असेही काही पाहुणे निबंध मराठी
असेही काही पाहुणे निबंध मराठी

असेही काही पाहुणे निबंध मराठी

सुट्टी सुरू झाली की आमच्याकडे पाहुण्यांचे पेव फुटणार हे ठरलेले असतेच आणि आम्ही त्यांचा पाहुणचार अगत्यपूर्वक करणार हेही ओघाने आलेच! तसे वर्षभर अधूनमधून आमच्याकडे पाहुणे येतच असतात; त्यामुळे मानवी स्वभावाचे असंख्य नमुने पाहायला मिळतात.

आम्हांला घरबसल्या काही पाहुणे हे खूप दिवस मुक्काम ठोकून राहिले, तरी ते ‘पाहुणे’च राहतात. काही अगदी घरातले होऊन जातात. आमचे प्रशस्त घर, बाबांचा भिडस्त स्वभाव आणि आईची आतिथ्यशील व सेवाभावी वृत्ती या गोष्टींमुळे आमच्या घरी पाहुण्यांची विशेष वर्दळ असते. अशा पाहुण्यांत दर सुट्टीत येणारी एक पाहुणी आहे- कुसुममावशी. ती आल्या दिवसापासून आम्हांला सर्वांना फैलावर घेते, अगदी बाबांना सुद्धा ! सर्वांच्या चुकांचा पाढा वाचणाऱ्या कुसुममावशीच्या तोंडाचा पट्टा सर्वजण निमूटपणे ऐकतात. तिच्या पाठीमागे मात्र सर्वजण तिचा उल्लेख ‘आखाडमावशी’ असाच करतात.

या आखाडमावशीप्रमाणे आम्हांला उपदेश दयायला येतात ते बाळूमामा. नीटनेटके सजवलेले घर त्यांना आवडत नाही. अशा घरात वावरताना त्यांना हॉटेलात राहिल्यासारखे वाटते. त्यामुळे आल्या क्षणापासून ते घरात आपला सर्व पसारा मांडून ठेवतात. त्यांचा मान राखण्यासाठी आम्हांला त्यांचा अजागळपणा सहन करावा लागतो. त्यामुळे ते आपले चंबुगबाळे आवरून कधी जातात याचीच आम्ही वाट पाहत असतो.

या साऱ्या पाहुण्यांमध्ये हवीहवीशी वाटते ती कोकणातील माझी आजी. आल्याआल्याच ती जाहीर करते, “सूनबाई, आता मी चुलीकडे पाहीन. तू घे विसावा.” आणि मग तिव्या हातच्या खास चवदार पदार्थांचा आम्ही मनमुराद आस्वाद घेत असतो. रात्री या आजीच्या कुशीत विसावत, परीकथा ऐकत झोपी जाण्यात किती मौज असते ! अशी ही आजी कोकणात परत निघाली की खरेच आमचे डोळे पाणावतात.

पुढे वाचा:

Leave a Reply