Set 1: रमजान ईद निबंध मराठी – Ramzan Eid Nibandh in Marathi

हा मुस्लीम बांधवांचा एक आवडता सण आहे. या सणाला ‘ईद-उल-फित्र‘ म्हणतात. हा प्रसन्नतेचा, आनंदाचा सण आहे.

या दिवशी मुस्लीम बांधव आपले घर सजवतात. घरातील सर्वांना नवीन कपडे घेतले जातात. या दिवशी लोक सकाळी लवकर उठतात व स्नान करतात. मग मशिदीत जाऊन नमाज पढतात. एकमेकांना मिठी मारून ‘ईद मुबारक’ म्हणतात आणि शुभेच्छा देतात.

ईदपूर्वी महिनाभर मुस्लिम बांधव रोजे पाळतात. रोजे म्हणजे उपवास. या काळात ते दिवसा काहीही खात नाहीत, पाणीसुद्धा पीत नाहीत. ते सूर्यास्तानंतर व सूर्योदयापूर्वी जेवण करतात.

या सणाच्या दिवशी गोरगरिबांना दानधर्म केला जातो. आपापसांत स्नेह निर्माण करणारा असा हा सण आहे.

Set 2: रमजान ईद निबंध मराठी – Essay On Eid in Marathi

रमजान ईद हा मुस्लीम बांधवांचा एक प्रमुख सण आहे. यालाच ईद-उल-फित्र असेही म्हणतात. ईद म्हणजे प्रसन्नता किंवा आनंद. हा सण चंद्रदर्शनानंतरच साजरा केला जातो.

ईद सण आला की, मुस्लीम बांधवांमध्ये उत्साहाचे, आनंदाचे वातावरण असते. या सणासाठी सर्वजण आपले घर स्वच्छ करतात. घर सजवून सर्वत्र सुगंधी वातावरण निर्माण करतात. सणाच्या निमित्ताने घरातील सर्वांना नवीन कपडे घेतले जातात.

या दिवशी लोक पहाटे उठतात आणि शुचिर्भूत होऊन नवीन कपडे घालतात. नंतर इदग्याच्या ठिकाणी जाऊन नमाज पढतात आणि सर्वांना गळ्यात गळा घालून भेटतात. ‘ईद मुबारक’ असे म्हणून शुभेच्छा देतात. रमझान ईदच्या निमित्ताने शिरकुर्मा, शेवया हे गोड पदार्थ केले जातात.

दुसऱ्याला मदत करा, दुसऱ्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हा, आपल्या वागण्यात दया, संयम, ममत्व, करुणा हे गुण येऊ दया, असा संदेश ईद सर्वांना देते. ईदच्या दिवशी दानधर्माला महत्त्व असते. या दिवशी घरातील मोठी माणसे लहान मुलांना काही रक्कम भेट म्हणून देतात. त्याला ‘ईदी’ असे म्हणतात.

Set 3: ईद मराठी निबंध – Eid Essay in Marathi

ईद हा सण मुसलमानांत पाळला जातो. एकुण दोन प्रकारचे ईदचे सण असतात. ईद-उल फित्र आणि ईद उल जुहा किंवा बकरी ईद अशी त्या सणांची नावे आहेत.हे दोन्ही सण मुसलमानांनी केले पाहिजेत असे कुराणात लिहिले आहे.

रमझान हा मुस्लिम दिनदर्शकातील नववा महिना आहे. मुसलमानांच्या दृष्टीने हा महिना खूप पवित्र असतो, कारण त्यांच्या धर्माचे संस्थापक मोहम्मद ह्यांना ह्याच महिन्यात साक्षात्कार झाला होता आणि अल्लाने त्यांना ज्ञान दिले होते. ह्या काळात सूर्यादयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करायचा असतो. ह्या उपवासाला रोजा असे म्हणतात.

रमझान महिना संपला की रोजे संपतात. त्या दिवशी ईद उल फित्र हा सण साजरा केला जातो. ह्या सणाला सर्व जण नवेनवे कपडे घालतात, नातेवाईकांना भेटतात आणि मिष्टान्न भोजन करतात. ह्या दिवशी दानधर्मही केला जातो. त्याशिवाय आणखीही एक ईदचा सण मुसलमान धर्मामध्ये आहे. त्याचे नाव आहे ईद उल अधा ईद उल अधा किंवा ईद उल जुहा ह्या सणाला भारतीय उपखंडात बकरी ईद असे म्हटले जाते.

कारण ह्या दिवशी कुर्बानी म्हणून बक-याचा बळी दिला जातो. त्या मागील कहाणी अशी आहे की अल्लाने दिलेल्या आज्ञांचे पालन करण्यासाठी अब्राहमने आपला पुत्र इस्माईल ह्याचा बळी दिला. त्याने दिलेली ती सर्वश्रेष्ठ कुर्बानी होती. त्या प्रसंगाची आठवण म्हणून जगभरातील मुसलमान बक-याचा बळी देऊन ईद उल जुहा हा सण साजरा करतात.

Set 4: रमजान ईद निबंध मराठी – Ramzan Eid Nibandh in Marathi

जगभरातील मुसलमान ईदचा सण पाळतात. ह्या दिवशी चंद्रदर्शनाला फार महत्व दिले जाते. मला ह्या सणाची विशेष माहिती नव्हती म्हणून मी माझ्या वडिलांचे मित्र मोहम्मद शेख ह्यांना ह्या सणाची माहिती विचारली. ते मला म्हणाले की एकुण दोन प्रकारचे ईदचे सण असतात. ईद- उल फित्र आणि ईद उल जुहा किंवा बकरी ईद अशी त्या सणांची नावे आहेत.

हे दोन्ही सण सर्व मुसलमानांनी केले पाहिजेत असे कुराणात लिहिले आहे. रमझान हा मुस्लिम दिनदर्शकातील नववा महिना आहे. मुसलमानांच्या दृष्टीने हा महिना खूप पवित्र असतो, कारण त्यांच्या धर्माचे संस्थापक मोहम्मद ह्यांना ह्याच महिन्यात अल्लाने संदेश दिला होता. ह्या काळात सूर्यादयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करायचा असतो. ह्या उपवासाला ‘रोजा’ असे नाव आहे. रमझान महिना संपला की रोजे संपतात. त्या दिवशी ईद उल फित्र हा सण साजरा केला जातो. ह्या सणाला सर्व लोक नवेनवे कपडे घालतात, नातेवाईकांना भेटतात आणि मिष्टान्न भोजन करतात. ह्या दिवशी दानधर्मही केला जातो. त्याशिवाय आणखीही एक ईदचा सण मुसलमान धर्मामध्ये आहे. त्याचे नाव आहे ईद उल अधा.

ईद उल अधा किंवा ईद उल जुहा ह्या सणाला भारतीय उपखंडात बकरी ईद असे म्हटले जाते. कारण ह्या दिवशी कुर्बानी म्हणून बक-याचा बळी दिला जातो. त्या मागील कहाणी अशी आहे की अल्लाने दिलेल्या आज्ञांचे पालन करण्यासाठी अब्राहमने आपला पुत्र इस्माईल ह्याचा बळी दिला. त्याने दिलेली ती सर्वश्रेष्ठ कुर्बानी होती. त्या प्रसंगाची आठवण म्हणून जगभरातील मुसलमान बक-याचा बळी देऊनईद उल जुहा हा सण साजरा करतात.

ह्या सणाच्या दिवशी त्या बक-याचे गोश्त सर्वांना वाटतात. तसेच शीर कुर्माही करून सर्वांना देतात. अशी मौजमजा ह्या सणाला असते.

Set 5: रमजान ईद निबंध मराठी – Ramzan Eid Nibandh in Marathi

जगात भारत हा एकच असा देश आहे जेथे अनेक धर्मांचे लोक एकत्र राहतात. सर्वांचे देव वेगवेगळे आहेत. ज्याप्रमाणे हिंदूचे प्रसिद्ध सण दसरा, दिवाळी, होळी वगैरे आहेत. त्याचप्रमाणे मुसलमानांचा प्रसिद्ध सण ईद आहे. हा सण वर्षातुन दोनदा साजरा केला जातो. त्यांच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा सण आहे. मुसलमान धर्माचे संस्थापक . महंमद पैगंबर यांच्या जन्मदिवशी हा सण साजरा करतात. महंमद पैगंबराचा जन्म ५७० इ० मध्ये अरबस्तानातील मक्का येथे झाला होता. हजरत साहेबांनी आपल्या कार्याने मुसलमान धर्माला एक मार्ग दाखविला. मुसलमानांचा पवित्र ग्रंथ ‘कुराण’ आहे. पैगंबराचा उपदेश वर्णिला आहे.

ईद या धार्मिक सणाची तयारी एक महिना आधीपासून केली जाते. त्यात पूर्ण महिनाभर पैगंबराच्या आठवणीत उपवास करतात. दिवसातून पाच वेळा नमाज पढतात. हा महिना रमजानचा महिना असतो. या दिवसात अनेक मुस्लीम बांधव मक्केच्या यात्रेला जातात. रमजानची समाप्ती ईदने होते. यादिवशी मशिदीत जाऊन नमाज पढतात. ईदच्या शुभेच्छा देतात. दुकाने, बाजार ईदच्या दिवशी नव्या नवरीसारखे सजलेले असतात. या जत्रेची शोभा अवर्णनीय असते. या ईदनंतर ‘ईद-उल-फितर’ येते. यानंतर दोन महिने नऊ दिवसांनंतर चंद्राच्या १० तारखेला “ईद-उल-जुहा” येते. तिला बकरी ईद म्हणतात. या दिवशी बकऱ्याला बळी देऊन त्याचे मांस मित्रांना नातेवाईकांना वाटतात. ईदच्या दिवशी सार्वजनिक सुटी असते. पंतप्रधान व राष्ट्रपती प्रसार माध्यमांद्वारे मुसलमान बांधवांना शुभेच्छा संदेश देतात. हा दिवस हजरत इस्माईल यांच्या बलिदानासाठी साजरा केला जातो.

मुसलमानांसाठी ईद हर्ष, उमेद, देणारा सण आहे. ज्यात सर्व जण शत्रुत्व विसरून एकत्र येतात. एकमेकांच्या यशासाठी प्रार्थना करतात. या शुभप्रसंगी मुसलमान आपल्या नव्या कार्याला आरंभ करतात. ईदचा सण शिकवण देतो की, पैगंबराने दाखविलेल्या मार्गावरच चालावे आणि त्यांच्या उपदेशाचे पालन करावे उच्च-नीच भदभाव करू नये.

Set 6: रमजान ईद निबंध मराठी – Ramzan Eid Nibandh in Marathi

ईद म्हणजे सणच. परंतु हा सण असतो मुस्लिम बांधवांचा. तशा तर मुस्लिम बांधव दोन ईद साजरे करतात. एक रमजान ईद व दुसरी बकरी ईद. पण रमजान ईद म्हणजेच मोठी ईद होय.

हे बांधव या ईदपूर्वी एक महिना संपूर्ण दिवस उपास करतात व सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतरच जेवण करतात. दिवसभर ते पाणीही पित नाहीत. यालाच ‘रोजे’ म्हणतात.

या ईदला सगळे मुस्लिम बांधव नवीन कपडे घालून डोळ्यात सुरमा घालून सकाळी मशिदीत जाऊन नमाज पढतात. संपूर्ण महिन्यात कुराण शरीफ या पवित्र ग्रंथाचे पठणही करतात. या दिवशी घरात शिरकुर्मा हा खिरीसारखा गोड पदार्थ बनवितात.

या दिवशी हे लोक एकमेकांना ईद मुबारक अशा शुभेच्छा देतात. आपल्या मित्र मंडळींना घरी बोलावून शिरकुर्मा खायला देतात व आनंद साजरा करतात.

रमजान ईद निबंध मराठी – Ramzan Eid Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply