स्त्यावरील अपघात  निबंध मराठी-Rastyavaril Apghat Nibandh Marathi
स्त्यावरील अपघात निबंध मराठी

Set 1: रस्त्यावरील अपघात मराठी निबंध – Rastyavaril Apghat Nibandh Marathi

अहो, ऐकलंत का? आपल्या शेजारचे काका आहेत ना, ते रात्रीच्या वेळेस मित्राच्या मागे स्कुटरवर बसून चालले होते. ते तिथं पुलाचं काम चाललंय ना तिथून. तर समोरून मोठा ट्रक आला. त्या ट्रकला वळसा घालून जाताना काय गोंधळ झाला कुणास ठाऊक पण त्यांच्या स्कुटरला अपघात होऊन काकांचा पायच स्कुटरखाली आला. नशीब वेळेवर मदत मिळाली म्हणून जीव तरी वाचला त्यांचा.” माधवीताई घरात सांगत होत्या. त्यावर वर्तमानपत्र वाचणारे श्रीधरकाका म्हणाले,” आज काल फारच होऊ लागलेत हो हे अपघात.

पूर्वी माणसं लढायांत मरायची, रोगराई होऊन मरायची. हल्ली अपघातात मरतात. ही ह्या वृत्तपत्रातली बातमी पाहा, शिर्डीला जाणा-या जीपला अपघात होऊन ती दरीत कोसळली आणि त्यात बसलेली सर्व माणसे मृत्युमुखी पडली. खरोखरच रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली, त्यांचा वेग वाढला आणि लोकांची नियम न पाळण्याची वृत्ती वाढली की अपघात जास्त होतात हे ठरलेलेच आहे.

रस्त्यांवर अपघात होऊ नयेत म्हणून सरकार सगळीकडे वाहतुकीच्या नियमांचे सूचनाफलक लावते. ‘पुढे वळण आहे’, ‘घाट सुरू झाला’, ‘अती घाई मसणात नेई’, ‘वाहने जपून चालवा’, ‘तुमची कुणीतरी घरी वाट पाहात आहे’ अशा प्रकारच्या त्या सूचना असतात. तसेच ह्या भागात जास्तीत जास्त किती किती वेग अपेक्षित आहे तेही फलकांवर लिहिलेले असते. हे सगळे नियम पाळले, आणि लक्षपूर्वक वाहन चालवले तर अपघात होण्याची शक्यता पुष्कळ कमी होते.

पूर्वी काही वाहनचालक मद्यपान करून वाहने चालवीतं. त्यामुळेही अपघातांची संख्या वाढत होती. आता कायद्याने त्यावर कठोर शिक्षा ठेवली आहे.

अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी काळजी घ्यायला हवी. त्यांनी आपल्या गाडीचे नियमित सर्व्हिसिंग करून घ्यायला हवे. त्यायोगे गाडीचे ब्रेक नीट आहेत ना? गाडीचे टायर झिजले नाहीत ना? टायरमध्ये व्यवस्थित हवा भरलेली आहे ना? गाडीचे आरसे नीट आहेत ना? ह्याचे निरीक्षण केले जाते आणि गरज असल्यास त्या त्रुटी सुधारल्या जातात.

तसेच वाहनचालकांनी आपल्या वाहनांचा विमा उतरणे आता अनिवार्य केले आहे. त्यामुळे अपघात झालाच तर विमा कंपनी अपघातग्रस्त व्यक्तीच्या इस्पितळाचा खर्च करते तसेच वाहनदुरूस्ती करण्याचा खर्चही उचलते. खरं तर अपघात ज्या माणसाला होतो त्या माणसावर त्याचं कुटुंब अवलंबून असेल तर ते कुटुंब आर्थिक संकटाच्या खाईत लोटले जाऊ शकते म्हणूनच वाहनाचा विमा काढणे आवश्यक आहे. तो जर काढला नसेल तर कायद्यानुसार शिक्षाही होऊ शकते. त्याशिवाय प्रत्येकाने वैयक्तिक अपघात-विमा काढणेही जरूरीचे आहे. कारण अपघात काही सांगून होत नसतो.

आजकाल लोकांचा सुखवस्तूपणा वाढला आहे, अधिक महागडी गाडी म्हणजे आपली शान वाढली असं समजलं जातं. पण त्यांना हे कळत नाही की ज्या प्रगत देशांचं आपण अनुकरण करू पाहतो, तेथील लोकसंख्या कमी असते, रस्तेही उत्तम दर्जाचे असतात, तुलनेने त्या रस्त्यांवर कमी गर्दी असते. आपल्या इथे तसं काहीच नसतं. उलट भ्रष्टाचारामुळं रस्त्याचा दर्जा कमी असतो, त्यावर वाहनांची आणि माणसांची पुष्कळ गर्दीही असते. त्याशिवाय सार्वजनिक वाहतुक व्यवस्थाही चांगली नसल्याने लोकांना खाजगी गाड्यांच्या वापराकडे वळावे लागते आणि साहजिकच मग अपघातही वाढतात.

म्हणूनच रस्त्यावरील अपघात टाळायचे असतील तर वाहनाची पुरेशी निगा राखली पाहिजे, चालकाने गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. त्याने मद्यपान करू नये आणि पुरेशी झोपही घ्यावी. म्हणजे रस्त्यावरील अपघात कमी होतील. तसेच वाहनाचा विमा आणि अपघात विमाही काढून ठेवावा म्हणजे नको तो दुर्दैवी प्रसंग ओढवलाच तर त्याला सामना देण्यासाठी आर्थिक आधार मिळेल.

Set 2: रस्त्यावरील अपघात मराठी निबंध – Rastyavaril Apghat Nibandh Marathi

वाहतुकीसाठी भारतात रस्ते फार लोकप्रिय आहेत. कारण अगदी लहान खेड्यापासून मोठ्या शहरापर्यंत सगळीकडे रस्ते आहेत. रस्त्यांमुळे संपूर्ण देश जोडला गेला आहे. रस्त्याने जाणे येणे जसे सोयीस्कर आहे तसेच स्वस्तही. परंतु भारतात रस्त्यांची स्थिती फार वाईट आहे. पावसाळ्यात तर ती अधिकच धोकादायक व दयनीय होऊन जाते. रस्त्यांची देखभाल आणि विकास यात भारत फारच मागासलेला आहे. रस्त्यांवरील वाहतूक खूप वाढली आहे. परंतु त्यानुसार रस्त्यांचा विकास झालेला नाही. परिणामी मोठया प्रमाणावर रोज शेकडो अपघात रस्त्यांवर होतात. त्यात प्राणहानी व वित्तहानी होते.

येथील रस्त्यांवर अनेक प्रकारची वाहने चालतात. उदा. ट्रक, मोटारी, बस, ट्रॅक्टर, टेम्पो, स्कूटर, सायकली, बैलगाड्या, पादचारी, घोडे, गाढवे इ. यापैकी काही जलद काही मंद तर काही अगदी हळू गतीची आहेत. गावांत, शहरांत बसमध्ये गर्दी असणे ही तर सामान्य गोष्ट आहे. दोन चाकी वाहनांवर कधीकधी ४ जणांचे संपूर्ण कुटुंब प्रवास करते. परिणामी गंभीर स्वरूपाचे अपघात होतात. वाहतुकीच्या नियमांचे नागरिकांकडून कडक पालन केले जात नाही.

रस्त्यांची स्थिती तर खराब आहेच पण त्याहीपेक्षा वाहनांची स्थिती वाईट आहे. ती जुनी व निरुपयोगी आहेत तरी त्यांचा वापर केला जातो. त्यांची वेळेवर दुरुस्ती केली जात नाही. योग्य निगा राखली जात नाही, ती खूप धूर सोडतात, ज्यामुळे प्रदूषण वाढते. अमर्याद वापरामुळे रस्ते व वाहने लवकर खराब होतात. रेल्वेमार्गावर पुष्कळ ठिकाणी क्रॉसिंग असतात पण तिथे फाटकाची सोय नसते वा देखरेख करणारा रेल्वे कर्मचारी नसतो. त्यामुळे असंख्य अपघात होतात. या सर्व कारणांमुळे भारतातील रस्त्यांवरून प्रवास करणे खूपच धोकादायक झाले आहे.

रस्त्यावरच कुठेही, कशीही वाहने उभी केली जातात. रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक जागेवर दुकाने, वर्कशॉप, घरे, खानावळी असतात. त्यामुळे वाहतुकीत अडथळे येऊन अपघात होतात. सांडपाण्याच्या नाल्या उघड्या असतात. रस्त्यावर खड्डे पडून वाहतुकीत अडथळे येतात.

रस्त्यांवरील अपघातांना आळा बसावा म्हणून अल्पकालीन व दीर्घकालीन योजना बनवून त्या अमलात आणाव्यात. रस्त्यांची सुरक्षितता हा विषय शालेय अभ्यासक्रमात असावा. रस्त्यांमध्ये वाढ करावी, नवे रस्ते बांधावेत, जुने दुरुस्त करावेत, त्यांची वरचेवर देखभाल करावी. वाहन चालकांना योग्य ते प्रशिक्षण दिले जावे. वेळोवेळी वाहन चालकांच्या परीक्षा घ्याव्यात. मंदगती वाहनांसाठी वेगळे रस्ते असावेत. वाहनांची गती, निगा, उपयुक्तता यांची तपासणी व्हावी. रस्ते व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी.

Set 3: रस्त्यावरील अपघात मराठी निबंध – Rastyavaril Apghat Nibandh Marathi

वाहतुकीसाठी भारतात रस्ते फार लोकप्रिय आहेत. कारण अगदी लहान खेड्यापासून मोठ्या शहरापर्यंत सगळीकडे रस्ते आहेत. रस्त्यामुळे संपूर्ण देश जोडला गेला आहे. रस्त्याने जाणे येणे जसे सोयिस्कर आहे तसेच स्वस्तही. परंतु भारतात रस्त्यांची स्थिती फार वाईट आहे. पावसाळ्यात तर ती अधिकच धोकादायक व दयनीय होऊन जाते. रस्त्यांची देखभाल आणि विकास यात भारत फारच मागासलेला आहे. रस्त्यांवरील वाहतूक खूप वाढली आहे. परंतु त्यानुसार रस्त्यांचा विकास झालेला नाही. परिणामी आपले रस्ते रक्तरंजित आहेत. रोज शेकडो अपघात रस्त्यांवर होतात. त्यात भरपूर प्राणहानी व वित्तहानी होते.

दरवर्षी अंदाजे ६०,००० लोकांचा रस्त्यांवरील अपघातात मृत्यू होतो. त्यापेक्षा किती तरी पटीने जास्त लोक जखमी व अपंग होतात. अमेरिकेच्या तुलनेत भारतात रस्त्यांवरील अपघातांत मरणारांची संख्या २५ पट जास्त आहे. रस्त्यांवर वाहुतकीचा पडणारा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. दरवर्षी अंदाजे ८.१० % रस्त्यांवरील वाहतुकीत वाढ होत आहे. १९५१ मध्ये भारतात ३ लाख मोटारी होत्या आता त्या ५४० लाख झाल्या आहेत. फक्त दिल्लीत ३ लाख वाहने असतील. वाहन-चालक वाहतुकीच्या नियमांचा भंग करतात. वाहन चांगल्या प्रकारे चालविता येत नसले तरी वाहन चालक परवाना दिला जातो. याच्याशी संबंधीत सर्व सरकारी कार्यालयांत सर्वात जास्त भ्रष्टाचार होतो.

एक अडचण ही पण आहे की येथील रस्त्यांवर अनेक प्रकारची वाहने चालतात. उदा. ट्रक, मोटारी, बस, ट्रॅक्टर, टेम्पो, स्कूटर, सायकली, बैलगाड्या, पादचारी, घोडे, मढ़वे इ. यापैकी काही जलद काही मंद तर काही अगदी हळू गतीची आहेत. गावांत शहरांत बसमध्ये गर्दी असणे ही तर सामान्य गोष्ट आहे. खेड्यातील लोक बसच्या टपावर बसून प्रवास करतात. दोन चाकी वाहनांवर कधीकधी ४ जणांचे संपूर्ण कुटुंब प्रवास करते. परिणामी गंभीर स्वरूपाचे अपघात होतात आणि वाहतूक अधिकारी त्याकडे डोळे झाक करतात. वाहतुकीच्या नियमांचे नागरिकांकडून कडक पालन करवून घेत नाहीत. वास्तविक वाहतुकीच्या नियम पालनाचा समावेश शाळेच्या पाठ्यक्रमातच असला पाहिजे. म्हणजे बालपणापासूनच नियमपालनाची सवय लागते. रस्त्यावरून चालावे कसे? वाहने कशी चालवातीत? वाहतुकीचे नियम कोणते इत्यादींची माहिती होते.

रस्त्यांची स्थिती तर खराब आहेच पण त्याहीपेक्षा जास्त वाहनांची स्थिती वाईट आहे. ती जुनी व निरुपयोगी आहेत तरी त्यांचा वापर केला जातो. त्यांची वेळेवर दुरुस्ती केली जात नाही. योग्य निगा राखली जात नाही, ती खूप धूर सोडतात, ज्यामुळे प्रदूषण वाढते, व इतर वाहनाचालकांना रस्ता नीट दिसत नाही. एका सर्वेक्षणानुसार ५०% वाहने भारतीय रस्त्यांवर चालण्यास निरूपयोगी आहेत अमर्याद बोजा लादल्यामुळे प्रवाशांना बढविण्यामुळे रस्त व वाहने लवकर खराब होतात रेल्वेमार्गावर पुष्कळ ठिकाणी चौक असतात पण तिथे फाटकाची सोय नसते व देखरेख करणारा रेल्वे कर्मचारी नसतो त्यामुळे असंख्य अपघात होतात

या सर्व कारणांमुळे भारतातील रस्त्यांवरून प्रवास करणे खूपच धोकादायक झाले आहे. बस व ट्रक चालकांना सामान्यपणे दारूची, अमली पदार्थाची सवय असते. त्याचे सेवन करूनच ते वाहने चालवितात. शिवाय ते कमी शिकलेले व मागास जातीचे असतात सतत १०/१२ तास वाहन चालवून थकून जातात धकल्यावर नशा करणे त्यांची सवय होते. कच्च्या, खराब रस्त्यांवर त्यांचा वाहनावरील ताबा सुटतो आणि मग अपघात होतो दुर्घटनेनंतर ते पळून जातात. कारण त्यांच्यात मानवता, दया, करुणा, सहकार्याची भावना नसते. शिवाय वाहनात प्रथमोपचाराची पेटी नसते. रस्त्याच्या जकळ दवाखाना, अॅम्ब्युलन्स, क्रेन आदींची सोय नसते. पोलिसांचा व्यवहारही असमाधानकारकच असतो.

रस्त्यावरच कुठेही, कशीही वाहने उभी केली जातात. रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक जागेवर दुकाने, वर्कशॉप, घरे, खानावळी असतात. त्यामुळे वाहतुकीत अडथळे येऊन अपघात होतात. सांडपाण्याच्या नाल्या उघड्या असतात. मेनहोलमधून घाण बाहेर येते. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून वाहतुकीत अडथळे येतात.

रस्त्यांवरील अपघातांना आळा बसावा म्हणून अल्पकालीन व दीर्घकालीन योजना बनवून त्या अमलात आणाव्यात. रस्त्यांची सुरक्षितता हा विषय शालेय अभ्यासक्रमात असावा. रस्त्यांमध्ये वाढ करावी, नवे रस्ते बांधावेत, जुने दुरुस्त करावेत, त्यांची वरचेवर देखभाल करावी. वाहन चालकांना योग्य ते प्रशिक्षण दिले जावे. वेळोवेळी वाहन चालकांच्या परीक्षा घ्याव्यान, मंदगती वाहनांसाठी वेगळे रस्ते असावेत वाहनांची गती. निगा, उपयुक्तता यांची तपासणी व्हावी. रस्ते व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणांना कडक शिक्षा करण्यात यावी. परंतु त्यासाठी संबंधित अधिकारी प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ असले पाहिजेत.

पुढे वाचा:

Leave a Reply