गोळा फेक माहिती मराठी – Gola Fek Information in Marathi
१) गोळा फेक वर्तुळातून करावयाची असते. (आकृती)
वर्तुळाचा व्यास | २.१३५ मी. |
सेक्टरचा कोन | ३४.९२० |
स्टॉप बोर्ड
लांबी | १.२१ मी. ते १.२३ मी. |
रुंदी | ११.२ सें.मी. ते ११.६ सें.मी. |
उंची | १० सें.मी. |
स्टॉप बोर्डाला पांढरा रंग दिलेला असावा. स्टॉप बोर्ड वर्तुळाला चिकटून व खिळे ठोकून घट्ट बसविलेला असावा.
२) वर्तुळातील जमीन टणक असावी आणि वर्तुळाबाहेरील जमिनीपेक्षा सुमारे १.५ सें.मी. खाली असावी.
३) गोळा पितळी अगर लोखंडी असावा.
वजन | ७.२६० ते ७.२६५ कि.ग्रॅ. (पुरुष) |
४.०० ते ४.००५ कि.ग्रॅ. (महिला) | |
व्यास | ११ ते १३ सें.मी. (पुरुष) |
९.५ ते ११ सें.मी. (महिला) |
४) गोळा फेकताना सुरुवातीस स्पर्धक वर्तुळात स्थिर स्थितीत (Stationary Position) पाहिजे.
५) फेकीच्या वेळी गोळा हनुवटीजवळ असेल. त्या वेळी हात खाली आणणे किंवा गोळा स्कंधरेषेच्या पाठीमागे जाणे फाउल आहे.
६) गोळा फेकताना स्पर्धकाचा स्टॉप बोर्डाच्या आतील बाजूस स्पर्श झाला‚ तर तो फाउल नाही.
७) गोळा फेकताना स्पर्धकाचा स्टॉप बोर्डाच्या वरील बाजूस किंवा बोर्डाच्या पुढील जमिनीस स्पर्श झाला‚ तर तो फाउल आहे.
८) गोळाफेकीच्या सरपटीत (Gliding) स्पर्धक गोळा न फेकता स्टॉप बोर्डाच्या पुढे गेला‚ तर तो फाउल आहे.
९) गोळाफेकीच्या प्रयत्नात गोळा हातातून निसटून खाली पडला‚ तर तो फाउल आहे.
१०) फेकीनंतर गोळा जमिनीवर पडल्यानंतरच स्पर्धकाने वर्तुळ सोडून बाहेर यावे. वर्तुळ सोडताना स्पर्धकाने वर्तुळाच्या मागील अर्ध्या भागातूनच बाहेर पडले पाहिजे.
११) फेक योग्य असेल‚ तर फेकीचे अंतर ताबडतोब मोजावे. गोळा पडलेल्या स्टॉप बोर्डाकडील खुणेपासून ते स्टॉप बोर्डाच्या वर्तुळकेंद्राकडील बाजूपर्यंतचे अंतर मोजावे.
पुढे वाचा: