बेडूक – माणसाचा मित्र निबंध मराठी

पावसाळ्याच्या सुमारास एक विचित्र आवाज कानावर पडतो, तो असतो डराँव ऽ डराँव! आवाजाचा वेध घेतल्यावर एक ओंगळ प्राणी नजरेस पडतो. हा प्राणी दिसावयास विचित्र असला, तरी तो माणसांचा हितचिंतक आहे. हा प्राणी आहे बेडूक.

बेडूक हा जलचर आणि स्थलचर असा प्राणी आहे. काही बेडूक झाडावरही चढतात. बेडकांची कातडी कोरडी पडली तर बेडूक मरतात म्हणून त्यांना सतत पाण्याजवळ किंवा पाण्यात राहावे लागते. उन्हाळ्यात बेडूक ओलसर जमिनीत खूप खोल खणतात आणि तिथे जाऊन बसतात.

काही किडे-कीटक पिकांची नासाडी करतात. बेडूक या किडे-कीटकांना खातात. उंदीर शेतातील पिकांचा फडशा पाडतात. पण शेतात बेडूक असले, तर ते उंदरांचा फडशा पाडतात. अशा प्रकारे बेडूक पिकांचे रक्षण करतात. विहिरीत घातक जीवजंतू असतात. बेडूक त्यांना खातात आणि पाणी शुद्ध करतात. असा हा बेडूक प्राचीन काळापासून माणसाचा मित्र आहे.

पुढे वाचा:

Leave a Reply