कृष्णा जन्माष्टमी वर मराठी निबंध – Krishna Janmashtami Essay in Marathi

भारतातील अनेक सण महान विभुतींच्या जन्मदिवसासोबत जोडल्या गेले आहेत, जसे की बुद्ध जयंती, महावीर जयंती, गांधी जयंती, रामनवमी आदी. अशारितीने जन्माष्टमीचा संबंध भगवान श्रीकृष्णांच्या जन्माशी आहे. भाद्रपद कृष्णपक्षाच्या अष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला होता आणि तो देखील एका कारागृहात. दुष्ट कंसाने त्याची बहिण देवकी आणि मेव्हणा वासुदेव यांना कैद करून जेलमध्ये टाकले होते, कारण की आकाशवाणी होऊन त्यांच्यापोटी जन्मलेला मुलगा कंसाच्या मृत्यूस कारण ठरणार होता आणि शेवटी ही आकाशवाणी सत्य झाली. देवकी-वासुदेवाच्या आठव्या पुत्र श्रीकृष्णाने शेवटी नराधम कंसाचा वध करून आपल्या आई-वडिलांना मुक्त केले.

जन्माष्टमीचा पवित्र सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने भक्तीभावाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो. सकाळपासूनच भजन-कीर्तन, पूजन-अर्चन, सत्संग, श्रीकृष्णलीला मंथनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. हे मध्यरात्रीपर्यंत चालते. म्हणजे बालकृष्णाचा जन्म होईपर्यंत सारं वातावरण त्यावेळी घंटानाद, शंखनाद आणि भगवान श्रीकृष्णाच्या जयघोषाने दुमदुमतो. आरती होते, प्रसाद वाटला जातो आणि नंतर भक्तगण आपला उपवास सोडून फळ-फळावळ किंवा हलके भोजन करतात.

कृष्णजन्म आणि लीलासंबंधी अनेक दृष्य आणि मनोरो सजवले जातात. सर्व देशात हा सण साजरा केल्या जातो. परंतु मथुरा-वृंदावन आदी ठिकाणावर विशेष आयोजन होत आहे.

भगवान कृष्णाचे उपदेश आणि शिकवण आपल्या संस्कृतीचा प्राण आहे. त्यांचं जीवन-चरित्र आपल्या प्रेरणेचं अविरत स्त्रोत आहे. कृष्ण नामाचे स्मरण आणि ध्यान आपला मूलमंत्र आहे. भारत कृष्ण आहे आणि कृष्ण भारत.

कृष्णा जन्माष्टमी वर मराठी निबंध – Krishna Janmashtami Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply