मित्रांनो, आज आपण माझा मित्र निबंध मराठी मध्ये लिहिला आहे. माझा आवडता मित्र निबंध इयत्ता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या निबंधाच्या मदतीने शाळेतील सर्व विद्यार्थी माझ्या जिवलग मित्रावर चांगला निबंध लिहू शकतात जेणेकरून ते परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊ शकतील. हा माझा जिवलग मित्र मराठी निबंध आम्ही सोप्या भाषेत लिहिला आहे.

माझा मित्र-my best friend
माझा मित्र

माझा मित्र निबंध मराठी – My Best Friend Essay in Marathi

Table of Contents

माझा मित्र निबंध मराठी Set 1 – My Best Friend Essay in Marathi Set 1

माझ्या वर्गमित्राचे नाव सुनील आहे. आम्ही दोघे एकाच वर्गात आहोत व एकाच बाकावर बसतो. आमची घरेसुद्धा जवळ जवळ आहेत. आम्ही पहिलीच्या वर्गापासून मित्र आहोत.

सुनील स्वभावाने फार मनमिळाऊ आहे. तो अभ्यासात फार हुशार आहे. तो खेळातही खूप मन लावतो. तो आमच्या वर्गाचा मॉनिटर आहे. सगळी मुले त्याला खूप मानतात. सगळ्या शिक्षकांना तो खूप आवडतो. सुनील मला अभ्यासात मदत करतो. मी आजारी पडलो तर तो माझ्या घरी खूप वेळ माझ्याकडे थांबतो व विचारपूस करतो.

सुनील फारच चांगला मुलगा आहे. तो आपल्या आई-वडिलांचा मान ठेवतो. आपल्या भाऊ-बहिणीवर खूप प्रेम करतो. तो कधीही कोणाशीही भांडत नाही. ह्या सर्व कारणांमुळे मी सुनीलवर फार प्रेम करतो. सुनीलसारखा मित्र मिळाला म्हणून मी स्वतःला फार भाग्यवान समजतो.

[printfriendly current=’yes’]

माझा आवडता मित्र निबंध मराठी–My Friend Essay in Marathi
माझा आवडता मित्र निबंध मराठी

माझा मित्र निबंध मराठी Set 2 – My Best Friend Essay in Marathi Set 2

माझ्या मित्राचे नाव राजस आहे. तो माझ्या वर्गात आहे आणि माझ्याच इमारतीत राहातो. त्यामुळे आम्ही दोघे कायम एकत्रच असतो. शाळेत एकत्र जातो आणि एकत्रच परत येतो त्यामुळे आम्हाला ‘एकमेकांचे शेपूट’ असे चिडवतात.

शाळेत त्याचा नंबर नेहमी पहिला असतो आणि माझा मात्र दहावा असतो पण तरी तो भाव खात नाही आणि माझ्याशी बोलताना गर्विष्ठपणा करीत नाही.

माझी आई कधीकधी मला म्हणते की तो बघ किती हुशार आहे, नाही तर तू! तेव्हा मात्र मला आईचा राग येतो. बाबाही तिला म्हणतात की दोन मुलांची तुलना कधीही करू नये.

राजसचे आईबाबा दुबईत असतात. तो इथे आजीसोबत राहातो त्यामुळे त्याला आमच्या घरी यायला खूप आवडते.

आम्ही दोघे मिळून गच्चीवर पतंग उडवतो, सोसायटीत क्रिकेट खेळतो, बॅडमिंटन सुद्धा खेळतो.

त्याचे आईबाबा दुबईहून दर मे महिन्यात येतात तर तो दिवाळीच्या सुट्टीत त्यांच्याकडे जातो. तो नसला की मला करमत नाही. पण ह्या वर्षी दिवाळीत मी राजसबरोबर दुबईला जाणार आहे, त्यासाठी माझ्या बाबांनी मला पासपोर्ट काढून दिला आहे.

एवढा चांगला मित्र मला मिळाला हे माझे केवढे भाग्य आहे.

माझा मित्र निबंध मराठी–My Best Friend Essay in Marathi
माझा मित्र निबंध मराठी

माझा आवडता मित्र Set 3 – My Friend Essay in Marathi Set 3

[मुद्दे : नाव – शेजारी राहतो- एका वर्गात – खेळणे, अभ्यास करणे एकत्र – गायनस्पर्धेत सहभाग – हुशार, चांगला स्वभाव – सुंदर हस्ताक्षरवया नीटनेटक्या – सर्वांना आवडणारा – मला अभिमान वाटतो.]

माझ्या मित्राचे नाव विनय आहे. तो माझा सर्वांत आवडता मित्र आहे. तो लहानपणापासून माझा मित्र आहे. त्याचे घर आमच्या शेजारीच आहे.

विनय आणि मी एकाच वर्गात आहोत. आम्ही एकाच बाकावर बसतो. संध्याकाळी घरी आल्यावर एकत्र खेळतो आणि अभ्यासही एकत्र करतो. विनयचा आवाज चांगला आहे. तो नेहमी गायनस्पर्धेत भाग घेतो.

विनय हुशार मुलगा आहे. तो स्वभावानेही खूप चांगला आहे. “नेहमी विनयच्या संगतीत राहा,” असे माझी आई मला सांगते. त्याच्या वया, नीटनेटक्या व सुंदर असतात. सगळेजण अभ्यास करण्यासाठी त्याच्या वयांचाच उपयोग करतात. विनय वर्गातील सर्वांना खूप आवडतो. मला या माझ्या मित्राचा अभिमान वाटतो.

माझा आवडता मित्र Set 4 – My Friend Essay in Marathi Set 4

[मुद्दे : अनमोल मित्र – लहानपणापासून मैत्री – सुंदर हस्ताक्षर अप्रतिम चित्रकला – मित्राच्या यशाने आनंदी होणारा – अबोल पण मनाने मोठा – आवडता मित्र.]

अमोल हा माझा एक अनमोल मित्र आहे. अगदी बालपणापासून आमची दोस्ती. प्रथम आम्ही एकमेकांच्या शेजारी राहत होतो, त्यामुळे दिवसातले बरेचसे तास आम्ही एकत्रच असायचो. आता आम्ही नवीन घर घेतले ते बरेच दूर आहे. पण शाळा, वर्ग, बाक हा माझा व अमोलचा एकच.

अमोलचे हस्ताक्षर व चित्रकला अप्रतिम आहे. त्यामुळे अमोलच्या वया फार सुंदर असतात. अमोल हुशार आहे. त्याला सर्व विषयांत चांगले गुण मिळतात. वक्तृत्वस्पर्धा, नाट्यस्पर्धा यांत मात्र अमोल कधीच भाग घेत नाही; पण माझ्या प्रत्येक स्पर्धेला तो माझ्याबरोबर हजर असतो. माझ्या यशाचा त्याला खूप आनंद होतो.

अमोल अबोल आहे. म्हणून त्याला खूप कमी मित्र आहेत. मात्र तो मनाने फार मोठा आहे. म्हणून मला तो खूप आवडतो.

माझा जिवलग मित्र मराठी निबंध Set 5 – Essay On My Best Friend in Marathi Set 5

माझा मित्र माझ्याच वर्गात शिकतो. त्याचे नाव गोविंद आहे.

त्याचे घर आमच्या घराशेजारीच आहे. आम्ही दोघे शाळेत बरोबरच जातो. वर्गात शेजारीच बसतो. तो खूप हुशार आहे. आमच्या बाई नेहमी सर्वांना ‘गोविंद सारखे वागा’ असे सांगतात. कारण गोविंद अभ्यासात हुशार आहे. खेळण्यातही तो पटाईत व चपळ आहे.

तो सर्वांना मदत करायला नेहमी तयार असतो. त्याला चित्रकला व हस्तकलाही आवडते. आम्ही दोघे एकत्रच चित्रकला शिकायला जातो. तो माझ्या वाढदिवसाला स्वतः वस्तू बनवून भेट देतो. आम्ही दोघे एकमेकांना सतत मदत करीत असतो.

तो शांत स्वभावाचा आहे. मी काही म्हटले तरी तो कधीच विरोध करीत नाही. पटले नाही तर फक्त हसतो. खरेच, आमची मैत्री सुदामा व कृष्णाप्रमाणेच आहे.

माझा प्रिय मित्र मराठी निबंध Set 6 – Majha Mitra Nibandh in Marathi Set 6

चांगला मित्र मिळणे ही कठीण गोष्ट आहे. आजच्या काळात जिथे सर्वत्र स्वार्थी लोकांची गर्दी ओह. त्या गर्दीत एकदा निःस्वार्थी मित्र भेटणे म्हणजे वरदान असल्यासारखेच आहे. याबाबतीत मी फार सुदैवी आहे. मला तीन चार मित्र आहे. परंतु त्यापैकी एक आहे माझा प्रिय मित्र रमण. तो तसा आहे चैन्नईचा राहाणारा. पण तो मागच्या काही दिवसापासून दिल्लीतच रहातोय. त्याचे वडील एक वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. आई घराकाम पहाते.

रमण आणि मी एकाच वर्गात आहोत आणि वर्गात एकाच डेस्कवर बसतो. तो नवरोजी नगरात रहातो. मी आर.के. पुरम येथे. . एकमेकापासून जास्त दूर नाही हे अंतर एकमेकांच्या घरी जाणे-येणे तर असतेच. त्याचे आई-वडील आम्हा दोघात कसलाही भेदभाव करीत नाहीत. माझे आई-वडील देखील आमच्यात कसलाही फरक करीत नाही.

रमण एक हुशार विद्यार्थी आहे. वर्गात नेहमी प्रथम येतो. त्यांचे पाठांतर तर कमालीचे आहे, परंतु त्याला त्याचा थोडाही अभिमान नाही. वाचायला-लिहायला तो मला नेहमीच मदत करतो. त्याला आणि मला दोघांनाही बागकाम करण्याचा छंद आहे. आम्ही दोघे या विषयावर सदान्कदा गापा मारतो आणि रोपाचे प्रदर्शन पहायला जातो. माझ्या घराच्या मागे एक आमचे स्वतःचे गार्डन आहे. त्याला पाणि घालणे, देखभाल करण्यात आम्ही आमचा वेळ घालवतो.

माझा मित्र/मैत्रीण मराठी निबंध Set 7 – Majha Mitra Essay in Marathi Set 7

‘दिये जलते हैं, फूल खिलतें हैं, बडी मुश्किलसे मगर दुनिया में दोस्त मिलतें है.” असे एक गाणे आहे. किती खरं लिहिलं आहे त्यात ! ह्या जगात जीवाला जीव देणारे मित्र मिळणे खूप कठीण आहे. नातेवाईक आपल्याला आपोआपच मिळतात. त्यात आपल्याला निवडीची संधीच नसते. परंतु मित्रांचे तसे नाही. आपल्या स्वभावाशी जुळणा-या मुलांशी आणि मुलींशी आपली मैत्री होते.

खरा भित्र कसा असावा? ख-या मित्राने नेहमी आपल्याशी विश्वासाने वागावे. आपल्या मनातले त्याला सांगता यावे आणि त्यानेही ते ऐकून घ्यावे. त्याच्याबरोबर आपल्याला खेळता बागडता यावे. आपल्याला त्रास झाला तर त्याच्या डोळ्यात पाणी यावे. पण मला वाटते की त्यासाठी आपण स्वतःच एक चांगला मित्र बनले पाहिजे. आपण आपल्या मित्राच्या अडीअडचणीला धावून गेलो तर त्यालाही आपल्याबद्दल तसेच वाटणार ना? म्हणून दुस-याकडून आपण मैत्रीची जी अपेक्षा करतो तसे अगोदर आपल्याला वागता यायला हवे.

माझा मित्र सुबोध मला खूप आवडतो. तो आणि मी जवळजवळ राहात असल्यामुळे शाळेत आम्ही एकत्रच येतो. बाकावरही एकाच बसतो. स्वभाव जुळले की सहवासाने मैत्री नक्कीच वाढते. तसे आमचे झाले आहे. आम्ही दोघे वर्गात खूप बडबड करतो म्हणून कधीकधी आमचे शिक्षक आम्हाला दूर बसण्याची शिक्षा देतात. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की आम्ही ह्यापुढे बडबड करणार नाही पण आम्हाला एकत्र बसवा. तसे आम्ही चारपाच दिवस वागतो. नंतर पुन्हा विसरतो आणि ओरडा खातो ती गोष्ट वेगळी.

मध्यंतरी सुबोधला डेंग्यू झाला होता तेव्हा मी रोज त्याच्या घरी जाऊन काय काय अभ्यास झाला ते त्याला सांगत होतो आणि त्याला गोष्टीसुद्धा वाचून दाखवत होतो. त्यामुळे त्याला आणि मला दोघांनाही बरे वाटत होते.

ह्या वर्षी दिवाळीच्या सुट्टीत आम्ही दोघे पोहण्याच्या शिबिराला जाणार आहोत. असा आहे माझा मित्र.

माझा आवडता निबंध Set 8 – My Best Friend Essay in Marathi Language Set 8

‘अमित्रस्य कुतः सुखम् ।’ असे एक सुभाषितकार म्हणतो. मैत्रिशिवाय या जगात सुख मिळणार नाही. आपल्या भावना मोकळेपणी व्यक्त करण्याचे एकच ठिकाण आहे आणि ते म्हणजे आपल्या मित्राजवळ.

मला अनेक मित्र आहेत. शाळेतले मित्र, मैदानावरचे मित्र, माझ्या भावाचे मित्रहीं माझे मित्रच आहेत. पण या सगळ्यांमध्ये माझ्या जिवाभावाचा जो मित्र आहे, त्याचे नाव आहे मकरंद. तो माझ्याच वर्गात आहे. तो माझ्याच शेजारी बसतो. आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही अभ्यासातही एकमेकांना खूप मदत करतो. खूप खेळतो, मस्ती करतो, एकत्र डबा खातो आणि शाळा सुटली, की जड मनाने एकमेकांचा निरोप घेतो. मकरंद एक दिवस जरी शाळेत आला नाही, तरी मला करमत नाही. राहून राहून त्याची आठवण येते. तो मधल्या सुट्टीत तरी यावा, असे वाटत राहते.

मकरंद खूप हुशार आहे. अभ्यासू आहे. त्याच्यामुळे मलाही अभ्यासाची खूप गोडी लागली आहे. त्याचा अभ्यास नेहमी वेळेवर पूर्ण असतो. परीक्षेपूर्वी त्याची प्रत्येक विषयाची व्यवस्थित उजळणी झालेली असते. तीच शिस्त आता मला लागली आहे.

अभ्यासाबरोबर मकरंद खेळातही खूप तरबेज आहे. तो फुटबॉल खूप छान खेळतो. आमच्या शालेय संघाचा तो ‘गोलकीपर’ आहे. त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे आमचा संघ अनेकवेळा आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा जिंकलेला आहे. मला त्याच्या ह्या सर्व गुणांचे खूप कौतुक वाटते. तो परिश्रमपूर्वक एखादी गोष्ट शिकून घेतो. सर्वांशी मनमोकळा राहून मदत करतो, शिक्षकांचा आदर करतो. वर्गातील कच्च्या मुलांचा कधीकधी मधल्या सुट्टीत अभ्यास करून घेतो.

मकरंदचे वडील सैन्यात मोठे अधिकारी आहेत. त्यांची नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असते. त्यांनी सुट्टीत मकरंदसाठी आणलेला खाऊ तो नेहमी शाळेत आणून आम्हा सर्व मुलांना वाटतो.

असा हा सर्वगुणसंपन्न असलेला माझा मित्र मकरंद मलाच काय, सगळ्यांनाच आवडतो. सगळ्यांना मकरंदसारखा आधार देणारा मित्र मिळावा, असे मला वाटते.

माझा जिवलग मित्र मराठी निबंध Set 9 – Essay On My Best Friend in Marathi Set 9

इंग्रजीत एक म्हण आहे – “A friend in need is a friend indeed.” गरजेच्या, संकटाच्या वेळी जो कामी येतो तोच खरा मित्र. मनुष्य एक समाजशील प्राणी आहे. समाजात तो एकटा राहू शकत नाही. त्याला समाजात सर्वांच्या बरोबर चालण्यासाठी, सुख दु:खात सहभागी होण्यासाठी, मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी एका विश्वसनीय मित्राची गरज असते. मैत्रीबाबत असे म्हटले जाते की, मैत्री केली जात नाही, मैत्री आपोआप होते. मने जुळल्यावर एकमेकांचे वागणे आवडल्यावर परिचयाचे रूपांतर गाढ मैत्रीत होते. भारतात कृष्ण-सुदामा, राम-सुग्रीव, कर्ण-दुर्योधन ही मैत्रीची उत्तम उदाहरणे दाखविता येतात.

माझा पण असाच एक खरा मित्र आहे. त्याचे नाव अशोक आहे व तो माझा वर्गमित्र आहे. आम्ही दोघे नेहमी बरोबर असतो. आमचे कुटुंबीय दहा वर्षांपूर्वी महिनाभराच्या अंतराने या गावी आले. तेव्हापासूनच आमची मैत्री जमली. अशोकचे वडील शिक्षक आहेत आणि माझे वडील बँकेत काम करतात. अशोकचे वडीलच शाळेत प्रवेश घेताना आमच्याबरोबर आले होते. तेव्हापासून आमची ओळख व मग मैत्री झाली.

अशोकची उंची ४.५” आहे. आम्ही ७ व्या वर्गात आहोत. अशोक खूप अभ्यास करतो. वर्गात शिकविणे चालू असताना तो एकाग्र होऊन शिक्षकांकडे लक्ष देतो. महत्त्वाचे मुद्दे वहीत लिहून घेतो. त्याचे अक्षर सुंदर आहे. त्याला नेहमीच चांगले गुण मिळतात. तो जसा चांगला विद्यार्थी आहे तितकाच चांगला खेळाडू आहे. तो फुटबॉल संघाचा कप्तान आहे. त्याचे वागणे नम्र आहे. शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये तो सारखाच लोकप्रिय आहे.

तो नेहमी वेळेवर शाळेत येतो. त्याचे कपडे स्वच्छ असतात, बुटांना पॉलिश केलेले असते. त्यांचे दांत मोत्यांप्रमाणे चमकदार आहेत. नखे कापलेली असतात. आम्ही वर्गात एकाच बाकावर वसतो. गणित, विज्ञानाचे, प्रश्न आम्ही मिळून सोडवितो. मला इंग्रजी चांगले येते. अशा प्रकारे एकमेकांच्या सहकार्याने आम्ही चांगले गुण मिळविण्यात यशस्वी हातो. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतही तो माझ्याबरोबर असतो. संध्याकाळी आम्ही एकत्रच खेळतो. कधी कधी एकमेकांच्या घरी जातो. एकदा माझे वडील आजारी असताना तो संध्याकाळी रोज-दवाखान्यात येत असे. त्याचे वडील पण तब्येतीची चौकशी करीत.

मला माझ्या मित्राचा अभिमान आहे. आमची मैत्री सदैव अशीच राहावी असे मला वाटते. मला खात्री व विश्वास आहे की आमची मैत्री कधीच तुटणार नाही.

माझा मित्र मराठी निबंध Set 10 – My Best Friend Essay Marathi Set 10

परवाच माझे रोहनशी जोरदार भांडण झाले. रोहन हा माझा अगदी बालवर्गापासूनचा मित्र. तो माझ्याच इमारतीत तळमजल्यावर राहातो. त्यामुळे आम्ही अगदी सकाळ संध्याकाळ एकत्र असतो असे म्हणायला हरकत नाही. भांडण करायला कारण तसे किरकोळच होते. कुठला खेळ खेळायचा ह्यावरून आम्ही भांडलो आणि शेवटी न खेळताच घरी परत गेलो. दुस-या दिवशी मला चुकल्याचुकल्यासारखे होत होते कारण रोहनशी बोलता येत नव्हते. भांडण झाले होते ना? शेवटी माझी घालमेल चाललेली आजीला कळली. तिने रोहनला बोलावून घेतले तोही जणू काही आजीच्या बोलावण्याची वाटच बघत असल्यासारखा आला. मग काय? आम्ही गेलो ना आमचे भांडण विसरून! मैत्री ही अशी असते. मित्र हा असा असतो.

मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. ज्याच्याशी तो आपल्या मनातल्या गोष्टी बोलू शकेल असा कुणी ना कुणी सोबती त्याला ह्या जगात हवा असतोच. जो मित्र आपल्या जीवाला जीव देतो, सुखदुःखात साथ देतो, आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतो, अडचणीच्या वेळेस धावून येतो तोच आपला खरा मित्र असतो. आपले चुकत असले तर वेळप्रसंगी तो आपली कानउघाडणीही करतो. अशा वेळी त्याचा हेतू चांगलाच असतो, ते आपण समजून घेतले पाहिजे. शिवाय आपल्याला जर चांगला मित्र हवा असेल तर आपण स्वतः तसे अगोदर बनले पाहिजे.

संस्कृतमध्ये सूर्याला मित्र असेही नाव आहे. खरोखरच सूर्य हा ह्या सृष्टीचा मित्रच आहे. सूर्य नसेल तर ही सृष्टीच उरणार नाही. त्यामुळे सूर्याचे हे नाव अगदी समर्पक वाटते.

चांगल्या मित्रांच्या जोड्या ह्या जगात पुष्कळ होऊन गेल्या. कृष्णसुदाम्याची कहाणी आपल्याला माहिती आहेच. कृष्ण राजा झाला, मोठा माणूस झाला परंतु तो लहानपणीच्या आपल्या मित्राला विसरला नाही. त्याची गरीब परिस्थिती त्याने जाणून घेतली आणि आपल्या मित्राचा स्वाभिमान न दुखवता त्याने त्याला मदत केली. कर्ण आणि दुर्योधनाची मैत्रीही आपल्याला माहिती आहे. कर्णाच्या वाईट काळात दुर्योधनाने त्याला मदत केली. त्याला राजेपद दिले. ते कर्ण कधीही विसरू शकला नाही. ‘तू कुंतीचा मोठा मुलगा आहेस, तेव्हा तू पांडवांच्या बाजूने ये’ असे खुद्द कृष्णाने सांगूनही कर्णाने आपल्या मित्राला धोका दिला नाही.

खरा मित्र मिळणे ही मोठी भाग्याची गोष्ट असते. सर्वांना खरा मित्र मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला जर तसा मित्र मिळाला असेल तर तुम्ही देवाचे आभार माना आणि तुम्हीही त्याचे खरे मित्र बना.

माझा मित्र निबंध मराठी Set 11 – My Best Friend Essay in Marathi Set 11

माझा मित्र निबंध प्रस्तावना

आपल्या सर्वांचे अनेक मित्र असतात, पण खऱ्या आणि चांगल्या मित्राची आयुष्यात प्रत्येकाला गरज असते. आपला खरा मित्र कोणता हे ओळखणे थोडे अवघड आहे. पण काळाच्या ओघात आपला सर्वात चांगला मित्र कोण आहे हे आपल्यालाच कळते.

बर्‍याच वेळा अनेकजण मवाळ बोलून आपली दिशाभूल करतात आणि हा आपला प्रिय मित्र आहे असे आपल्याला वाटू लागते. पण असे लोक कधीच चांगले मित्र बनत नाहीत आणि काम झाल्यावर ते आपल्यापासून अंतर ठेवतात.

एक चांगला मित्र कधीच असे करत नाही, परंतु जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा तो आपल्याला मदत करतो आणि वास्तविकतेची ओळख करून देतो.

माझा आवडता मित्र

माझ्या प्रिय मित्राचे नाव रवी आहे. तो माझ्या शाळेत माझ्यासोबत शिकतो. माझ्यासोबत लहानपणापासून शाळेत शिकणारे माझे अनेक मित्र आहेत, पण त्या सर्वांशी माझी मैत्री 3 वर्षात रवीशी झाली तेवढी घट्ट होऊ शकली नाही. या तीन वर्षांत अशा अनेक घटना घडल्या की रवी माझा खरा मित्र असल्याची जाणीव झाली.

असा चांगला मित्र मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. चांगल्या मित्रामध्ये असायला हवेत असे सर्व गुण त्याच्यात आहेत. आम्ही दोघेही प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत एकमेकांना साथ देतो. आमची मैत्री आयुष्यभर अशीच राहील याची मला खात्री आहे.

माझ्या आवडत्या मित्राची वैशिष्ट्ये

रवी हा मध्यमवर्गीय कुटुंबातील असला तरी त्याचे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे. तो मृदू बोलतो आणि मोठ्यांचा आदर करतो. तो अभ्यासात माझ्यापेक्षा खूप चांगला आहे आणि खेळातही रस घेतो.

तो सर्वांशी आत्मविश्वासाने बोलतो आणि सर्वांशी चांगले वागतो. आम्ही दोघे एकत्र बसून गप्पा मारतो तेव्हा आम्हाला वेळही कळत नाही. त्याला कथा आणि कविता लिहिण्याची आवड आहे आणि मला वाचनाची आवड आहे, त्यामुळे आमची चांगलीच गट्टी जमते.

जेंव्हा तो नवीन कथा किंवा कविता लिहितो तेंव्हा तो मला सर्वात आधी सांगतो. आमच्या मैत्रीवर त्यांनी अनेक कविताही लिहिल्या आहेत, ज्या मला खूप आवडतात. तो खूप छान माणूस आहे आणि सर्वांना मदत करतो.

आमच्या शाळेत जेव्हा जेव्हा स्काउटिंगची कामे दिली जातात, किंवा समाजसेवेचे काम करण्यास सांगितले जाते तेव्हा तो सर्वात पुढे असतो. तो खरा आहे आणि माझ्या माहितीनुसार मी त्याला कधीही खोटे बोललेले पाहिले नाही.

एखाद्याला कडू वाटले तरी तो स्वतः चांगला होण्यासाठी खोट्याचा अवलंब करत नाही. खऱ्या मित्राचे वैशिष्ट्य म्हणजे तो तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवतो.

जेव्हा जेव्हा मी एखाद्या गोष्टीबद्दल गोंधळतो तेव्हा मी त्याला फक्त सांगतो आणि तो मला योग्य सल्ला देतो. त्याच्यात अनेक गुण आहेत जे मला कालांतराने कळत गेले आणि आमची मैत्रीही घट्ट होत गेली.

माझा मित्राबद्दल काही घटना

माझे अनेक मित्र आहेत पण त्यांच्यात रवी कसा खास झाला याचा विचार केल्यावर मला अनेक गोष्टी आठवतात. त्यातील एक म्हणजे जेव्हा त्याने मला साथ दिली आणि खऱ्या मित्राचे कर्तव्य पार पाडले.

मी दहावीत असताना रवीने आमच्या शाळेत प्रवेश घेतला. त्यावेळेस मी माझ्या किशोरवयात अभ्यासाबाबत थोडा बेफिकीर झालो होतो आणि मला सर्व काही माहित आहे असे वाटायचे.

शिक्षक वर्गात शिकवायचे तेव्हा मी लक्ष देत नसे. परिणामी सहामाही परीक्षेत मी दोन विषयांत नापास झालो. त्यावेळी रवीने मला समजावून सांगितले आणि मन लावून अभ्यास करण्यास प्रवृत्त केले.

मला जेव्हा जेव्हा अभ्यासात काही अडचण येत असे तेव्हा तो माझ्या घरी यायचा आणि मला अभ्यासात मदत करायचे, त्यामुळे मी दहावीच्या वार्षिक परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. एकदा आमच्या शाळेत स्पोर्ट्स फंक्शन आयोजित करण्यात आले होते आणि आम्ही दोघेही त्यात सहभागी झालो होतो.

आम्हाला कबड्डीची आवड होती म्हणून आम्ही त्या खेळात भाग घेतला. आमच्या शाळेत वेगवेगळ्या शाळांचे संघ आले. त्यांच्यापैकी काही विद्यार्थ्यांचा स्वभाव खूप मत्सरी होता, त्यामुळे कबड्डीच्या खेळादरम्यान त्यांनी मला पकडले आणि धक्काबुक्की केली.

त्यामुळे माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर रवीने माझी काळजी घेतली आणि शिक्षकांच्या मदतीने मला रुग्णालयात नेले. तसेच अशा वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यांची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली.

मग रवी अनेकदा माझ्या घरी यायचा आणि जोपर्यंत मला डॉक्टरांनी शाळेत जायला मनाई केली होती तोपर्यंत तो मला शाळेत शिकवले जाणारे सर्व महत्त्वाचे विषय समजावून सांगत असे. अशा प्रकारे या तीन वर्षांत अशा अनेक गोष्टी घडल्या, ज्यामुळे आमचे नाते अधिक घट्ट होत गेले.

आमची मैत्री श्रीमंत गरिबीच्या पलीकडे आहे

माझा मित्र रवी हा मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्यामुळे त्याला पैशाचे महत्त्व चांगले समजते आणि तो उधळपट्टी करत नाही. याउलट मी श्रीमंत कुटुंबातून आलो आहे आणि त्याला भेटेपर्यंत खूप उधळपट्टी करायचो.

अनेक वेळा मी माझ्या वर्गमित्रांसह पार्ट्या करायचो आणि महागड्या वस्तू खरेदी करायचो. पण जेव्हा मी रवीशी मैत्री केली तेव्हा त्याने मला समजावून सांगितले की पैसे मिळवणे खूप कठीण आहे आणि आमचे पालक खूप कष्ट करून पैसे कमवतात, त्यामुळे आपण ते वाया घालवू नये.

इतर सर्व मित्रांप्रमाणे, त्याने मला महागड्या भेटवस्तू देण्यास नकार दिला आणि सांगितले की जर तुमच्याकडे पैसे शिल्लक असतील तर तुम्ही ते जमा करा किंवा त्यांच्याकडून कोणत्याही गरीब असहायांना मदत करा.

त्यांच्या बोलण्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला आणि मला समजले की श्रीमंती आणि गरिबीचा मैत्रीच्या नात्यावर परिणाम होत नाही. त्याच्यासाठी एकमेकांबद्दल फक्त अस्सल भावना असणे पुरेसे आहे.

अशी होती कृष्ण आणि सुदामाची मैत्री, संपत्तीची भिंत त्यांच्या वाटेला कधीच आली नाही. आता आम्ही दोघेही आमच्या वाढदिवशी आमच्या श्रद्धेनुसार गरजूंना मदत करतो, ज्यामुळे आम्हाला अपार शांती आणि आनंद मिळतो.

माझा विश्वासू मित्र

माझा प्रिय मित्र रवीवर माझा खूप विश्वास आहे आणि मी त्याला काहीही संकोच न करता सर्व काही सांगू शकतो. खर्‍या मित्राचे वैशिष्ट्य म्हणजे तो तुमची गुपिते सर्वांसमोर उघड करत नाही आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू शकता.

जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही तुमच्या मित्राबद्दल काही गोष्टी सांगू शकत नाही, तर तो नक्कीच तुमचा खरा मित्र नाही. त्यामुळे ज्याच्यावर श्रद्धा आहे त्यालाच सर्व गोष्टी सांगाव्यात.

मी रवीला अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्या मला इतर लोकांसोबत शेअर करायच्या नव्हत्या आणि त्याने माझे सर्व बोलणे ऐकून घेतले आणि कोणालाही सांगून माझी चेष्टा केली नाही, जे बहुतेक लोक करतात.

माझा मित्र योग्य सल्लागार

चांगला मित्र तोच असतो जो तुम्हाला योग्य सल्ला देतो आणि तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखतो. आयुष्यात अशी अनेक माणसे भेटतात जी आपल्याला आपापल्या परीने समजावून सांगतात.काही लोक चांगले सल्ले देतात तर काही दुसऱ्याच्या त्रासातही आपला स्वार्थ सिद्ध करण्यात व्यस्त असतात आणि त्यामुळे सर्वांची दिशाभूल करतात.

त्यामुळे जेव्हा-जेव्हा मला असे वाटले की या परिस्थितीत काय करावे हे समजत नाही, तेव्हा मी माझे पालक आणि माझा मित्र रवी यांचा सल्ला घेतला आहे. कारण त्याने मला नेहमीच योग्य मार्ग दाखवला आहे.

माझ्या चांगल्या कृत्यांबद्दल त्यांनी मला प्रोत्साहन दिले, माझी प्रशंसा केली आणि मला कोणतीही चूक न करण्याची ताकीद दिली. त्यांनी मला माझी चूक मान्य करायला शिकवले आणि सांगितले की आपण सर्व मानव आहोत आणि आपण चुका करू शकतो, परंतु आपण आपल्या चुकांमधून शिकले पाहिजे आणि भविष्यात असे न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

जेव्हा जेव्हा माझे मन उदास असते किंवा मनःस्थिती खराब असते तेव्हा ते चुटकीतील जादूप्रमाणे माझा मूड ठीक करते. तो माझ्या प्रत्येक सुख-दु:खाचा सोबती आहे आणि माझ्या स्वाभिमानाचा आदर करतो.

मी त्याच्या सत्यता आणि प्रामाणिकपणाने खूप प्रेरित झालो आहे. आपण जे काही काम करतो किंवा करण्याचा विचार करतो, त्याची योजना आपण मिळून बनवतो. आम्हाला आमची सुट्टी एकत्र घालवायला आणि एकत्र फिरायला जायला आवडते.
उपसंहार

असा खरा मित्र प्रत्येकाला मिळावा अशी माझी इच्छा आहे. आपण एखाद्या मित्राची परीक्षा घेण्यासाठी यावे आणि आपल्याला कधीही चांगला मित्र मिळाला तर आपण त्याची बाजू सोडून त्याचा आदर करू नये, कारण जीवनात चांगला मित्र असणे खूप महत्वाचे आहे जेणेकरून आपल्याला भावनिक आधार मिळेल आणि आपण योग्य मार्गावर चालता.

निष्कर्ष – माझा मित्र निबंध मराठी

असा खरा मित्र प्रत्येकाला मिळावा अशी माझी इच्छा आहे. आपण एखाद्या मित्राची परीक्षा घेण्यासाठी यावे आणि आपल्याला कधीही चांगला मित्र मिळाला तर आपण त्याचा आदर करावा, कारण जीवनात चांगला मित्र असणे खूप महत्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला भावनिक आधार मिळेल आणि आपण योग्य मार्गावर चालता.

पुढे वाचा:

प्रश्न १. मी माझ्या मित्राबद्दल निबंध कसा लिहू शकतो?

उत्तर- प्रास्ताविक परिच्छेदामध्ये वाचकांना आकर्षित करण्यासाठी एक आकर्षक सुरुवातीचे वाक्य समाविष्ट करा, विषयाची लगेच ओळख करून द्या आणि प्रबंध विधान करा. तुमचा प्रबंध या प्रकरणात, तुमचा मित्र चांगला मित्र आहे. मुख्य परिच्छेद लिहा. तुमचा मित्र चांगला मित्र का आहे याचे वर्णन करा आणि स्पष्ट करा.

प्रश्न २. खरा मित्र निबंध म्हणजे काय?

उत्तर- मित्रांशिवाय कोणीही करू शकत नाही, जीवन सोपे करण्यासाठी आपल्याकडे काही मित्र असले पाहिजेत. मात्र, भाग्यवान तेच असतात ज्यांना आयुष्यात खरी मैत्री मिळते. खरी मैत्री ती असते, जेव्हा एखादी व्यक्ती वाईट आणि चांगल्या प्रसंगात तुमच्यासोबत असते.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

मना घडवी संस्कार मराठी निबंध

“मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”

भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | Bhartatil Vansanpatti Essay Marathi

भारतीय लोकशाही मराठी निबंध | Bhartiya Lokshahi Marathi Nibandh

Leave a Reply