग्रा येथे यमुना नदीच्या उजव्या किना-यावर ही भव्यसुंदर इमारत बांधली. इ.स. १६४८ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. राजस्थानच्या खाणींतून शुभ्रपांढरे संगमरवर त्यासाठी आणण्यात आले होते. ह्या इमारतीचे बांधकाम जवळजवळ वीस वर्षे चालू होते. वीस हजार कारागीरांनी आणि मजुरांनी तिथे काम केले. त्या काळात अवजड वस्तू उचलण्याची यंत्रसामुग्री वगैरे काहीही हाताशी नसताना हे काम करण्यात आले हे विशेष होय. भारतातील स्थापत्य कला त्या काळात किती प्रगत होती ते त्यावरून समजते.

आग्र्याच्या किल्ल्याहून तीन किलोमीटर अंतरावर ताजमहाल आहे. ह्याच्या भव्य दारांच्या दोन्ही बाजूंना कुराणातील आयती लिहिलेल्या आहेत. तसेच इथे एक छोटेसे वस्तुसंग्रहालयसुद्धा आहे. त्यात मोगल सम्राटांची शस्त्रास्त्रे, चिलखते आणि तसबिरी सुरक्षित ठेवल्या आहेत. मुख्य इमारतीच्या दोन्ही बाजूंना सुंदर, डौलदार वृक्षांच्या रांगा आणि पाण्याची कारंजी असलेली जलकुंडे आहेत. त्यामुळे हा परिसर अत्यंत नयनरम्य दिसतो.

ताजमहालचे पांढरेशुभ्र चौथरे, चारी बाजूंना बांधलेल्या भिंती, २७५ फूट उंचीचा मधला घुमट आणि बाजूला बांधलेले लहान लहान घुमट ह्यांच्यामुळे त्याची शोभा अधिकच वाढते. ताजमहालच्या मोठ्या घुमटाखाली ह्या दोन प्रेमिकांच्या कबरी आहेत. कबरीच्या संगमरवरावर सुंदर कलाकुसर केली आहे. चारी बाजूला संगमरवराचीच जाळी आहे. मेणबत्तीच्या उजेडातच ह्या कबरी बघाव्या लागतात. सुगंधित धुपाने तेथील वातावरण सुगंधित केलेले असते. मुमताज महलच्या कबरीवर कुराणाच्या आयता लिहिलेल्या आहेत परंतु शहाजहानच्या कबरीवर मात्र त्या लिहिलेल्या नाहीत.

पौर्णिमेच्या रात्री ताजमहालचे सौंदर्य अवर्णनीय दिसते. त्यात ती पौर्णिमा जर शरद ऋतूमधील असेल तर ते दृश्य अधिकच मनोहारी दिसते. असा हा ताजमहाल.. कितीही वेळा पाहिला तरी डोळ्यांचे पारणे फिटत नाही.

Set 3: ताजमहाल निबंध मराठी – Taj Mahal Nibandh in Marathi

जगातील सात आश्चर्यांपैकी ताजमहाल हे एक मुख्य आश्चर्य आहे. शहाजहान व मुमताज महलच्या प्रेमाची कहाणी ताजमहाल सांगतो. आग्रा येथील ताजमहाल आज संपूर्ण जगाचा मुकुट बनला आहे-भारतीय व विदेशी पर्यटकांचे ते एक आकर्षण केंद्र आहे. मोगल काळातील ख्यातनाम स्त्रियांपैकी मुमताज ही एक होती. बादशहा शहाजहान याची तो प्रिय राणी होती. तिच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या शहाजहानने तिच्या आठवणीचे प्रतीक म्हणून ताजमहाल बांधला.

आग्रा येथे यमुना नदीच्या उजव्या किनाऱ्यावर इ. स. १६४८ मध्ये ताजमहाल बांधण्यात आला. राजपुतान्यातील खाणीतून शुभ्र संगमरवर यासाठी आणण्यात आले. ही सुंदर इमारत तयार होण्यास २० वर्षे लागली व २०,००० कारागीर व मजुरांनी काम केले. आग्राच्या किल्ल्यापासून ताजमहाल तीन किलोमीटर अंतरावर आहे. याच्या विशाल व भव्य द्वाराच्या दोन्ही बाजूस शुभ्र संगमरवरावर कुराणातील आयता लिहिलेत्या आहेत. इथेच एक छोटेसे वस्तुसंग्रहालय आहे. त्यात मोगल सम्राटांचे अस्त्र-शस्त्र आणि चित्रे सुरक्षित ठेवली आहेत. मुख्य इमारतीच्या दोन्ही बाजूंना सुंदर वृक्षांच्या रांगा आणि पाण्याची कारंजी असलेली जलकुंडे आहेत.

ताजमहालांचे शुभ्र चबुतरे आणि चारी बाजूच्या भिंती, २७५ फूट उंच घुमट आणि इतर छोट्या घुमटांमुळे याची शोभा द्विगुणित होते. ताजमहालाच्या मोठ्या घुमटाखाली या दोन प्रेमीजनांच्या कबरी आहेत. कबरीच्या बहुमूल्य दगडांवर सुंदर कलाकुसर केली आहे. चारी बाजूस संगमरवराची सुंदर जाळी आहे. कबरी मेणबतीच्या उजेडात दाखविण्यात येतात. सुंगधित धूप उदबत्तीने वातावरण सुगंधी केले जाते. मुमताज महलच्या कबरीवर आयता लिहिलेल्या आहेत. पण शहाजानच्या कबरीवर त्या नाहीत.

शरद पौर्णिमेच्या चांदण्या रात्री ताजमहालाचे सौंदर्य अद्वितीय दिसते. यमुनेच्या पाण्यात पडलेले त्याचे प्रतिबिंब पाहण्यासारखे असते. ताजमहल आज ही देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. सौंदर्याचे हे छोटेसे जग शहाजहानच्या प्रेमाचे अद्वितीय प्रतीक आहे. आणि अत्याधिक आश्चर्यजनक इमारत आहे.

ताजमहाल निबंध मराठी

पुढे वाचा:

Leave a Reply