आदर्श नागरिक मराठी निबंध-Adarsh Nagrik Nibandh Marathi
आदर्श नागरिक मराठी निबंध-Adarsh Nagrik Nibandh Marathi

आदर्श नागरिक मराठी निबंध – Adarsh Nagrik Nibandh Marathi

आदर्श नागरिक आपल्या समाजाची शोभा आणि आधार आहेत. त्यांच्यात अनेक गुण असतात. म्हणून त्यांचे जीवन आणि आचरण अनुकरणीय असते. त्यांचा सर्वांना अभिमान वाटतो. आदर्श नागरिक देशाला शक्ति संपन्न, समृद्ध, सुखी, शांत आणि संघटित बनवितात. राजनैतिक, सामाजिक, आर्थिक, नैतिक सर्व दृष्टींनी हे नागरिक महत्त्वाचे असतात. जितकी या आदर्श नागरिकांची संख्या तितका देश भाग्यशाली. आदर्श नागरिक मोठा देशभक्त असतो.

युद्ध आणि शांती दोन्ही स्थितीत ते देशहिताचाच विचार करतात. देशहितासाठी, राष्ट्रहितासाठी ते आपल्या प्राणाचीसुद्धा पर्वा करीत नाहीत. गांधीजी, पं. नेहरु, नेताजी, लाला लजपत राय, सरदार भगतसिंग इ. देशाचे खरे आदर्श नागरिक होत. त्यांनी देशासाठी आपले प्राणही दिले आज त्यांच्यामुळेच आपण स्वतंत्र आहोत.

एक आदर्श नागरिक स्वेच्छेने शिस्तीचे पालन करतो. देशाचे सर्व कायदे पाळतो. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यात मदत करतो. दुसऱ्याचे अहित होईल असे कोणतेही काम तो करीत नाही. देशाला आणि समाजाला हानी पोहोचविणारे कृत्य करीत नाही. तो कधीही कशाचाही चोरी करीत नाही. आपले काम पूर्ण निष्ठेने व जबाबदारीने पार पाडतो.

आदर्श नागरिक आपले अधिकार आणि कर्तव्यांच्या बाबतीत जागरूक असतो. तो घरात, कार्यालयात, व्यवसायात कुठेही आपले कर्तव्य पार पाडतो. तो कधीच आपल्या संकुचित स्वार्थाचा विचार करीत नाही. कायदा आपल्या हातात घेत नाही व दुसऱ्यांनाही घेऊ देत नाही. इतर नागरिक त्यांच्याकडून प्रेरणा घेतात त्यांच्या सूचना पाळतात.

आदर्श नागरिक निवडणुकीत भाग घेऊन आपल्या मताचा योग्य उपयोग करतो. त्याचे प्रत्येक कार्य राष्ट्रहित आणि समाजकल्याणाच्या भावनेने केलेले असते. तो इतरांना यासाठी मदत करतो की ज्यामुळे समाज आणखी चांगला, सुसंस्कृत समृद्ध आणि सुखी बनू शकेल.

आदर्श नागरिक सहनशील, आत्मसंयमी, खरे बोलणारा. मेहनती आणि स्वावलंबी असतो. देशाच्या समृद्धीस हातभार लावतो. अन्याय, हिंसा, अप्रामणिकपणा, धोकेबाजी, भ्रष्टाचार यांचा तो विरोध करतो. तो खऱ्या अर्थाने नैतिक आणि धार्मिक असतो आणि इतर सर्व धर्म आणि संप्रदायांचा आदर करतो. तो त्यांच्या बरोबर बंधुभावाने आणि सहकार्याने राहतो. देशाचा इतिहास परंपरा रीतिरिवाज, सांस्कृतिक वारसा आदी वर त्याची पूर्ण निष्ठा असते. त्याला याचा अभिमान वाटतो म्हणून तो त्याचे संरक्षण करतो आणि त्याच्या वाढीस मदत करतो.

आदर्श नागरिक मराठी निबंध-Adarsh Nagrik Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply