क्रॉस-कंट्री माहिती मराठी, Cross Country Race Information in Marathi
क्रॉस-कंट्री माहिती मराठी, Cross Country Race Information in Marathi

क्रॉस-कंट्री माहिती मराठी – Cross Country Race Information in Marathi

शर्यत जगातील विविध देशांतील हंगाम‚ हवामानाची स्थिती‚ धावण्याचे अंतर इत्यादी बाबतींत विविधता असल्याने क्रॉस-कंट्री शर्यतीचे निश्चित नियम करणे अवघड आहे. पुढील मार्गदर्शनपर नियमांचा वापर करून स्पर्धा घ्यावी :

१) शक्यतो हिवाळ्यात‚ मैदानी स्पर्धांचा मोसम संपल्यावर क्रॉस-कंट्री स्पर्धा घ्यावी.

२) स्पर्धा रस्त्यावर न घेता शेतातून‚ गवताळ रानातून घ्यावी. मार्गावर काही भाग नांगरलेला असावा.

३) स्पर्धेचा मार्ग निश्चित करण्यासाठी मार्गाच्या डाव्या बाजूस तांबडी निशाणे व उजव्या बाजूस पांढरी निशाणे लावावीत. ही निशाणे १२५ मी. अंतरावरूनही दिसावीत.

४) शर्यतीच्या मार्गावर अवघड उंचवटे‚ धोकादायक चढ व उतार आणि खोल खड्डे टाळावेत.

५) स्पर्धकांना अडथळा येऊ नये म्हणून पहिल्या १५०० मी. अंतरात फारसे अडथळे नसावेत.

६) शर्यतीच्या अंतराची कल्पना व धावण्याच्या मार्गाचे वर्णन स्पर्धकांना अगोदरच कळवले गेले पाहिजे.

७) मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी मार्ग दाखविण्यासाठी मार्गदर्शक नेमावेत.

८) पुरुषांसाठी स्पर्धेचे अंतर १२ कि.मी असावे. महिलांसाठी हे अंतर ६ कि.मी. असावे. ज्यूनिअर मुलांसाठी ८ कि.मी. असावे.

९) खेळाडूंना वैयक्तिक स्पर्धक किंवा संघ म्हणून भाग घेता येईल.

पुरुष संघात जास्तीतजास्त १२ खेळाडू असतील‚ त्यांपैकी किमान ६ व कमाल ९ खेळाडू स्पर्धेत भाग घेऊ शकतील आणि त्यांपैकी सहा खेळाडूंच्या गुणांचीच नोंद होईल.

महिला व ज्यूनिअर मुलांच्या संघात जास्तीतजास्त ८ खेळाडू असतील. त्यांपैकी ६ स्पर्धेत भाग घेऊ शकतील. त्यांपैकी ४ स्पर्धकांच्या गुणांची नोंद होईल.

१०) स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ५ मिनिटे अगोदर स्पर्धा सुरू होण्याबद्दल सूचना दिली जाते.

११) स्पर्धकाला उपाहार किंवा इतर मदत मिळणार नाही.

पुढे वाचा:

Leave a Reply