चंद्रशेखर व्यंकटरमण मराठी निबंध – CV Raman Essay in Marathi

भारताच्या शास्त्रज्ञात चंद्रशेखर व्यंकटरमण यांचे मोठे नाव आहे. त्यांनी अनेक महत्त्वाचे कार्य केले आणि शोध लावले. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १८८८ मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रशेखर अय्यर होतं. त्यांच्या आईचं नाव पार्वती अय्यर होतं. भौतीकशास्त्रात सुरूवातीपासूनच रमण यांना रूची होती. त्याला त्याचे वडील देखील कारणीभूत होते. जे भौतीकशास्त्राचे प्रसिद्ध प्राध्यापक होते. बालपणापासूनच रमण प्रतिभाशाली होते.

वयाच्या १४ व्या वर्षीच रमणाने बी.ए. परीक्षा चांगल्या मार्क्सने पास केली. एम.ए. ची परीक्षा पण सन्मानपूर्वक पास केली. त्यांनी कलकत्त्यात सरकारी नोकरी जॉईन करून आपल्या जीवनाच्या नव्या अध्यायाला सुरूवात केली. तिथेच त्यांनी आपल्या प्रयोगाला सुरूवात केली. त्यात त्यांना चांगलं यश मिळालं. तिथे त्यांना कॉलेजचे प्राचार्य म्हणून नियुक्त करण्यात आले. तिथेच त्यांनी अनेक प्रयोग केले. ‘रमण किरण’ त्यापैकी एक प्रसिद्ध शोध. त्यांनी हे सिद्ध करून दाखवले की किरणाचा प्रवेश पारदर्शी पदार्थांधूनच नाही तर अपारदर्शक पदार्थांमधूनही होतो. प्रकाशाच्या संदर्भात त्यांनी अनेक नवे शोध लावले. या विषया वरचा शोध म्हणजे ‘रमण-प्रभाव महत्त्वाचा आहे. या शोधामुळे ते तात्काळ जगप्रसिद्ध झाले, त्यांना ‘सर’ ही उपाधी देण्यात आली. नंतर १९३० मध्ये त्यांना नोबेल देवून सन्मानीत करण्यात आले.

रमण यांना अनेक पुरस्कार आणि अनेक देशांनी उपाध्या दिल्या. परंतु त्यांना थोडाही गर्व झाला नाही. त्यांनी स्वतः एक वैज्ञानीक संस्था ‘रमण इंस्टिट्यूट’ ची स्थापना केली. नोव्हेंबर १९७७ ला हा महान शास्त्रज्ञ आपल्यातून कायमचा निघून गेला.

चंद्रशेखर व्यंकटरमण मराठी निबंध – CV Raman Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply