दूरचित्रवाणीची कैफियत निबंध मराठी
दूरचित्रवाणीवर काम करणारी सर्व मंडळी संपावर गेलेली असल्यामुळे आज दूरचित्रवाणीवरून कोणतेही कार्यक्रम प्रसारित होत नव्हते. त्यामुळे अतिशय कंटाळा आला होता. नकळत हात दूरचित्रवाणी संचाकडे गेला आणि काय गंमत – दूरचित्रवाणीच्या कोया पडद्याआडून आवाज ऐकू आला.
“मी दूरचित्रवाणी आहे. माझ्यामुळे अनेक व्यक्ती तुमच्याशी संवाद साधतात; पण मला मात्र तुमच्याशी कधीच बोलता येत नाही. म्हणून आज मी ही संधी घेणार आहे. माझा जन्म होऊन शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. विकसित देशातून विकसनशील देशापर्यंत येऊन पोचण्यास एवढा काळ नक्कीच आवश्यक होता. आता मात्र जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत मी जाऊन पोचले आहे.
या भारतात माझे मोठ्या उत्सुकतेने व प्रेमाने स्वागत झाले. पण म्हणतात ना ! नव्याचे नऊ दिवस ! हे स्वागताचे दिवस लवकरच संपले आणि नाना प्रकारची दूषणे माझ्या वाट्याला येऊ लागली. आजकाल माझा ‘मूर्ख पेटी’ (Idiot Box) म्हणून अधिक्षेप केला जातो. खरे म्हणजे ही नावे ठेवणारी मंडळी दुटप्पी आहेत. कारण माझ्यावर सादर केला जाणारा एकही कार्यक्रम ही माणसे चुकवत नाहीत.
माझ्यावर टीका करणारी ही मंडळी नेहमी मी सादर करत असलेल्या जाहिरातींवर घसरतात. जाहिराती हे उत्पन्नाचे साधन आहे. पण मला सांगा, या विविध जाहिरातींमुळे तुम्हांला किती तरी गोष्टींची माहिती घरबसल्या मिळते की नाही? किंबहुना माझा जाहिरातप्रसारणाचा हा कार्यक्रम लहानथोरांत अतिशय लोकप्रिय आहे.
माझे अनेक कार्यक्रम हे वादाचे विषय ठरतात. पण त्यांत आक्षेप घेण्यासारखे काय आहे? याउलट त्यामुळे लोकांमध्ये चर्चा होते. विचारमंथन होते, चिंतन होते, वाचन होते, विविध मतांचा आविष्कार होतो आणि त्यांतून समाजाची वैचारिक प्रगती होत असते.
माझ्यावर पालकमंडळींचा राग का? तर म्हणे त्यांचे पाल्य सतत मी सादर केलेले कार्यक्रम पाहत बसतात. पण माझे कित्येक कार्यक्रम बालकांचे प्रबोधन करणारेही असतात. केवळ छोट्यांचीच नाही, तर मोठ्यांचीही ज्ञानपिपासा भागवण्याचे काम मी सतत करत असते. घराघरांतून माझा प्रवेश झाल्याने घरोघरच्या सर्व मंडळींचे ‘सामान्य ज्ञान कितीतरी वाढले आहे.
राहता राहिला थोडा भाग तो मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा. अहो प्रत्येकाला थोडी तरी श्रमपरिहारासाठी करमणूक नको का? ज्याला ज्यात आनंद आहे तो त्याने लुटावा, हाच आमचा मनोरंजनाच्या कार्यक्रमांमागील हेतू आहे!”
पुढे वाचा:
- दूध निबंध मराठी
- दिल्लीची कथा निबंध मराठी
- भारताची राजधानी दिल्ली निबंध मराठी
- भारताची राजधानी कोणती आहे
- भारताच्या सीमेवरील देशांची नावे आणि राजधानी
- ताजमहाल निबंध मराठी
- आपले शेजारी देश निबंध मराठी
- दिनदर्शिका निबंध मराठी
- दारूबंदी निबंध मराठी
- गरिबी एक शाप मराठी निबंध
- दप्तराचे मनोगत निबंध मराठी
- घारीचे मनोगत निबंध मराठी
- काश्मीरचे मनोगत निबंध मराठी
- एका समाजसेवकाचे मनोगत मराठी निबंध
- एका वृद्धाचे मनोगत मराठी निबंध
- एका आदिवासीचे मनोगत मराठी निबंध