कल्पना चावला मराठी निबंध-Kalpana Chawla Nibandh in Marathi
कल्पना चावला मराठी निबंध – Kalpana Chawla Nibandh in Marathi

Set 1: कल्पना चावला मराठी निबंध – Kalpana Chawla Nibandh in Marathi

कल्पना चावला ही भारताची अशी एक सुकन्या होती जिचे नाव घेतल्यामुळे आज सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंच होते.

जे हरियाणा राज्य स्त्रीभ्रूणहत्येसाठी बदनाम आहे त्याच हरयाणा राज्यातील कर्नाल येथे १७ मार्च, १९६२ ह्या दिवशी कल्पना चावला ह्या धाडसी आणि बुद्धिमान कन्येचा जन्म झाला. तिचे शालेय शिक्षणही तिथेच झाले. त्यानंतर चंदीगढ येथून तिने ऍरॉनॉटिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी घेतली.

पदवी घेतल्यावर पुढील शिक्षणासाठी तिने अमेरिकेतील टेक्सास येथे प्रयाण केले. तिथे जाऊन तिने एअरोस्पेस इंजिनियरिंगमध्ये मास्टर्सची पदवी मिळवली. खरे तर त्या काळात चॅलेंजर हे अवकाशयान दुर्घटनाग्रस्त झाले होते आणि त्यातील सात अंतराळवीर मृत्युमुखीही पडले होते. परंतु तरीही कल्पनाला तो विषय एवढा प्रिय होता की त्यातील धोक्यांकडे डोळेझाक करून तिने एयरस्पेस इंजिनियरिंगमध्ये सेकंड मास्टर्सची पदवीही मिळवली.

मग नासा ह्या अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्राने कल्पनाची आपल्या अंतराळ मोहिमांसाठी निवड केली. १९९७ साली ती जेव्हा प्रथम अवकाशात झेपावली होती तेव्हा सा-या भारताचे डोळे तिच्याकडे लागले होते. १९९७ सालच्या ह्या मोहिमेत ती सुमारे ४०० तास अंतराळात राहिली. ह्या काळात तिने एकुण ६५ लाख मैलांचे अंतर पार केले. ७६० तास अंतराळात राहून एकुण २५२ वेळा तिने पृथ्वीप्रदक्षिणाही केली.

त्यानंतर १६ जानेवारी, २००३ रोजी नासाने कोलंबिया ह्या अंतराळयानाची दुसरी मोहीम सुरू केली. कल्पनाची ही पाच वर्षात दुसरी अंतराळयात्रा होती. ह्या प्रवासात तिच्यासोबत आणखी सहा जण होते. आपली मोहीम फत्ते करून परत येत असताना कोलंबिया अंतराळयान दुर्घटनाग्रस्त झाले आणि टेक्सास राज्यातील फ्लोरिडा येथे कोसळले.यानातील सर्व माणसे मरण पावली. त्यात धाडसी भारतकन्या कल्पनासुद्धा होती.

आपल्या अल्प जीवनातही कल्पना सर्वांना खूप काही शिकवून गेली. स्वप्न पाहाणे आणि ते सत्यात उतरवण्यासाठी जिद्दीने मेहनत करणे ह्यासारखा दुसरा आनंद नसतो हे तिनेच सिद्ध करून दाखवले. अत्यंत मेहनती, गुणी आणि आत्मविश्वासू असा तिचा स्वभाव होता.

ह्या विनम्र आणि गुणी आकाशकन्येला कोटीकोटी प्रणाम.

Set 2: कल्पना चावला मराठी निबंध – Kalpana Chawla Nibandh in Marathi

आज स्त्रिया सर्व क्षेत्रात पुढे चालल्या आहेत. त्यांना अबला नारी म्हणणा-या लोकांनी तोंडात बोटं घालावीत अशी कठीण कठीण कामे त्या करू लागल्या आहेत. कल्पना चावला ही भारताची अशी एक सुकन्या होती जिचे नाव घेतल्यामुळे आज सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंच होते. जे हरियाणा राज्य स्त्रीभ्रूणहत्येसाठी बदनाम आहे त्याच हरयाणा राज्यातील कर्नाल येथे १७ मार्च, १९६२ ह्या दिवशी कल्पना चावला ह्या धाडसी आणि बुद्धिमान कन्येचा जन्म झाला. तिचे शालेय शिक्षणही तिथेच झाले. त्यानंतर चंदीगढ येथून तिने ऍरॉनॉटिकल इंजिनियरिंगमध्ये पदवी घेतली.

पदवी घेतल्यावर पुढील शिक्षणासाठी तिने अमेरिकेतील टेक्सास येथे प्रयाण केले. तिथे जाऊन तिने एअरोस्पेस इंजिनियरिंगमध्ये मास्टर्सची पदवी मिळवली. खरे तर त्या काळात चॅलेंजर हे अवकाशयान दुर्घटनाग्रस्त झाले होते आणि त्यातील सात अंतराळवीर मृत्युमुखीही पडले होते. परंतु तरीही कल्पनाला तो विषय एवढा प्रिय होता की त्यातील धोक्यांकडे डोळेझाक करून तिने एयरस्पेस इंजिनियरिंगमध्ये सेकंड मास्टर्सची पदवीही मिळवली.

मग नासा ह्या अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्राने कल्पनाची आपल्या अंतराळ मोहिमांसाठी निवड केली. १९९७ साली ती जेव्हा प्रथम अवकाशात झेपावली तेव्हा सा-या भारताचे डोळे तिच्याकडे लागले होते. १९९७ सालच्या ह्या मोहिमेत ती सुमारे ४०० तास अंतराळात राहिली. ह्या काळात तिने एकुण ६५ लाख मैलांचे अंतर पार केले. ७६० तास अंतराळात राहून एकुण २५२ वेळा तिने पृथ्वीप्रदक्षिणाही केली.

त्यानंतर १६ जानेवारी, २००३ रोजी नासाने कोलंबिया ह्या अंतराळयानाची दुसरी मोहीम सुरू केली. कल्पनाची ही पाच वर्षात दुसरी अंतराळयात्रा होती. ह्या प्रवासात तिच्यासोबत आणखी सहा जण होते. आपली मोहीम फत्ते करून परत येत असताना कोलंबिया अंतराळयान दुर्घटनाग्रस्त झाले आणि टेक्सास राज्यातील फ्लोरिडा येथे कोसळले. यानातील सर्व माणसे मरण पावली. त्यात धाडसी भारतकन्या कल्पनासुद्धा होती.

आपल्या अल्प जीवनातही कल्पना सर्वांना खूप काही शिकवून गेली. स्वप्न पाहाणे आणि ते सत्यात उतरवण्यासाठी जिद्दीने मेहनत करणे ह्यासारखा दुसरा आनंद नसतो हे तिनेच सिद्ध करून दाखवले. अत्यंत मेहनती, गुणी आणि आत्मविश्वासू असा तिचा स्वभाव होता.

ह्या विनम्र आणि गुणी आकाशकन्येला कोटीकोटी प्रणाम.

Set 3: कल्पना चावला मराठी निबंध – Kalpana Chawla Nibandh in Marathi

एखादी महत्त्वाकांक्षा ठेवणे, एखादे अशक्य कोटीतील स्वप्न पाहणे ते पूर्ण करण्यासाठी अटीतटीचे, पराकाष्ठेचे प्रयत्न करणे आणि शेवटी ते उद्दिष्ट सफल होणे असे एखाद्याच व्यक्तिच्या बाबतीत घडू शकते. महिला अंतराळवीर कल्पना चावला ही अशी एक महत्त्वाकांक्षी महिला होती.

इ. स. १९६१ मध्ये हरियाणा प्रांतातील ‘कर्नाल’ या छोट्याशा शांत वातावरण असलेल्या गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात कल्पनाचा जन्म झाला. त्याच गावातील टागोर बालनिकेतन शाळेची ही विद्यार्थिनी. पंजाब इंजिनियरिंग कॉलेज (हरियाणा) मधून विमानविद्या अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडणारी त्यावेळची ती एकमेव विद्यार्थिनी होती. त्यानंतर तिने टेक्सास विद्यापीठातून एम.एस. ही पदव्युत्तर पदवी घेतली. भारताचा प्रथम अंतराळवीर राकेश शर्मानंतर कल्पना चावला ही दुसरी अंतराळवीर होय.

‘नासा’ या अमेरिकन अवकाश केंद्राने कल्पनाची अंतराळ मोहिमेसाठी निवड केली. कॅलिफोर्नियातील ‘माऊंट व्हयू’ या नासाच्या प्रयोगशाळेत तिने काम केले. तत्पूर्वी कोलोरॅडो विद्यापीठातून तिने पीएच.डी. ची पदवी मिळाविली होती. कल्पना प्रथम १९९७ मध्ये अवकाशात झेपावली आणि साऱ्या भारतवासीयांची मान अभिमानाने ताठ झाली. १९९७ च्या मोहिमेत ती सुमारे ४०० तास अंतराळात राहिली. या काळात तिने अंतराळात ६५ लाख मैलांचे अंतर पार केले. एकूण ७६० तास ती अंतराळात राहिली. २५२ वेळा तिने पृथ्वीप्रदक्षिणा केली.

१६ जानेवारी २००३ ला नासाहून कोलंबिया या अंतराळयानाची दुसरी मोहीम सुरू झाली. कल्पनाची ही पाच वर्षांत झालेली दुसरी अवकाशयात्रा होती. विविध असाध्य रोगांवर औषधांचा शोध घेणे हा या मोहिमेचा हेतू होता. या प्रवासात कल्पना चावलाबरोबर आणखी सहा अंतराळवीर होते. हे सर्व जण आपली मोहीम पूर्ण करून पृथ्वीकडे परत येत असताना दि. १ फेब्रुवारी २००३ ला संध्याकाळी ७ वाजता ‘कोलंबिया’ दुर्घटनाग्रस्त होऊन टेक्सास राज्यातील फ्लोरिडा येथे खाली कोसळले. अंतराळात या अंतराळावीरांनी ८० प्रयोग केले होते. या अपघातात सर्व अंतराळवीरांचे दु:खद निधन झाले.

कल्पनाने आपल्या अल्प आयुष्यात आपणा सर्वांना खूप काही शिकविले आहे. कोणतेही स्वप्न मेहनतीच्या जोरावर प्रत्यक्षात येऊ शकते हे सिद्ध करून दाखविले. तिने आपल्यासमोर जे. आर. डी. टाटांचा आदर्श ठेवला होता. अत्यंत नम्र आणि दुसऱ्याच्या मदतीसाठी सदैव तत्पर कल्पना अत्यंत आत्मविश्वासू होती. प्रसिद्धीच्या वलयाचा परिणाम तिच्यावर कधीही झाला नाही. ती गुणी, मेहनती, आणि प्रामाणिक होती.

भारताच्या अंतराळ इतिहासात कल्पना चावलाचे नाव सुवर्णाक्षरांत लिहिले जाईल. तिचे आयुष्य आणि तिचे काम हे जगातील प्रतिभावान मुलामुलींसाठी प्रेरणादायक ठरेल. तिच्या स्मृतीला प्रणाम!

कल्पना चावला मराठी निबंध-Kalpana Chawla Nibandh in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply