My Self Essay in Marathi : लहान मुलांना सहसा स्वतः निबंध लिहिणे आवडते कारण यामुळे त्यांना ते नियमितपणे करत असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांचे विचार व्यक्त करण्याची सुवर्ण संधी मिळते. मराठीमध्ये स्वतःचा निबंध लिहिणे एखाद्या व्यक्तीचा स्वतःबद्दलचा वैयक्तिक अनुभव आणि इतर लोकांशी आणि आसपासच्या परिस्थितीशी त्याचा संवाद दर्शवतो.

त्याचप्रमाणे, जेव्हा मुलांना निबंध लेखनाच्या रूपात त्यांचे विचार व्यक्त करण्याची संधी दिली जाते, तेव्हा ते स्वतःचे वर्णन करण्याचा आणि त्यांच्या कल्पना सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतात. येथे मराठीमध्ये माझ्याबद्दलचा छोटे मोठे निबंध आहेत जे मुले त्यांचा स्वतःचा निबंध लिहिताना संदर्भ म्हणून वापरू शकतात.

My Self
My Self

स्वतःवर निबंध मराठी मुलगा/मुलगी – My Self Essay in Marathi

माय सेल्फ निबंध मराठी – My Self in Marathi Set 1

तुमच्या तपशीलांसह रिक्त जागा पूर्ण करा.

 • माझं नावं______आहे.
 • मी______वर्षांचा आहे.
 • माझ्या वडिलांचे नाव श्री______आहे.
 • माझ्या आईचे नाव श्रीमती______आहे.
 • माझा वाढदिवस______रोजी आहे.
 • मी______वर्गात शिकतो.
 • मी रोज माझा गृहपाठ पूर्ण करतो.
 • माझ्या शाळेचे नाव______आहे.
 • माझ्या शहराचे नाव______आहे.
 • माझ्या देशाचे नाव______आहे.
My Self in Marathi-My Self Essay in Marathi
My Self in Marathi, My Self Essay in Marathi

माझी आत्मकथा – (मी एक मुलगा) – My Self Essay in Marathi Set 2

माझे नाव अरूण कुमार शर्मा आहे. शर्मा माझे जातीगत नाव आहे. मी १० वर्षाचा आहे आणि ५ वीच्या वर्गात शिकतोय. दररोज मी बसने खाळेत जातो-येतो. त्यासाठी मला सकाळीच उठावे लागते. उन्हाळ्याच्या दिवसात काही वाटत नाही परंतु थंडीच्या दिवसात फारच कठीण होतं.

माझे वडील सरकारी नोकर आहेत आणि एका मंत्रालयात मोठे अधिकारी आहेत. सरकारने त्यांना एक मोठा बंगला दिला आहे. आम्ही त्यातच रहात आहोत, माझी आई मोठीच साधी-भोळी आणि धार्मीक महिला आहे. ती खूप शिकलेली देखील आहे. हिंदीमध्ये एम.ए. आहे. गाणे खूप चांगली गाते. गोष्टी पण छान-छान ऐकवते. स्वयंपाक तर असा करते की बोटे चाटत रहावे वाटते.

मला एक छोटी बहिण आहे, तिचं नाव वंदना आहे. मोठीच खोडकर आणि खेळकर आहे. सर्वांची लाडकी, अजून छोटी आहे. शाळेत जात नाही, पुढच्या वर्षापासून जावू लागेल. मी तिचा खूप लाड करतो. तिला टॉफी, चॉकलेट, खेळण्या आणून देतो. काही दिवसापूर्वीच आजारी पडली होती, आमचा तर जीवात जीव राहिला नाही. ज्यावेळी बोलते, असे वाटते की फांद्याना बहार आला आहे. चालते अशी की जणू नाचू लागली आहे.

My Self Boy Essay in Marathi
My Self Boy Essay in Marathi

माझी आत्मकथा – (मी एक मुलगी) – My Self Essay in Marathi Set 3

माझे नाव रजनी आहे. माझे वय बारा वर्षाचे आहे. मी आतापर्यंत १२ ऋतू पाहिले आहेत आणि तितकीच पानगळ देखील. माझी इच्छा आहे की मी १०० ऋतू पहावेत. पण याबद्दल निश्चित काही सांगू शकत नाही. माझे नाव माझ्या आजीने ठेवले होते. माहीत नाही तिने का ठेवले. मी मोठी झाल्यावर तिला विचारणार होते, पण त्यापूर्वीच ती आम्हाला सोडून गेली. रजनीचा अर्थ रात्र असा होतो. मी काळी नसून गोरी आहे, अगदीच गोरी. काहीही असो, मला हे आवडतं. रात्र तर असते विश्रांती, शांती आणि सुखाची वेळ. ताऱ्यांनी सजलेली रात्र, चंद्रानं न्हावून निघालेली रात्र.

माझे वडील पोलिस अधिकारी आहेत. आई प्राध्यापक आहे. आम्हाला स्वतःचे घर आहे. कार आहे, आणि इतर भौतीक सुखाच्या गोष्टी. मी एक पब्लिक स्कुलची विद्यार्थीनी आहे. चित्रपट गीत ऐकणे आणि कार्टून पहाणे माझा छंद आहे, स्वयंपाक तयार करायला मला आवडतो, पण कधी-कधी आणि तो ही आईसोबत.

माझे वडील नेहमी वर्दीमध्येच असतात त्यांना कामातून वेळ मिळत नाही. ते माझा खूप लाड करतात, जीवापलिकडे, माझ्या आईचा पण माझ्यावर खूप जीव आहे. मी त्यांची लाडाची लेक आहे. त्यांचे ऐकते मी माझे प्रथम कर्तव्य समजते.

My Self Girl Essay in Marathi
My Self Girl Essay in Marathi

मी निबंध मराठी – My Self Essay in Marathi Set 4

मी मुलगा आहे. मी आठ वर्षांचा आहे. माझे नाव स्वप्नील आहे पण सगळेजण लाडाने मला सपन असे म्हणतात.

मी एकुलता एकच मुलगा आहे त्यामुळे आईबाबा आणि आजीआजोबा माझे लाड करतात पण त्याच वेळी मी बिघडता कामा नये अशी काळजीही त्यांना वाटत असते.

मी सकाळी सात वाजता उठतो. उठल्यावर आई मला दूध प्यायला देते. तिला आणि बाबांना ऑफिसात जाण्याची घाई असते म्हणून मी तिला त्रास देत नाही. मग सगळेजण मला शहाणा मुलगा म्हणतात.

सकाळी नऊ वाजता मी आंघोळ करून देवाला नमस्कार करतो. मग आजीने दिलेली गरम गरम पोळी आणि केळे खाऊन थोडा वेळ गृहपाठ करतो.मग डबा घेऊन शाळेत जातो.

शाळेत दिवसभर अभ्यास झाल्यावर संध्याकाळी घरी येऊन बाहेर खेळतो. रात्री आम्ही सगळे एकत्र गप्पा मारत जेवतो. रात्री झोपताना कधी आजोबा तर कधी आजी मला गोष्ट सांगतात. मी लौकर झोपावे म्हणून घरातले सगळे लोक टीव्ही जास्त पाहात नाहीत आणि मलाही पाहू देत नाहीत.

मी शाळेत आणि घरात सर्वांचा लाडका आहे.

मी स्वतःवर निबंध मराठी -My Self Essay in Marathi
मी स्वतःवर निबंध मराठी, My Self Essay in Marathi

मी स्वतः मुलगा / मुलगी निबंध मराठी – My Self Essay in Marathi Set 5

मी मुलगा / मुलगी (boy / girl) आहे. माझे नाव अभय आहे. माझ्या वडिलांचे नाव अरुण आहे. माझ्या आईचे नाव अमिता आहे. आमचे आडनाव परांजपे आहे. मी दहा / अकरा वर्षांचा / वर्षांची आहे. मी रोज सकाळी आईबरोबर लवकर उठतो / उठते.

मी माझी स्वतःची सगळी तयारी स्वतः करतो / करते. मी दररोज अभ्यास करतो / करते. मी इयत्ता ५ वीत शिकत आहे. मला गणित, विज्ञान हे विषय सर्वात जास्त आवडतात. मला पुस्तके वाचणे, गाणी ऐकणे व खेळायलाही आवडते.

स्वतःवर निबंध मराठी – 10 Lines on My Self in Marathi Set 6

[मुद्दे : नाव वय – गाव – इयत्ता शाळा – दैनंदिन कार्यक्रम – आवडी.]

माझे नाव सुनील अशोक गायकवाड आहे. माझे वय दहा वर्षे आहे. मी सुंदरग्राम या गावात राहतो. मी इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव ‘जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा’ असे आहे.

मी रोज सकाळी ७ वाजता उठतो. मी १० वाजता शाळेत जातो. संध्याकाळी ५ वाजता घरी येतो. त्यानंतर एक तास मित्रांबरोबर मैदानात खेळतो. त्यानंतर घरी येतो. घरी यायला उशीर झाला, तर मात्र आई रागावते.

घरी आल्यावर गृहपाठ करतो. मला इतिहास हा विषय खूप आवडतो. मला गोष्टींची पुस्तकेही वाचायला आवडतात. रोज अर्धा तास मी दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहतो. दूरदर्शनवरील काही जाहिरातीसुद्धा मला खूप आवडतात.

गेल्या वर्षी माझा परीक्षेत दुसरा क्रमांक आला. गुरुजींनी मला खूप शाबासकी दिली. मी आता खूप अभ्यास करणार आहे.

स्वतःवर निबंध मराठी 10 ओळी – 10 Lines on My Self in Marathi Set 7

 1. माझे नाव कविता आहे. मी मुंबईमध्ये भांडुप येथे राहते.
 2. मी मुंबई पब्लिक स्कूलमध्ये पाचव्या वर्गात शिकतो.
 3. माझी आई प्रोफेसर आहे आणि वडील व्यापारी आहेत.
 4. मला एक मोठी बहीण आहे आणि ती सुद्धा त्याच शाळेत शिकते.
 5. आम्ही एकत्र शाळेत जातो आणि आमच्या शेजारी बरेच मित्र आहेत.
 6. माझे आईवडील आम्हाला दर रविवारी बाहेर घेऊन जातात आणि आम्ही निसर्गाशी जोडले जावे याची खात्री करून घेतात.
 7. मला माझ्या मित्रांसोबत बॅडमिंटन आणि बुद्धिबळ खेळायला आवडते.
 8. मी आंतरशालेय क्रीडा आणि साहित्य स्पर्धांमध्येही भाग घेतला आहे.
 9. मी अभ्यासात चांगला आहे आणि माझ्या परीक्षेत चांगले गुण मिळवतो.
 10. माझ्या आई-वडिलांनी मला नेहमीच खेळ किंवा सांस्कृतिक उपक्रमांमध्ये काहीतरी वेगळे करण्यासाठी पाठबळ दिले आहे.
 11. मला पाळीव प्राणी आवडतात आणि आमच्या घरी एक मांजर आहे.
 12. तिचे नाव मनू आहे आणि ती कुटुंबातील एक सुंदर सदस्य आहे.
 13. शाळेतून घरी आल्यावर पहिली मी तिच्याशी खेळाते.
 14. मी माझ्या शाळेतील पर्यावरण संवर्धन गटाचा एक भाग आहे.
 15. या गटात, आम्ही आमच्या शिक्षक आणि गृहनिर्माण कर्मचार्‍यांच्या वाढदिवशी रोपे लावण्याची खात्री करतो.
 16. मी शास्त्रीय भारतीय नृत्य शिकत आहे आणि मला नृत्याचा आनंद मिळतो.
 17. मला मिठाई आवडते आणि मी मिठाई बनवताना आईला मदत करते.
 18. गणेशचतुर्थी, दिवाळी आणि इतर अनेक सण आपण घरीच साजरे करतो.
 19. दसरा उत्सवात आम्ही कोकणात आमच्या आजी-आजोबांना भेटायला जातो. कोकणामध्ये हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
 20. आम्ही आमच्या आजी आजोबांसोबत खूप छान वेळ घालवला आणि खूप आठवणी घेऊन मुंबईला परतलो.

पुढे वाचा:

FAQ: My Self Marathi

प्रश्न १. माय सेल्फ म्हणजे काय?

उत्तर- स्वतःबद्दल माहिती देणे म्हणजे माय सेल्फ.

प्रश्न २. स्व-निबंध म्हणजे काय?

उत्तर- स्व-निबंध: किंवा स्व-संकल्पना म्हणजे एखादी व्यक्ती स्वतःबद्दल कसे विचार करते, मूल्यांकन करते आणि स्वतःला कसे समजते. स्वतःची जाणीव असणे किंवा स्वतःची संकल्पना असणे.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

मना घडवी संस्कार मराठी निबंध

“मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”

भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | Bhartatil Vansanpatti Essay Marathi

भारतीय लोकशाही मराठी निबंध | Bhartiya Lokshahi Marathi Nibandh

Leave a Reply