“धर्म, धैर्य आणि विवेक हेच खरे मित्र” | कठीण किंवा वाईट काळातील मित्र धीर, धर्म आणि विवेक
“धीर, धर्म, विवेक, चांगले साहित्य धैर्य आणि सत्याचे व्रत अथवा श्रीरामावरचा विश्वास हे वाईट काळातील मित्र आहेत” असे संत तुलसीदासाने आपल्या सहित्यात वर्णिले आहे. वाईट काळ आल्यास मानवाने धीराने, धर्म आणि विवेकानेच काम केले पाहिजे. सत्य पण हेच आहे की, मनांत शांती, कर्तव्याबद्दल निष्ठा आणि संकटकाळी विवेक हेच खरे मित्र असतात. यांच्या साह्यानेच कठीण काळावर मात करता येते. संकटसमयीच मनुष्याचा धीर, धर्म आणि विवेकाची परीक्षा होते. त्यात सफल झाल्यास चांगले दिवस येतात. मनुष्याचे जीवन रथाच्या चक्राप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे रथाचे चाक फिरत राहते त्याप्रमाणे मनुष्याच्या जीवनातही सुख आणि दु:खाचे चक्र चालू असते. सुखही सदा राहत नाही व दुःखही. संकट हे एक असे शस्त्र आहे जे मनुष्याला शत्रू आणि मित्र ओळखण्यास मदत करते. संकट थोड्या दिवसांचे असते. त्या काळात व्यक्तीला आपले हित-अनहित समजते.
संकटाचा काळ अल्प असला तरी फार कष्टदायक, भयावह असतो. मन विचलित होते. मनुष्याला अशा वेळी काय करावे ते समजत नाही. अशा वेळी मित्र, पत्नी, मुले सगळे साथ सोडून निघून जातात. इतकेच नव्हे तर त्याची स्वत:ची सावलीही त्याच्यापासून लांब जाते.
संकटकाळाचे वर्णन करताना मृच्छकटिक नाटकात शूद्रक म्हणतो “विनिपतितानां नाराणं प्रियकारी दुर्लभो भवति।।” अर्थात् संकटात सापडलेल्या मानवाचे भले करणारे दुर्लभ असतात. म्हणून संकटकाळी जो कामी येतो तोच खरा मित्र होय.धीर हा मानवी मनाचा सर्वात मोठा गुण आहे. ही ती आंतरिक शक्ती आहे जी मानवाला संकटसमयी योग्य मार्गापासून विचलित होऊ देत नाही. भयाला त्याच्याजवळ फटकू देत नाही. मनुष्य सदैव आपल्या बुद्धीनुसार संकटाला शांतपणे तोंड देण्याचा प्रयत्न करतो. धीर धरणारे मन आधी कष्टाचे स्वरूप समजून घेते मग त्याचा व्याप किती आहे ते पाहते व नंतर त्याच्या निराकरणाचे उपाय शोधते.
बलवान व्यक्तीपेक्षा धैर्यवान व्यक्ती संकटांना तोंड देऊ शकते. उदा. सीताहरणानंतर रामाने धीराने काम घेतले आणि सीतेचा शोध व्यवस्थितरीत्या घेतला. रावण बलवान होता पण धैर्यवान नव्हता म्हणून शेवटी यश रामालाच मिळाले. घाई केली की कामात गोंधळ होतो उदा. घाईने गरम चहा पिणे, चुकीच्या बसमध्ये चढणे, उधळलेल्या घोड्यावर बसणे इ. अधीर व्यक्ती जे काम लवकर करण्याचा प्रयत्न करते तेच काम चुकीच्या पद्धतीने आणि उशिरा पूर्ण होते म्हणून तुलसीदासजी म्हणतात संकटात धीर हाच मित्र.
धर्म हा अर्थाचे अनेक पदर असणारा अनेकार्थी शब्द आहे. पण त्याचा मूळ अर्थ एकच जो धारण करतो तो धर्म होय. आपल्या याच धारणाशक्तीमुळे धर्म प्रजेचे रक्षण करतो व त्यास कायम ठेवतो. जे आचरण धारण क्षमतेने युक्त असते तोच धर्म असतो हे निश्चित. महाभारतात म्हटले आहे.
‘धारण दर्ममित्या दुःधर्मो धारयते प्रजाः।
यत्स्याद्धारण संयुक्त स धर्म इति निश्चयः॥
धर्माचा अर्थ कर्तव्ये आणि सिद्धांतांचे पालन करणे हा सुद्धा आहे म्हणून धर्म जीवन आहे. वेदव्यास म्हणतात-“धर्मो रक्षति रक्षितः” अर्थात आपण रक्षिलेला धर्मच आपली ” रक्षा करतो. आपली कर्तव्ये आणि सिद्धांतांचे निष्ठेने पालन करणे म्हणजे धर्म. भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या मते “धर्मातच जीवनशक्ती आणि धर्माची दृष्टी हीच जीवनदृष्टी आहे” स्वामी रामतीर्थांच्या मते, “धर्म जीवनशक्ती यासाठी आहे की धर्मामुळे मानव चरित्राला अटल बल प्राप्ती होते. धर्माचा विचार करून आपल्या धैर्यपूर्ण आचरणामुळे व्यक्ती संकटाला वेळेपूर्वीच दूर करते. शिवाजी औरंगजेबाच्या कैदेतून बलरूपी धर्मामुळेच सुटू शकला चांगल्या-वाईटाचे ज्ञान म्हणजे विवेक विवेकामुळेच मनुष्य चांगले वाईट समजून घेतो व सहजपणे आपल्या कष्टांचे निवारण करू शकतो. विवेकामुळेच प्रतिकूल स्थिती अनुकूल होते. हार-जीत आणि कष्ट लाभात परिवर्तीत होतात. विवेकाला आपला मित्र बनवून मानव कर्तव्यपराङमुख होत नाही. शिवाजीने जर विवेकाने काम घेतले नसते तर आयुष्यभर औरंगजेबाच्या कैदेतच सडत पडला असता.
धीराने विवेकसंमत धर्मानुकूल आचरण करीत मनुष्य सिद्धी प्राप्त करतो. म्हणून त्याने निष्ठेने मार्गक्रमण करीत राहिले राहिजे. मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना अडचणींना न घाबरले पाहिजे.
पुढे वाचा:
- परिश्रमाचे महत्त्व निबंध मराठी
- निःशस्त्रीकरण निबंध मराठी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निबंध
- धर्म आणि राजकारण निबंध मराठी
- दारुबंदी किंवा मद्यबंदी निबंध मराठी
- मी डॉक्टर होणार मराठी निबंध
- जीवनात विनोदाचे स्थान निबंध मराठी
- जीवनात कलेचे स्थान निबंध मराठी
- जागतिक खेळांमध्ये भारताचे स्थान निबंध मराठी
- कृष्णा जन्माष्टमी वर मराठी निबंध
- चंद्रशेखर व्यंकटरमण मराठी निबंध