फळांची उपयुक्तता मराठी निबंध – Importance of Fruits Essay in Marathi
आपल्या जीवनात फळांना खूप महत्त्व आहे. आरोग्याच्या दृष्टीने फळे खाणे चांगले असते. आपल्या शरीरातील व्हिटॅमिन, कॅल्शियमची कमी ते पूर्ण करतात. एक प्रसिद्ध म्हण आहे, “रोज एक सफरचंद खा, रोगांना आपल्यापासून दूर ठेवा!” म्हणजेच, रोजच्या आहारात फळांचा समावेश केल्यास आरोग्य चांगले राहते.
माणसाने नेहमी फळे खाल्ली पाहिजेत. फळे मोसमानुसार व ताजी खावीत कारण ती पौष्टिक असतात. फळे वाळल्यास त्यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात. फळे नीट पाहून, पारखून घेतली पाहिजेत. कापलेली, सडलेली, झाडावरून खाली पडलेली फळे खाऊ नयेत. त्यात जंतू असण्याची शक्यता असते. बाजारात मिळणारी, सोललेली, कापलेली, फळे खाऊ नयेत कारण त्यावर जंतू बसलेले असतात. अशी फळे खाल्ल्यास अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.
फळांचे उत्पादन वाढविण्यासाठी शास्त्रज्ञ वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. नव-वीन जातींची निर्मिती केली जात आहे. त्यांची आयात-निर्यातसुद्धा केली जाते. यामुळे नवीन प्रकारची फळे उपलब्ध होतात. परंतु आजकाल फळांचा रोगजतूंपासून बचाव करण्यासाठी त्यावर कीटकनाशकांची फवारणी केली जाते. कधी-कधी फळे सुंदर दिसण्यासाठी त्याला रंग दिला जातो. ज्यामुळे ग्राहक त्याकडे आकर्षित व्हावेत. परंतु ही कीटकनाशके किंवा रंग फळांच्या आत पोहोचतात व आपल्या शरीरास धोकादायक असतात. सरकारने यावर प्रतिबंध लावले पाहिजेत. फळे त्याच्या नैसर्गिक रूपातच जनतेपर्यंत पोहोचली पाहिजेत.
आता प्रत्येक मोसमातील फळे तो मोसम नसतानासुद्धा वर्षभर मिळू शकतात. फळांचे जॅम, जेली, स्क्वॅश बनवून वर्षभर खाता येतात. त्यामुळे कोणत्याही फळांचा आनंद वर्षभर घेता येतो. परंतु मोसमात मिळणारी फळे खाणेच हितकारक आहे. कारण ती रसाळ व स्वादिष्ट असतात. शीतगृहांत ठेवलेल्या फळांत ही गुणवत्ता नसते. आपल्या रोजच्या आहारात फळांचा समावेश असणे आवश्यक आहे.
पुढे वाचा:
- प्रदूषण एक समस्या मराठी निबंध लेखन
- पृथ्वीवर प्रदूषणाचे दुष्परिणाम
- ध्वनि प्रदूषण मराठी माहिती
- मृदा प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती
- पूरग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध
- हवा प्रदूषण मराठी माहिती
- राष्ट्रध्वजाचे मनोगत निबंध
- शाळेतील क्रीडांगणाचे मनोगत
- वर्गातील फळ्याचे मनोगत
- आंब्याचे झाडाचे मनोगत
- भूकंपग्रस्ताचे मनोगत
- परिश्रमाचे महत्त्व निबंध मराठी
- निःशस्त्रीकरण निबंध मराठी