थाळी फेक माहिती मराठी – Thali Fek Game Information in Marathi
१) थाळीफेक वर्तुळातून करावयाची असते. (आकृती)
वर्तुळाचा व्यास – | २.५० मी. |
सेक्टरचा कोन – | ३४.९२० |
वर्तुळाबाहेरील धातूचे कडे – | जाडी ६ मि.मी. |
कड्याला पांढरा रंग दिलेला असावा.
थाळी फेक मैदान आकृती
२) थाळीचे वजन व थाळीचा व्यास
थाळीचे वजन – | २ किलोग्रॅम (पुरुष) |
१ किलोग्रॅम (महिला) | |
थाळीचा व्यास – | २१.९ ते २२.१ सें.मी. (पुरुष) |
१८.० ते १८.२ सें.मी. (महिला) |
३) वर्तुळातील जमीन बाहेरील कड्याच्या वरील बाजूपेक्षा २ सें.मी. खाली असते.
४) थाळीफेकीसाठी संरक्षक उपाय म्हणून जाळीचा पिंजरा वापरावा.
५) थाळी फेकताना सुरुवातीस स्पर्धक वर्तुळात स्थिर स्थितीत पाहिजे.
६) वर्तुळाबाहेरील कड्याच्या आतील भागास स्पर्धकाचा स्पर्श झाला‚ तर तो फाउल नाही; परंतु कड्याच्या वरील भागास किंवा कड्याबाहेरील जमिनीस स्पर्श झाला‚ तर तो फाउल आहे.
७) थाळी फेकल्यानंतर थाळीचा जमिनीस स्पर्श झाल्यावरच स्पर्धकाने वर्तुळाच्या मागील अर्ध्या भागातून बाहेर पडावे.
८) थाळीफेकीसाठी हातोडाफेकीप्रमाणे U आकाराचा पिंजरा वापरणे सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगले.
पुढे वाचा: