अंतराळ संशोधन निबंध मराठी-Space research essay in marathi
अंतराळ संशोधन निबंध मराठी

Set 1: अंतराळ संशोधन निबंध मराठी – Space Research Essay in Marathi

गेल्या पन्नास साठ वर्षांमध्ये अंतराळ संशोधनात मानवाने खूप मोठी प्रगती केली आहे. खरोखरच, ज्यांची पूर्वी कल्पनाही करणे अशक्य होते असे अनेक आश्चर्यकारक शोध ह्या काळात लागले. काही वर्षांपूर्वी अंतराळात प्रवास करणे, चंद्रावर जाणे इत्यादी केवळ स्वप्ने आणि कविकल्पना होत्या त्या आज प्रत्यक्षात उतरल्या आहेत.

अंतराळ प्रवासाच्या मोहिमा ४ ऑक्टोबर, १९५७ ह्या दिवसापासून सुरू झाल्या. रशियाने आपले स्पुटनिक १ हे अवकाशयान सुरूवातीला अंतराळात पाठवले. त्यानंतर स्पुटनिक २ ह्या यानातून लायका नामक कुत्री अंतराळात गेली. रशिया आणि अमेरिका ह्यांच्यात त्या काळात नेहमीच चुरस होती. त्यामुळे अमेरिकेनेही एक्स्प्लोरर आणि मरिनर ह्या अवकाशमोहिमा सुरू केल्या. ह्या मोहिमेत पाठवलेल्या यानांमुळे आपल्याला ग्रह, तारे, सूर्य आणि आपल्या पृथ्वीबद्दलची कितीतरी नवी आणि उपयुक्त माहिती आपल्याला कळली. मानवविरहित अवकाशयानांचा शोध लागल्यामुळेच आपण अंतराळविज्ञानात पुढले पाऊल टाकू शकलो.

अमेरिकेने रेंजर आणि सर्व्हेयर ही मानवविरहित याने अवकाशात पाठवली. त्याच वेळेस युरी गागारीन हा रशियन माणूस अवकाशात जाऊन पृथ्वीभोवती फे-या मारून आला. त्यानंतर २९ जुले, १९६९ रोजी अमेरिकेचे नील आर्मस्ट्रॉन्ग आणि एडविन आल्ड्रीन हे अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवण्यात यशस्वी झाले. संपूर्ण मानवजातीला गौरव वाटावा अशीच ही कामगिरी होती.

त्यानंतरच्या काळात बरीच अवकाशयाने अंतराळात पाठवली गेली. ह्या सर्व अवकाशयानांनी खूप संशोधन केले. त्यामुळे अंतराळात चालणे, खराब झालेल्या अवकाशयानांची दुरूस्ती करणे हे सगळे शक्य झाले. स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा हा पहिला भारतीय अंतराळवीर सोयूज टी-२ ह्या रशियन अवकाशयानातून गेला आणि अंतराळात ८ दिवस राहिला. ते १९८४ साल होते.

भारतातही इस्रो ही संस्था अंतराळ संशोधनाचे कार्य करीत आहे. ह्या सर्व मोहिमांनी अंतराळातील अनेक रहस्ये उघड केली. ग्रह, तारे, चंद्र, सूर्य आणि आकाशगंगा ह्याविषयी भरपूर ज्ञान आपल्याला आता मिळाले आहे. मागील वर्षी आपण मंगळावर यान पाठवले. त्या यानाने मंगळ ग्रहाची असंख्य छायाचित्रे घेतली. तिथे भविष्यकाळात मानवाने वस्ती केली तर त्यात आश्चर्य वाटायला नको.

कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडणे ही एक महत्वाची गोष्ट ह्या संशोधनामुळे घडली. त्यामुळे हवामानाचे अंदाज अचूकपणे सांगता येऊ लागले. इंटरनेटचे जाळे, मोबाईल यंत्रणा ही सर्व ह्या कृत्रिम उपग्रहांवरच चालते म्हणूनच अंतराळ विज्ञानाचे खूप महत्व आहे.

कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्स ह्या भारतीय वंशाच्या दोन अंतराळवीर महिलांनीही ह्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. असे हे अंतराळ संशोधन. कुणास ठाऊक पुढील काही दशकांनंतर आपण चंद्रावर वसाहतीही केल्या असतील.

Set 2: अंतराळ संशोधन निबंध मराठी – Space Research Essay in Marathi

मागील चार-पाच दशकांपासून अंतराळ विज्ञानात खूप प्रगती झाली आहे. आणि अनेक गोष्टींचा शोध लागला आहे. हे शोध खरोखरच खूप आश्चर्यकारक आहेत. काही काळापूर्वी अंतराळप्रवास आणि अंतराळावर विजय मिळविण्याची जी स्वप्ने होती ती आज प्रत्यक्षात साकार होत आहेत. अंतराळ प्रवासाची ही विजय मोहीम ४ ऑक्टोबर १९५७ पासून सुरू झाली. रशियाने आपले स्पुटनिक-१ हे अवकाशयान प्रथमच अंतराळात पाठविले तेव्हा स्पुटनिक-२ मध्ये प्रथमच ‘लायका’ नामक कुत्रीला अंतराळात पाठविण्यात आले. दुसरीकडे अमेरिकेने एक्सप्लोरर आणि मरिनर अवकाशयानांची एक शृंखलाच सुरू केली. या अंतराळ शृंखला आणि यानांनी ग्रह, सूर्य आणि आपल्या पृथ्वीविषयी किती तरी नवीन व उपयोगी गोष्टी आपणास कळविल्या. मानवरहित अवकाशयाने व त्यासंबंधीच्या शोधामुळे आपल्या अंतराळ ज्ञानाचा आश्चर्यकारक विस्तार झाला.

रशियाने सर्वप्रथम युरी गागारीनला अंतराळात थेट पाठविले. टेलिसकोवा ही कृत्रिम उपग्रहाद्वारे अंतराळात जाणारी पहिली महिला रशियाचीच होती. सुरुवातीला आघाडीवर असणाऱ्या रशियाला अमेरिकेने मागे टाकले. अमेरिकेने आपल्या मयुरी, जेमिनी आणि अपोलो यानांच्या शृंखलेद्वारे ते सर्व काही करून दाखविले जे पूर्वी अशक्य वाटत होते. तत्पूर्वी अमेरिकेने आपल्या मानवरहित रेंजर आणि सर्व्हेयर या यानांना अंतराळात पाठविले होते. २९ जुलै १९६९ रोजी अमेरिकेचे नील आर्मस्ट्राँग आणि एडविन आल्ड्रिन हे अंतराळावीर चंद्रावर उतरण्यात यशस्वी झाले. संपूर्ण मानवजातीला गौरवास्पद वाटावे असे हे यश होते. अंतराळ संशोधनाने साध्य केलेले हे यश फार मोठे आहे. रशिया ल्यूनार-१७ हे अवकाश यान चंद्रावर पाठविण्यात यशस्वी झाले.

अमेरिकन पायोनियर-१० हे असे पहिले अवकाशयान होते. ज्याने गुरू ग्रहाची अगदी जवळून छायाचित्रे घेऊन ती पृथ्वीवर पाठविली. १९७१ मध्ये रशियाने सॅल्यूटनामक अवकाशयान पाठविले. त्यानंतर अमेरिकेने स्कायलॅब व रशियाने मीर ही अवकाशयाने पाठविली. या सर्व अवकाशयानांनी खूपच संशोधन केले. त्यामुळे अंतराळात चालणे, खराब झालेल्या अवकाशयानांची दुरुस्ती करणे, कठो पसंक्षण करणे शक्य झाले. स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा हा पाहिला भारतीय अंतराळवीर सोयूज टी-२ या रशियन अवकाशयानातून गेला व अंतराळात ८ दिवस राहिला. ते साल १९८४ होते.

स्पेस शटल्सच्या प्रयोगांनी अंतराळ संशोधनाबाबत युगांतरच घडवून आणले. यांचा विमानाप्रमाणे वारंवार उपयोग करता येतो. पैशांची बचत होते आणि संशोधन करणे सोपे होते. यासंदर्भात अमेरिकेच्या एन्टरप्राईझ, कोलंबिया, चॅलेंजर, डिस्कव्हरी, अंटलांटिस इत्यादी स्पेश शटल यानांचे कार्य उल्लेखनीय आहे. या यानांनी अंतराळ शोधाचे कित्येक नवे दृष्टिकोण उपलब्ध करून दिले. हळूहळू अंतराळाच्या कित्येक रहस्यमय गोष्टी आता उघड़ होऊ लागल्या आहेत. त्यामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. ग्रह, तारे, चंद्र, सूर्य. आकाशगंगा इत्यादी विषयी जी नवी बहुमूल्य माहिती आता आपणास प्राप्त होऊ लागली आहे ती खरोखरच अद्वितीय आहे.

अंतराळ शोधात आता एक नवी गती व तीव्रता पाहावयास मिळते. युरोपियन स्पेस एजन्सीने आतापर्यंत किती तरी अवकाशयाने आणि स्पेस स्टेशन्स रशियन रॉकेटसच्या माध्यमातून आकाशात स्थापन केले आहेत. हे कार्य फ्रेंच गयानाच्या कोरू स्पेस सेंटर वरून चालते. परिणामी अंतराळ संशोधनाचे काम वेगाने चालते. ताज्या संशोधनानुसार असे समजले की, आपली आकाशगंगा जिचे एक अभिन्न अंग आपली पृथ्वीच आहे ती चपटी नसून ती वर्तुळाकार आहे. आपली आकाशगंगा एक विशाल ताऱ्यांची तबकडी असून तिला दोन सर्पाकार भुजा आहेत व त्याची त्रिज्या अंदाजे १०,००० प्रकाशवर्षे आहे. ब्रह्मांडात काळ्या पदार्थाचा एक विशाल गोल आहे. ज्याला कृष्णविवर म्हणतात. जो १५०,००० प्रकाशवर्षांत पसरलेला आहे. जो दिसत नाही. इकडे अंतराळासंबंधीचे नवे संशोधन दृष्टी टाकते. यापूर्वी आपणास आकाशगंगेचा खरा आकार कळाला नव्हता. कारण हा काळा पदार्थ प्रकाश आणि उष्णतेचे शोषण करतो आणि नंतर तो बाहेर टाकला जात नाही असा अंदाज केला जातो की आपल्या ब्रह्मांडाचा ७०% भाग याच पदार्थापासून बनलेला आहे. आणखीन दोन लहान आकाश-गंगांचा पण शोध लागलेला आहे. त्यांच्याद्वारे आपणास ब्रह्मांडाची उत्पत्ती, विकास आणि रचनेवर नवा प्रकाश टाकता येईल.

अमेरिकन अवकाशयान गॅलिलिओने गुरूचा उपग्रह चंद्र युरोपावर विशाल हिमपल्व असल्याचा शोध लावला आहे. यावरून असे अनुमान काढता येते की त्याठिकाणी कोणत्या ना कोणत्या रूपात जीवसृष्टी असली पाहिजे. कारण या हिम खंडात पाणी, ऊर्जा आणि कार्बनिक रसायने आहेत. ४ जुलै १९९७ ला नासाने आपले रॉबट यान मंगळग्रहावर उतरविले. लवकरच त्याने मंगळाची छायाचित्रे पृथ्वीवर पाठविण्यास सुरुवात केली. रॉबटला पाथफाईंडरच्या माध्यमातून मंगळावर पाठविण्यास ७ महिने लागले. अमेरिकेच्या स्वातंत्र्यादिनाच्या दिवशी रॉबट तिथे उतरले. हे अत्यंत महत्त्वाचे असे यश होते. भविष्यात मानवाच्या मंगळावर उतरण्याच्या मार्गाची ती निश्चिती होती.

अवकाश संशोधनात मानवाची सतत प्रगतीच होत गेली ही समाधानाची बाब आहे. यामुळे आपले शास्त्रज्ञ, तांत्रिक तज्ज्ञ, त्यांची निष्ठा व कृतसंकल्प आपणास समजले. मूळ भारतीय असलेली कल्पना चावला पहिली अमेरिकन भारतीय नागरिक होती जिला स्पेस शटलमध्ये अवकाश प्रवासाची संधी मिळाली. अमेरिका व रशिया याबाबत एकमेकांना सहकार्य करतात. जगातील इतर काही विकसित राष्ट्रही त्यांच्यासोबत आहेत. उदा. अंतराळात एका मोठ्या स्पेस स्टेशनची कायमची स्थापना करण्यात आली आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply