आदर्श-विद्यार्थी-कसा-असावा-मराठी-निबंध-Adarsh-Vidyarthi-Nibandh-in-Marathi
आदर्श विद्यार्थी कसा असावा मराठी निबंध-Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi

Set 1: आदर्श विद्यार्थी कसा असावा मराठी निबंध – Adarsh Vidyarthi Kasa Asava Nibandh Marathi

आमच्या शाळेत दर वर्षी आदर्श विद्यार्थी स्पर्धा घेतली जाते. इयत्ता पाचवी ते सातवीमधून एक आदर्श विद्यार्थी निवडला जातो तर इयत्ता आठवी ते दहावीमधून आणखी एक आदर्श विद्यार्थी निवडला जातो.

ह्या वर्षी आमच्या वर्गातील हृषिकेश आठवले ह्या मुलाला आदर्श विद्यार्थी म्हणून निवडण्यात आले. त्याला निवडण्यात आले म्हणून आम्हाला कुणालाच त्याचा हेवा वाटला नाही. कारण आमचा हा मित्र आहेच तसा. त्याला जर आदर्श विद्यार्थी म्हणून निवडले नसते तरच उलट आम्हाला वाईट वाटले असते.

हृषिकेशमध्ये असे काय आहे बरे की ज्यामुळे आम्हा सर्वांना त्याचे कौतुक वाटावे? मला वाटते की ह्यातच त्याच्या आदर्शपणाचे गुपित दडलेले आहे.

हृषिकेश हुशार आहे. म्हणजे त्याचा नंबर वर्गात पहिला येत नसला तरी तो पहिल्या पाचात नक्कीच असतो. तो खेळात खूप हुशार आहे. आमच्या वर्गाच्या खोखोच्या टीमचा तो कप्तान आहे. तसेच त्याला आमच्या वर्गाचे मॉनिटरही केले आहे. वर्गात कधीही मुलांची भांडणे झाली की तो मध्ये पडतो आणि सर्वांना नीट समजावतो. त्याचे म्हणणे सर्वांना पटते. थोडक्यात त्याच्यामध्ये नेतृत्वगुण चांगलेच आहेत असे म्हणता येईल.

तो वक्तृत्वकलेतही हुशार आहे. त्याला आंतर्शालेय स्पर्धेत वक्तृत्वासाठी नेहमीच पाठवतात. त्याच्यामुळे शाळेकडे पुष्कळ बक्षिसे गोळा झाली आहेत. परंतु असे असूनही हृषिकेश कधीही गर्विष्ठपणा करीत नाही. सर्वांशी मनमिळाऊपणाने वागतो. आपुलकीने बोलतो. शिक्षकांशी त्याचे वागणे नम्रतेचे असते. त्याचे असे वागणे आम्हाला खूप आवडते. वर्गातील काही मुले कदाचित त्याच्यावर जळतही असतील परंतु अशा लोकांनाही हृषिकेशचे गुण मान्य करावेच लागतात.

गेल्या वर्षी आमच्या शाळेची सहल औरंगाबादला गेली होती. तेव्हा अजिंठ्याच्या गुंफेजवळ एक मुलगा हरवला होता. परंतु हृषिकेशच्या ते लक्षात आले. त्या मुलाला वेळेवर शोधल्यामुळे त्या मुलावरचे आणि पर्यायाने शाळेवरचेही संकट टळले. म्हणूनच हृषिकेशला यंदाचा आदर्श विद्यार्थ्याचा पुरस्कार मिळालेला दिसतो. खरोखर शाळेने योग्य अशाच मुलाला आदर्श विद्यार्थी म्हणून निवडले आहे.

Set 2: आदर्श विद्यार्थी मराठी निबंध – Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi

आमच्या शाळेत दर वर्षी आदर्श विद्यार्थी स्पर्धा घेतली जाते. इयत्ता पाचवी ते सातवीमधून एक आदर्श विद्यार्थी निवडला जातो तर इयत्ता आठवी ते दहावीमधून आणखी एक आदर्श विद्यार्थी निवडला जातो.

ह्या वर्षी आमच्या वर्गातील मोनिका गडकर ह्या मुलीला आदर्श विद्यार्थिनी म्हणून निवडण्यात आले. गंमत म्हणजे तिला निवडण्यात आले म्हणून आम्हाला कुणालाच तिचा हेवा वाटला नाही. कारण आमची ही मैत्रीण आहेच तशी. खरोखरच ती अजातशत्रू आहे. तिला जर आदर्श विद्यार्थिनी म्हणून निवडले नसते तरच उलट आम्हाला आश्चर्य वाटले असते आणि वाईटही वाटले असते.

मोनिकामध्ये असे काय आहे बरे की ज्यामुळे आम्हा सर्वांना तिचे कौतुक वाटावे? मला वाटते की ह्यांतच तिच्या आदर्शपणाचे गुपित दडलेले आहे.

मोनिका हुशार आहे. म्हणजे तिचा नंबर वर्गात पहिला येतो. ती खेळातही खूप हुशार आहे. आमच्या वर्गाच्या मुलींच्या खोखोच्या टीमचा ती कप्तान आहे. तसेच तिला आमच्या वर्गाचे मॉनिटरही केले आहे. वर्गात कधीही मुलामुलींची भांडणे झाली की ती मध्ये पडते आणि सर्वांना नीट समजावते. तिचे म्हणणे सर्वांना पटते. थोडक्यात तिच्यामध्ये नेतृत्वगुण चांगलेच आहेत असे म्हणता येईल. ह्याचाच अर्थ असा की आदर्श विद्यार्थ्यात नेतृत्व गुण असले पाहिजेत. सर्वांना घेऊन पुढे जाण्याची क्षमता त्याच्यात किंवा तिच्यात असली पाहिजे.

ती वक्तृत्वकलेतही हुशार आहे. तिला आंतर्शालेय स्पर्धेत वक्तृत्वासाठी नेहमीच पाठवतात. तिच्या बोलण्यात हजरजबाबीपणा आहे आणि विनोदबुद्धीही आहे. तिने भाग घेतल्यामुळे शाळेकडे पुष्कळ बक्षिसे गोळा झाली आहेत.

असे असूनही मोनिका कधीही गर्विष्ठपणा करीत नाही. सर्वांशी मनमिळाऊपणाने वागते. आपुलकीने बोलते. शिक्षकांशी तिचे वागणे नम्रतेचे असते. तिचे असे वागणे आम्हाला खूप आवडते. वर्गातील काही मुले कदाचित तिच्यावर जळतही असतील परंतु अशा लोकांनाही मोनिकाचे गुण मान्य करावेच लागतात.

गेल्या वर्षी आमच्या शाळेची सहल औरंगाबादला गेली होती. तेव्हा अजिंठ्याच्या गुंफेजवळ एक मुलगी वाट चुकली. परंतु मोनिकाच्या ते लक्षात आले. त्या मुलीला वेळेवर शोधल्यामुळे त्या मुलीवरचे आणि पर्यायाने शाळेवरचेही संकट टळले. म्हणूनच मोनिकाला यंदाचा आदर्श विद्यार्थ्याचा पुरस्कार मिळालेला दिसतो.

खरोखर शाळेने योग्य अशाच मुलीला आदर्श विद्यार्थिनी म्हणून निवडले आहे.

Set 3: आदर्श विद्यार्थी मराठी निबंध – Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi

आदर्श विद्यार्थी म्हणजे चांगले आचरण करणारा विद्यार्थी. आदर्श विद्यार्थी विद्येवर प्रेम करतो. पुस्तके वाचून त्याचे मनन चिंतन करतो. वर्गात प्रथम श्रेणी प्राप्त करण्यासाठी आळस झटकून अभ्यास करतो. आवश्यक ते पाठ करतो. तो जिज्ञासू असतो. नेहमीच नवीन काही शिकण्यास तयार असतो. एखादी गोष्ट त्याला स्वत:ला येत नसेल व त्याच्यापेक्षा लहान असणाराला येत असेल तर त्याच्याकडून शिकण्यात त्याला अपमान वाटत नाही.

विद्यार्थी जीवनाचे अमूल्य महत्त्व लक्षात घेऊन विद्याप्राप्तीच्या बाबतीत तो कधी बेसावध राहत नाही. कठोर परिश्रम करून ज्ञान मिळविणे हे त्यांचे एकमात्र उद्दिष्ट असते. विद्याच त्याला विनम्र बनविते. संस्कृतमध्ये एक म्हण आहे ‘विद्या विनयेन शोभते’. आदर्श विद्यार्थी अभ्यासाबरोबरच खेळातही भाग घेतो. निरोगी शरीरात निरोगी मन असते. म्हणून तो खेळाच्या वेळी खेळ आणि अभ्यासाच्या वेळी करतो. आदर्श विद्यार्थी नेहमी साधी रहाणी व उच्च विचारसरणी या मंत्राचे पालन करतो.

आदर्श विद्यार्थ्याचे उद्दिष्ट हे असते की, सदाचारी आणि आदर्श बनून इतर वर्ग बंधूंना , मदत करणे. म्हणून तो गुरुजन, माता-पित्यांचा नेहमी आदर करतो. आपल्या वर्गबंधूवर प्रेम करतो, त्यांना मदत करतो. घरकामात मदत करतो. योग्य व पौष्टिक आहार घेतो. सगळ्यांशी मिळून-मिसळून वागतो म्हणून त्याला कुणी शत्रू असत नाहीत. तो नियमित शाळेत जातो व आपला गृहपाठही करतो. आदर्श विद्यार्थी नेहमी गोड व सत्य बोलतो. थोर लोकांची चरित्रे वाचून त्यांच्या प्रमाणे होण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या चांगल्या वागणूकीची सर्वांवर छाप पडते. अशा प्रकारे आदर्श विद्यार्थ्यात अनेक गुण एकवटलेले असतात.

आदर्श विद्यार्थी मराठी निबंध – Adarsh Vidyarthi Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply