प्रदूषण एक समस्या मराठी निबंध लेखन – Pradushan Ek Samasya Nibandh Marathi

मानवासहित सर्व सजीव प्राणी वनस्पतींना जगण्यासाठी संतुलित वातावरणाची आवश्यकता असते. संतुलित वातावरणात सर्व घटक एका निश्चित प्रमाणात असतात. परंतु जेव्हा वातावरणात या घटकांची उणीव निर्माण होते किंवा त्यात हानिकारक घटक आपल्या मिसळतात तेव्हा वातावरण प्रदूषित होते व मानवासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नुकसानकारक ठरते. आज संपूर्ण जग प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रदूषणाने घर केले आहे आणि आपण पूर्णपणे त्याच्या मुठीत गेलो आहोत.

प्राचीन काळात ही समस्या इतकी बिकट नव्हती. त्यावेळी प्रदूषणाचे नामोनिशाण नव्हते. निसर्गात एक प्रकारचे संतुलन होते. हवा, पाणी शुद्ध होते. पृथ्वीची उत्पादन शक्ती जास्त होती. हळूहळू लोकसंख्या वाढली. मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नित्य नवे कारखाने उघडू लागले. औद्योगिकीरणाच्या स्पर्धेत प्रत्येक राष्ट्र धावू लागले. ऐषआरामाच्या उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी भूगर्भातील बहुमूल्य संपत्ती खेचून बाहेर काढली जाऊ लागली. नैसर्गिक संपत्ती नष्ट होताच भूगर्भातील कोळसा, खनिजतेल, धातू यांचे वायुरूपात परिवर्तन होऊन संपूर्ण वातावरणाला व्यापून टाकेल आणि मग मानवाला जगणे मुश्किल होईल.

लोकसंख्येच्या वाढीमुळे निवासस्थानांचे संकट उत्पन्न झाले आहे. परिणामी लहान लहान भूखंडांवर लहान लहान घरे उभारली जात आहेत. दहा दहा मजली उंच इमारती तयार होत आहेत. या घरांमधे सूर्यप्रकाश व शुद्ध हवेचा अभाव असतो. जंगल कटाई करून राहण्यासाठी जागा उपलब्ध केली जात आहे. मानव स्वतःच या प्रदूषणाला कारणीभूत आहे. समुद्राला अमर्याद शक्तीचा स्वामी समजून सर्व कचरा समुद्रात टाकला जात आहे. नद्यापण आपले प्रदूषित पाणी समुद्रात मिसळतात. शास्त्रज्ञांनी सावधगिरीचा इशारा देऊनही औद्योगिक घटकांद्वारे केरकचरा समुद्रात टाकणे बंद न झाले तर लवकरच त्यातील मासे मरतील. सध्या हजारो जहाजे व पेट्रोलियम टॅकर्सची समुद्रातून वाहतूक होते. एकीकडे हे मानवाला प्रगतीकडे घेऊन जातात. तर दुसरीकडे लाखो टन पेट्रोलियमच्या गळतीमुळे किंवा अपघातामुळे समुद्राच्या पाण्यावर ते पसरते. समुद्राच्या पर्यावरणासाठी हा मोठा धोका आहे. या तेलात अनेक किमती धातू उदा. शिसे, निकेल, मँगेनीज इत्यादी असते. जे जीवजंतू किंवा वनस्पतीद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश करून त्याचे नुकसान करते. नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे बिकट संकट विक्राळ रूप धारण करीत आहे.
.
ध्वनिप्रदूषणामुळे मानवाची श्रवणशक्ती क्षीण होते. त्यामुळे चिडचिडेपणा, थकवा, निद्रानाश, श्वासाचे रोग उत्पन्न होतात. शहरांची लोकसंख्या दिवसेदिवस वाढतच जात आहे. ग्रामीण जनतेचे शहरांकडे होणारे पलायन. शहरी जीवन कष्टमय बनवीत आहे. जो जो लोकसंख्येची घनता वाढते तो तो वाहुकीच्या साधनांत वाढ होते. इंधनावर चालणाऱ्या या वाहनांमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे वायुप्रदूषण होते. ज्यामुळे श्वासाचे अनेक रोग उद्भवतात उदा. फुप्फुसाचा कॅन्सर, दमा, खोकला, सर्दी इत्यादी वायुप्रदूषण मंदगतीने विषाचेच कार्य करते. परंतु भोपाळ वायू दुर्घटनेत निघालेला “मिथाईल आइसो सायनाईड” मुळे हजारो लोक तात्काळ मृत्यू पावले. जे लोक मेले ते मुक्त झाले पण जे वाचले ते कणाकणाने मरण्यासाठी आणि विकसनशील राष्ट्रातील विज्ञानाचा शाप सहन करण्यास विवश झाले.

औद्योगिकीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तिमुळे कारखान्यांतून निघणारे विषारी वायू हवा विषमय करतात. कारखान्याजवळ लावलेल्या झाडांवर काजळीची पुटे चढ़तात. मग तेथेच वास्तव्य करणाऱ्या लोकांबद्दल काय? अल्ट्राव्हायोलेट (अतिनील) किरणांपासून पृथ्वीला वाचविणाऱ्या ओझोनलाही छिद्र पडले आहे.

निसर्गाशी मानवाचा अयोग्य व्यवहार या समस्येला आणखीनच गंभीर करतो. जंगल कटाई करणे, उद्याने उजाडणे आणि वातावरण शुद्ध ठेवणाऱ्या झाडांना नष्ट करणे हा मानवाचा स्वभावच बनला आहे. जर आता वृक्षारोपण मोहीम वेगाने चालविली नाही तर प्रदूषण हा एक असाध्य रोग बनेल. आज शेतीव्यवसायाचे यांत्रिकीकरण झाले आहे. त्यामुळेही पर्यावरणाचे प्रदूषण होते. अधिक उत्पादनासाठी शेतात लाखो टन रासायनिक खते टाकली जातात व कीटकनाशके फवारली जातात. वाढत्या शेतीउत्पादनासाठी मानवाला खूप मोठी किंमत चुकवावी लागते. हीच रसायने हळूहळू अन्नाद्वारे आपल्या पोटात जातात व अनेक रोगांचे कारण बनतात.

आजकाल ग्राहकांना आकषून घेण्यासाठी फळे, धान्ये इत्यादींना ला कृत्रिम रंग दिले जातात. हे रंग आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. संपूर्ण पृथ्वी प्रदूषित करून मानवाला चैन पडले नाही म्हणून त्याने खाद्य पदार्थही दूषित करण्यास सुखात केली. तापमानाचे प्रदूषण होणे पण मानवासाठी घातक आहे. वातावरणाचे तापमान वाढले की हिमखंड वितळू लागतात. जर बर्फाचे पर्वत वितळू लागले तर संपूर्ण पृथ्वी जलमय होईल.

ही समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ विचार करीत आहेत. अनेक प्रत्यत्नानंतर थोडेसे यश मिळाले आहे. दाट लोकसंख्येपासून कारखाने दूर नेले जावेत. विषारी वायू जाण्यासाठी उंच चिमण्या बसविण्यात याव्यात. विषारी वायू बाहेर निघण्यापूर्वीच नष्ट करण्यात यावेत. केरकचऱ्याचा उपयोग जमिनीच्या भरावासाठी करण्यात यावा, पिकांवर जास्त प्रमाणात कीटकनाशके फवारू नयेत, नैसर्गिक रूपात धान्य ग्राहकाला मिळावे, गावांतून शहरांकडे जाणाऱ्या बुद्धिजीवींचे पलायन थांबविण्यासाठी गावातच रोजगार उत्पन्न करुन द्यावा. वृक्षतोड बंद करून वृक्षारोपण मोहीम राबवावी. कारखान्यांतील सांडपाण्याचे शुद्धीकरण करावे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करावे. बायोडिग्रेडेबल गॅसचा वापर करावा.

जगात सर्वात जास्त चर्चा प्रदूषणाची होते. शास्त्रज्ञ प्रदूषण थांबविण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. प्रत्येकाने या कामात मदत केली पाहिजे. जर असे केले नाही तर स्वर्गापेक्षाही प्रिय असणाऱ्या पृथ्वीची स्थिती कशी होईल ते आपण जाणतोच.

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध लेखन – Pradushan Ek Samasya Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply