अर्धमच्छेंद्रासन मराठी माहिती – Ardha Matsyendrasana Information in Marathi
Table of Contents
नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथ नावाचा एक थोर योगी होता. तो योगी ज्या आसनात ध्यानस्थ बसत असे त्या आसनास मच्छेंद्रासन म्हणतात. अर्धमच्छेंद्रासन ही मच्छेंद्रासनाची सुलभ आवृत्ती आहे म्हणून या आसनास अर्धमच्छेंद्रासन म्हणतात.
अर्धमच्छेंद्रासन करण्याची पद्धत
- चटईवर बसा.
- पाय पुढे पसरवा.
- डावा पाय गुडघ्यात मुडपून उजव्या मांडीखाली घ्या.
- डावी टाच जननेंद्रियावर ठेवा.
- उजवा पाय थोडा वर उचला, गुडघा मुडपा आणि त्याला डाव्या मांडीच्या डाव्या बाजूला ठेवा.
- श्वास सोडून पोट आत घ्या आणि त्याच स्थितीत ठेवा.
- यानंतर उजव्या हाताने उजवा गुडघा डाव्या बाजूला दाबा.
- कंबर आणि पोट उजव्या बाजूस वळवा आणि डावा बाहू उजव्या गुडघ्याच्या उजव्या बाजूस घेऊन उजव्या पायाची टाच पकडा.
- मान आणि डोके उजव्या बाजूस फिरवा.
- उजव्या हाताने डाव्या मांडीला, हात पाठीमागून घेऊन स्पर्श करा.
- तुमच्या उजव्या पायाचा अंगठा, गुडघा, डावा खांदा, हनुवटी आणि उजवा खांदा एका रेषेत ठेवा.
- अर्धमच्छेंद्रासनाची ही अंतिम अवस्था आहे.
- हात आणि पायांची अदलाबदल करून हे आसन पुन्हा करा.
- सुरुवातीस हे आसन काही सेकंद करा.
- हळूहळू वेळ वाढवून आसन 30 सेकंद करा.
अर्धमच्छेंद्रासन वैशिष्ट्ये
हे एक अवघड आसन आहे. याकरिता फार सराव आणि चिकाटीची आवश्यकता आहे. एकदा का या आसनावर ताबा मिळविला की, ते तुमच्या जीवनात उपयुक्त सिद्ध होईल. ओला कपडा पिळल्याप्रमाणे या आसनामुळे तुमची कंबर पिळून निघेल.
सुरुवातीस जर पायाची बोटे पकडता आली नाहीत तर हाताचे पंजे जमिनीवर टेकवून कंबर वळवा. उजव्या पायाची बोटे पकडण्याचा प्रयत्न चालू ठेवा.
मच्छेंद्रासन आणि अर्धमच्छेंद्रासन यात फरक आहे. अर्धमेच्छेंद्रासनात डावी टाच जननेंद्रियाजवळ किंवा डाव्या पुठ्ठ्याच्या बाजूला ठेवतात. मच्छेंद्रासनात डाव्या पायाची टाच आणि बोटे उजव्या मांडीवर उगमस्थानी ठेवतात. मच्छेंद्रासन हे एक अवघड आसन आहे. यावर नैपुण्य मिळविण्याकरिता अगोदर अर्धमच्छेंद्रासनाचा चांगला सराव करावा.
अर्धमच्छेंद्रासन करण्याचे फायदे – Ardha Matsyendrasana Benefits in Marathi
- हे आसन नियमित केल्याने पाठीचा कणा लवचिक व सुदृढ बनू शकतो.
- पाठीचे सर्व विकार दूर होण्यास या आसनाची मदत होते.
- रुधिराभिसरण सुधारते. पचनक्रिया वृद्धिंगत होते.
- बेंबीखालील अवयव, पाय, कंबर, पोट मान आणि पाठ लवचिक होण्यास या आसनाची मदत होते.
- पोटाचे सर्व विकार निवारण होऊ शकतात.
- हाडे, नसा, स्नायू सशक्त होतात.
- आतड्यातील रोग आणि मधुमेहाकरिता हे आसन उपयुक्त आहे.
अर्धमच्छेंद्रासन विडिओ मराठी
अजून वाचा:
- मत्स्यासन मराठी माहिती
- योग मुद्रा (योगमुद्रासन) मराठी माहिती
- पद्मासन माहिती मराठी
- ध्यान कसे करावे
- योगासन करताना कोणती काळजी घ्यावी
- योगाचे फायदे
- सनस्क्रीन लावणे का आहे महत्त्वाचे?
- लैंगिक आजाराची सुरुवातीची लक्षणे
- कोरोनापासून सुरक्षिततेचे उपाय
- कोरोना मध्ये घ्यावयाची काळजी
- उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी