शाळेची बस निबंध मराठी – School Bus Essay in Marathi

माझी शाळा घरापासून सहा किलोमीटर अंतरावर आहे. परंतु घराजवळ एवढी चांगली शाळा दुसरी नसल्यामुळे मला इतक्या लांबच्या शाळेत जावे लागते. रोजचे अंतर पायी चालत जाता येण्यासारखे नसल्यामुळे मी शाळेच्या बस ने जातो.

शाळेला बसने जायला मला आवडते कारण बसमध्ये मला मित्र भेटतात. आम्ही एकमेकांशी गप्पा मारत जातो त्यामुळे वेळ कसा जातो ते कळतच नाही. खरे तर मला शाळेच्या वेळेआधी एक तास निघावे लागते. संध्याकाळी रस्त्यावरील वाहतुकीमुळे कधीकधी घरी परत यायला दीड तासही लागतो तेव्हा मात्र मला कंटाळा येतो.

शाळेच्या बसच्या ड्रायव्हरकाकांचे नाव केरूमामा आहे. ते फार चांगले आणि प्रेमळ आहेत. त्याशिवाय आम्ही लहान मुले बसमध्ये असल्यामुळे हीराताई नावाच्या बाई आमची काळजी घ्यायला बसमध्ये असतात.

काही काही मुले खूप दंगा करतात आणि खिडकीतून हात बाहेर काढतात तेव्हा हीराताई त्यांना ओरडते.

मी एकदा दमून बसमध्येच झोपून गेलो तेव्हा माझी उतरायची जागा आली ते मला कळलेच नाही. परंतु हीराताईने मला उठवले. नाहीतर माझी वाटच लागली असती. अशी माझी शाळेची बस मला खूप आवडते.

पुढे वाचा:

Leave a Reply