बकरी ईद माहिती मराठी – Bakra Eid Information in Marathi
बकरी ईदला ‘ईद-उल्-जुहा’ असेही म्हणतात. मुसलमान कालगणनेतील जिलहिज्ज या बाराव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद असते. हा आनंदाचा सण मानला जातो.
फार फार वर्षांपूर्वी अल्लाने इब्राहिम नावाच्या आपल्या भक्ताला आदेश दिला की, त्याने आपल्या सगळ्यांत आवडत्या वस्तूचा बळी द्यावा. इब्राहिमने ठरवले की, आपला लाडका मुलगा इस्माईल हीच आपली सगळ्यांत आवडती वस्तू आहे.
इब्राहिमने इस्माईलला बळी देण्याची तयारी केली, आपले डोळे बांधले आणि त्याच्यावर तलवारीचा वार केला. पण डोळे उघडल्यावर त्याला असे दिसले की, बळी एका मेंढ्याचा गेला आहे आणि इस्माईल सुखरूप आहे. अल्लाने भक्ताची परीक्षा घेतली होती व भक्त परीक्षेत यशस्वी झाला होता. अरबस्तानात मक्का येथे मीना नावाच्या ठिकाणी ही पहिली कुर्बानी झाली.
या कथेची आठवण म्हणून मुसलमान लोक बकरी ईदच्या दिवशी खास नमाज पढतात व बकरे, मेंढे इत्यादी प्राण्यांचा बळी देतात. त्यास ‘कुर्बानी’ म्हणतात. त्या प्राण्यांचे मांस नंतर नातेवाईकांत व गरिबांत वाटण्यात येते.
अल्लाच्या म्हणजे देवाच्या भक्तीसाठी आपल्या अत्यंत प्रिय वस्तूचासुद्धा त्याग केला पाहिजे, अशी बकरीईदची शिकवण आहे.
रमजान ईद व बकरी ईद याव्यतिरिक्त पैगंबर महंमद यांचा जन्मदिन- रब्बी-उल्-अव्वल या तिसर्या महिन्यातला बारावा दिवस- हा ईद-ए-मिलाद म्हणून पाळला जातो. या दिवशी मशिदींमध्ये खास नमाज पढला जातो. प्रेषिताच्या जीवनाबद्दल भाषणे दिली जातात. घरे, दुकाने व मशिदी सजवल्या जातात व मिरवणुका काढल्या जातात. काही लोक उपवासही करतात. भारतात मुस्लिम भाविक पैगंबराच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून फतिहा पढतात.
पुढे वाचा:
- मोहरमची संपूर्ण माहिती
- पतेती सण माहिती मराठी
- गुरू नानक जयंती विषयी माहिती
- बुद्ध पौर्णिमा माहिती मराठी
- भगवान महावीर जयंती माहिती
- दत्तजयंती माहिती मराठी
- धनत्रयोदशी माहिती मराठी
- नवरात्र – दसरा माहिती मराठी
- गणेश चतुर्थी माहिती मराठी
- बैल पोळा सणाची माहिती
- नारळी पौर्णिमा माहिती मराठी
- नागपंचमी माहिती मराठी
- गुरुपौर्णिमा विषयी माहिती मराठी
- आषाढी एकादशी माहिती
- वटपौर्णिमा संपूर्ण माहिती
- हनुमान जयंती माहिती
- गुढीपाडवा माहिती
- होळी सणाची माहिती
- दिवाळी सणाची माहिती
- रामनवमी माहिती मराठी