बांबूची उडी माहिती मराठी – Pole Vault Information in Marathi
१) बांबूच्या उडीसाठी धावण्याचा मार्ग ४५ मीटरपेक्षा कमी नसावा.
२) खड्डा (Landing Area) ५ मी. × ५ मी. मापाचा असावा. त्यावर फोमच्या गाद्यांचा वापर करणे आवश्यक आहे. गादीची उंची किमान १ मी. असावी.
३) दोन खांबांमधील (Uprights) अंतर ४.३० मीटरपेक्षा कमी नसावे व ४.३७ मीटरपेक्षा अधिक नसावे.
४) आडव्या काठीची लांबी ४.४८ मीटरपेक्षा कमी नसावी व ४.५२ मीटरपेक्षा अधिक नसावी. काठीचे वजन २ किलोग्रॅम असावे. काठीचा झोळ ३ सें.मी.पेक्षा अधिक नसावा. काठीचा व्यास ३ सें.मी. असावा.
५) बांबूची उंची व जाडी कितीही असावी. बांबूच्या वरील टोकाला चिकटपट्टीचे कमाल दोन थर असावेत. खालील टोकाला बांबूच्या संरक्षणासाठी एक फूट उंचीपर्यंत चिकटपट्टीचे थर असावेत.
६) पेटी (Vaulting Box) पुढील मापाची असावी. (आकृती ४)
आतून तळाची लांबी | १ मीटर |
पुढील बाजूची रुंदी | ६० सें.मी. |
खड्ड्याकडील बाजूची खालील रुंदी | १५ सें.मी. |
खड्ड्याकडील बाजूची वरील रुंदी | ४०.८ सें.मी. |
तळ व स्टॉपबोर्डमधील कोन | १०५० (पेटी जमिनीबरोबर बसविलेली असते.) |
७) स्पर्धकाला खड्ड्यात खुणा ठेवता येणार नाहीत. समितीने पुरविलेल्या खुणा धावण्याच्या मार्गाच्या बाजूला ठेवता येतील.
८) योग्य पकड धरण्यासाठी स्पर्धक आपल्या हाताला चिकट पदार्थ (Adhesive Substance) लावू शकतात. मात्र‚ बोटांना अगर हाताला पट्टी बांधता येणार नाही. जखम बांधण्यासाठी पट्टी बांधता येईल.
९) स्पर्धकाच्या विनंतीनुसार पेटीच्या खड्ड्याकडील बाजूपासून ६० सें.मी. पुढे अगर मागे स्टँड ठेवता येईल. स्टँड हलविल्यावर काठीची उंची मोजावी.
१०) उडी मारण्यास अकारण विलंब करणारा स्पर्धक बाद होण्यास पात्र ठरतो.
११) स्पर्धकांनी स्वत:चे मान्यताप्राप्त आणि ते संघटन समितीकडून मंजूर करून घेतलेले बांबू वापरावयास हरकत नाही.
१२) बांबूचे टोक पेटीत ठेवूनच स्पर्धकाने उडी मारली पाहिजे.
१३) प्रत्येक उंचीवर तीन उड्या मारता येतील.
१४) उडी मारताना बांबू मोडला‚ तर तो फाउल नाही. ती उडी मारण्याची संधी स्पर्धकाला पुन्हा द्यावी.
१५) उडी मारताना स्पर्धकाच्या स्पर्शाने किंवा बांबूच्या स्पर्शाने काठी खाली पडली‚ तर तो फाउल आहे.
१६) उडी मारताना स्पर्धकाने हातातून सोडलेला बांबू आडव्या काठीकडे पडत असल्यास अन्य कोणी तो पकडू नये. तसे केल्यास तो स्पर्धकाचा फाउल समजला जाईल.
१७) उडी मारण्याच्या प्रयत्नात स्पर्धक हवेत जाऊन काठी ओलांडण्यात अयशस्वी ठरल्यास तो फाउल समजावा.
१८) स्पर्धक हवेत गेल्यावर खालचा हात वरच्या हाताच्या वर नेल्यास किंवा वरचा हात अधिक वर नेल्यास तो फाउल आहे.
१९) टेक्-ऑफ घेण्यापूर्वी बांबूचा अगर स्पर्धकाच्या शरीराचा पेटीच्या पुढील जमिनीस‚ गादीस किंवा खड्ड्यास स्पर्श झाला‚ तर तो फाउल समजावा.
२०) पेच निर्माण झाल्यास उंच उडीच्या नियमाप्रमाणे सोडवावा. (टीप – बांबू उडीसाठी बांबूऐवजी फायबर ग्लासचा पोल वापरावा; कारण बांबूच्या पोलमध्ये लवचीकपणा फारच कमी असतो. तसेच लँडिंगसाठी वाळूऐवजी किमान एक मीटर उंचीच्या फोमच्या गाद्या वापराव्यात; त्यामुळे स्पर्धकास संभाव्य दुखापत होण्याचे प्रकार टाळता येतील.)
पुढे वाचा: