अन्न हे पूर्णब्रह्म निबंध मराठी-Anna He Purnabramha Marathi Nibandh
अन्न हे पूर्णब्रह्म निबंध मराठी

अन्न हे पूर्णब्रह्म निबंध मराठी – Anna He Purnabramha Marathi Nibandh

रोज जेवणाआधी आपण श्लोक म्हणतो,” वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जिवीत्वा अन्न हे पूर्णब्रम्ह, उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म.”

खरोखर मानवाची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे त्याची तब्येत हीच असते कारण तो शरीराच्या माध्यमातूनच जीवनातील सगळ्या गोष्टींचा आनंद लुटत असतो म्हणून आपल्या तब्येतीची काळजी घेणे फार आवश्यक आहे. त्यासाठी वेळेवर झोपणे, सकाळी वेळेवर उठणे, व्यायाम आणि योगसाधना करणे तसेच साधे आणि सकस अन्न खाणे फार महत्वाचे आहे.

अन्न हा आपल्या जीवनाचा खूप महत्वाचा भाग आहे. अन्नच खाल्ले नाही तर काही काळाने माणूस मरूनही जाऊ शकतो. अन्नामुळे आपल्याला ताकद मिळते. धावणे, खेळणे, चालणे, नाचणे, उड्या मारणे ह्या सर्व शारीरिक क्रियांसाठी उर्जा लागते एवढेच नव्हे तर श्वास घेण्यासाठी, हृदयाची, मेंदूची आणि पचनसंस्थेची कार्ये चालण्यासाठीही आपल्याला उर्जा लागते. ही सर्व उर्जा आपल्याला अन्नातून मिळते.

परंतु नुसते अन्न खाणे एवढेच महत्वाचे नसून आपण काय खातो हेदेखील तेवढेच महत्वाचे असते. आपल्याला अन्नातून कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ जसे हवे असतात तसेच जीवनसत्वे, क्षार आणि तंतुमय पदार्थही हवे असतात. हे सर्व घटक आपल्याला भाज्या आणि फळे ह्यांच्यातून मिळतात म्हणून आपल्या जेवणात त्यांचा समावेश असलाच पाहिजे.

अ, ब, क, ड आणि ई असे जीवनसत्वांचे प्रकार आहेत. अ जीवनसत्वाच्या अभावी रातांधळेपणा येतो. ब-१ ह्या जीवनसत्वाअभावी शरीर दुर्बळ होते, वजन कमी होते. ब-३ ह्या जीवनसत्वाच्या अभावी पेलेग्रा हा आजार होतो. क जीवनसत्वाच्या अभावी स्कहीं हा हिरड्यांचा आजार होतो. ड जीवनसत्व आणि कॅल्शियमच्या अभावामुळे मुडदूस किंवा रिकेट्स हा आजार होतो. ह्या आजारात हाडे अगदी ठिसूळ होऊन पायांना बाक येतो.

हे सर्व आजार टाळायचे असतील तर सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळभाज्या आपल्या जेवणात हव्यात. पालेभाज्या, बीट, गाजर ह्यांच्यात अ जीवनसत्व आणि लोह असते. मेथीमध्ये ई जीवनसत्व असते. टॉमेटो, लिंबू, आवळा आदी पदार्थांत क जीवनसत्व असते. त्याशिवाय फळांमध्ये कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम आदी शरीराच्या निकोप वाढीसाठी लागणारे क्षार असतात. शिवाय पचन चांगले व्हायला हवे असले तर तंतूयुक्त चोथा लागतो. हे सर्व आपल्याला भाज्या आणि फळे ह्यांच्या सेवनातून मिळते. म्हणून त्यांचा आपल्या आहारात अवश्य समावेश असायला हवा.

हल्ली बरेच लोक जीवनसत्वांच्या गोळ्या घेतात परंतु थेट अन्नातून पोटात गेलेलीजीवनसत्वे आणि क्षारच अधिक कामी येतात.

म्हणूनच आपण अन्नाला पूर्णब्रम्ह असे मानले आहे.

अन्न हे पूर्णब्रह्म

पुढे वाचा:

Leave a Reply