निःशस्त्रीकरण निबंध मराठी – Nishastrikaran Marathi Nibandh

अनुक्रमे ६ ऑगस्ट व ७ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने हिरोशिमानागासाकी या जपानमधील दोन शहरांवर अणुबाँब टाकले. त्याच्या दोन दिवसांनंतर पाहता पाहता ३ लाख ४० हजार लोकसंख्या असलेली ही शहरे स्मशानात परिवर्तीत झाली. घरे जळू लाली, त्याच्या खिडक्या, दरवाजे, छपरे उडून गेली. पशु पक्षी माणसे सारे मृत्यू पावले. फळ आणि धुराचे असे लोट उठल की जणू काळे ढगच. संपूर्ण आकाशच या ढगांनी व्यापून टाकले. स्फोटाचा झटका इतका जबरदस्त होता की १७ कि. मी. दूरवर जाणवला. शहरातील ७० टक्के घरांची पडझड झाली. इतिहासात या सारखी दुसरो दुःखद घटना घडलेली दिसत नाही. या बाँबस्फोटातून जे विषारी वायू व किरणे उत्सर्जित झाले. त्याचे परिणाम आईच्या पोटातील गर्भावरसुद्धा झाले. हजारो लोक मानसिक व शारीरिकदृष्ट्या विकृत झाले. अजूनही स्फोयचा परिणाम पूर्णपणे नाहीसा झालेला नाही.

आजच्या आधुनिक अस्त्रशस्त्रांच्या समोर हिराशिमा, नागासाकीवर पडलला अणुबाँब एखाद्या खेळण्यासारखा वाटतो. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीनजवळ शस्त्रांचे इतके शक्तिशाली भांडार आहे की ज्याच्या जोरावर आपले का अनेकदा नष्ट करता येऊ शकते. शस्त्रांच्या स्पर्धेत जगातील अन्य देशही मागे नाहीत अशा परिस्थितीत जर तिसरे जागतिक युद्ध झाले तर पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टीच नाडीशी होईल. हे संकट टाळण्यासाठी शांततापूर्वक मनुष्याच्या मूलभूत लांची उत्तरे मिळविण्यासाठी जगाला अस्त्रशस्त्रांपासून भयमुक्त करणे ही आज महत्त्वाची गरज आहे.

संपूर्ण जगाला आधुनिक अस्त्रशस्त्राच्या स्पर्धेतून मुक्त करून भयविरहित समाजाची निर्मिती करणे हाच निःशस्त्रीकरणाचा मुख्य उद्देश आहे. निःशस्त्रीकरण म्हणजे भयानक मारक क्षमता असलेल्या अस्त्र शस्त्रांची निर्मिती थांबविणं व जी तयार आहेत तो नष्ट करणे होय. निःशस्त्रीकरणाचा स्वीकार करूनच मानवता तिसरे विश्वयुद्ध होण्यापासून वाचू शकते.

आज या प्राणघातक आण्विक आणि रासायनिक शस्त्रांची सतत निर्मिती होत आहे. त्यामुळे निकटच्या भविष्यात तिसरे महायुद्ध होणार की काय अशी शंका निर्माण होले या युद्धात युद्ध करणारे दोन्ही पक्ष तर नष्ट होतीलच त्याचबराबर उरलेल्या जगाचाहो महाविनाश होईल, जे लोक मरतील ते भाग्यशाली उरतील आणि जे जगतील त झिजून झिजून मरतील. शेवटी परिणाम हा होईल की अनेक युगे साधना करून ज्या मानवी सभ्यतेचा संस्कृतीचा, कलांचा विकास झाला आहे. आणि मनुष्याने जे काही मिति आहे ते सर्व नष्ट होऊन केवळ एक कथा बनून राहील, ज्या विज्ञानाने या शम्यांची निर्मित केली त्याचेही पतन निश्चितपणे होणार आहे.

आंधळ्या शस्त्रस्पर्धेत विकसित व विकसनशील देश सामील आहेत. हे देश विकसित आहे. समृद्ध आहे तो आपल्या उत्पत्राचा एक मोठा हिस्सा सुरक्षितरच्या दृष्टिकोनातून नव्हे तर आपले वर्चस्व गाजविण्याच्या भूमिकेतून शस्त्राची निर्मिती व नवीनीकरणावर खर्च करतो. या शस्त्रांची निगा राखण्यासाठीही बराच खर्च येतो. या शस्त्रांचा उपयोग ते आपले हित साधण्यासाठी करतात. लहान लहान गोत्र देशाचे न ही आपला विकास व लोककल्याणाच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करून आपली सत्ता कायम राखण्यासाठी शस्त्रे मिळविण्यात मग्न होतात. जगायोल अनेक हुकुमशहा शस्त्राच्या बळावरच सत्तेवर विद्यमान आहेत. जगातील काही राष्ट्राध्यक्ष आपणो सल्ला शिकविण्यासाठी आपल्या प्रजेचे लक्ष अंतर्गत समस्यांपासून विचलित करण्यासाठी शेजारच्या देशांच्या सीमेशी पळ करतात. बहुसंख्येने शस्त्रांची आयात करतात उदा. पाकिस्तान वारंवार काश्मीरच्या मुद्यावर भारताशी भांडण उकरून काढते. पाकिस्तानचा प्रत्येक सत्ताधीश असे करण्यात यशस्वी झाला आहे. पाकिस्तान, अमेरिका, चीन इ. देशांकडून शस्त्रे मिळवितो त्यामुळे भारतासारख्या विकसनशील देशाला आपल्या सैनिकी बळात वाढ करणे भाग पडते. भारताला आपल्या आर्थिक अंदाजपत्रकाचा मोठा भाग सेनेवर, शस्त्रांवर खर्च करावा लागतो.

शस्त्र स्पर्धेमुळे शक्ती संतुलन डगमगले आहे. विकास थांबल्यागत झाला आणि जनता भयभीत झाली आहे. विकसित देश आपल्या प्रचंड शस्त्रसाठ्यांच्या आधारे विकसनशील देशांच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप करून त्यांचे आर्थिक, संतुलन बिघडवितात. एकीकडे विकसित राष्ट्रांनी शस्त्र स्पर्धेत भाग घेणे, शस्त्रनिर्मिती करणे हा त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे तर विकसनशील देशांसाठी तो त्यांच्या अस्तित्वाचाच मुद्दा बनत आहे. आज संपूर्ण जग शस्त्रांच्या पाठीमागे धावत आहे म्हणून संयुक्त राष्ट्रसंघ व मानव कल्याण मंचाकडून निःशस्त्रकरणाची मागणी केली जात आहे.

आता व्यावसायिक दृष्टिकोनातून शस्त्रनिर्मिती केली जाते. मानवतेपुढे हे एक संकटच उभे राहिले आहे. जास्त फायदा मिळावा म्हणून राष्ट्र शस्त्रनिर्मितीत वाढ करीत आहेत. या व्यापारात मोठ्या प्रमाणावर देण्याघेण्याचे व्यवहार चालतात. उदाहरण बोफोर्स कांड, शस्त्रांचे दलाल दहशतवाद्यांच्याही मागण्या पूर्ण करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. आपल्या मालाची विक्री करण्यासाठी व्यापारी आणि दलाल नीच मार्गाचा अवलंब करतात. राष्ट्राराष्ट्रात सामान्य कारणांवरून भांडणे लावतात. जगात अशी अनेक उदाहरणे सापडतात की एखाद्या विशेष शस्त्राची पारख करण्यासाठी युद्धे झाली होती. आज अशा प्रकारच्या मनोवृत्तीशी झगडण्याची वेळ आली आहे. आता सर्व राष्ट्रांनी नि:शस्त्रीकरणाचा मार्ग स्वीकारला पाहिले.

राष्ट्रांनी आपला स्वार्थ सोडून निःशस्त्रीकरणाचा मार्ग स्वीकारून मानवजातीचे भविष्य सुरक्षित केले पाहिजे. आता चर्चेची गरज नसून प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. जर निःशस्त्रीकरण करण्यात यश मिळाले तर विश्वशांतीचे स्वप्न पूर्ण होऊ शकेल.

पुढे वाचा:

Leave a Reply