Swami Vivekananda Nibandh in Marathi: स्वामी विवेकानंद हे एक महान हिंदू संत आणि नेते होते, ज्यांनी रामकृष्ण मिशन आणि रामकृष्ण मठाची स्थापना केली. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा दिन साजरा करतो. तो अध्यात्मिक विचार असलेला एक अद्भुत मुलगा होता. त्यांचे शिक्षण अनियमित होते, परंतु त्यांनी स्कॉटिश चर्च कॉलेजमधून बी.ए.ची पदवी पूर्ण केली. श्रीरामकृष्णांना भेटल्यानंतर, त्यांचे धार्मिक आणि संत जीवन सुरू झाले आणि त्यांना आपले गुरु केले. यानंतर त्यांनी वेदांत चळवळीचे नेतृत्व केले आणि भारतीय हिंदू धर्माचे तत्वज्ञान पाश्चिमात्य देशांना पोहोचवले. अशा या महान संतांवर आज आपण स्वामी विवेकानंद निबंध मराठी मध्ये लिहिणार आहोत. आम्ही खाली Swami Vivekananda Nibandh in Marathi दिले आहेत त्याचा उपयोग आपण करू शकता.
स्वामी विवेकानंद निबंध मराठी – Swami Vivekananda Nibandh in Marathi
Table of Contents
स्वामी विवेकानंद निबंध मराठी 100 शब्द – Swami Vivekananda Nibandh in Marathi 100 Words
सर्व जगाला मानवजातीच्या सेवेचा संदेश देणारे एक थोर विचारवंत आधुनिक भारतात होऊन गेले. त्यांचे नाव स्वामी विवेकानंद. स्वामी स्वामी विवेकानंदांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी झाला. त्यांच्या मातेचे नाव भुवनेश्वरीदेवी होते आणि पित्याचे नाव विश्वनाथ दत्त असे होते. विवेकानंद लहानपणापासूनच हुशार होते. त्यांची बुद्धी अतिशय तल्लख होती. स्वामी विवेकानंद एक चांगले वक्तेही होते.
एकदा १८९३ साली अमेरिकेत सर्वधर्मपरिषद भरली होती. भारतातून हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले होते. सर्वांची भाषणे झाली. शेवटी विवेकानंदांना फक्त दोन मिनिटे भाषणासाठी वेळ दिला गेला. त्या दोन मिनिटातही त्यांनी भाषणाची सुरुवात ‘माझ्या प्रिय बंधु आणि भगिनी’ या शब्दांनी केली आणि टाळ्यांचा जणू पाऊसच पडू लागला. स्वामी विवेकानंदांना अनेक भाषा येत होत्या. त्यांचे स्मारक कन्याकुमारी येथे उभारले गेले. आजही तेथे हजारो भारतीय भेटी देतात.
स्वामी विवेकानंद निबंध मराठी 200 शब्द – Swami Vivekananda Nibandh in Marathi 200 Words
स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्त्यातील प्रसिद्ध वकील विश्वनाथ दत्त यांच्या घरी १२ जानेवारी, १८६३ रोजी झाला. विश्वनाथ दत्त यांच्या पत्नी भुवनेश्वरी देवी यांनी पुत्रप्राप्तीसाठी शिवाचे कठीण व्रत सुरू केले होते. या व्रतामुळेच आपल्याला पुत्ररत्न लाभले, अशी त्यांची भावना होती. मोठ्या कौतुकाने त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘नरेंद्र’ असे ठेवले.
नरेंद्र हा बालवयात कोपिष्ट होता. शाळेतही तो फार खोड्या काढत असे. पण पुढे त्याच्यात पूजाअर्जा, भक्तिभाव यांची आवड निर्माण झाली. नरेंद्राला तीव्र बुद्धिमत्तेचे वरदान लाभले होते. नित्यनेमाने व्यायामशाळेत जाऊन त्याने आपले शरीर सुदृढ बनवले होते. मोठा झाल्यावर नरेंद्र बाह्मसमाजात जाऊ लागला. तेथे त्याच्या मनात देवाविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. ‘खरोखरच देव आहे की नाही? देव असेल तर तो कोठे भेटेल?’ नरेंद्र ज्याला-त्याला हे प्रश्न विचारत असे. तेव्हा ब्राह्मसमाजवादी पुढारी देवेंद्र यांनी नरेंद्राला स्वामी रामकृष्ण परमहंसांकडे पाठवले आणि पुढे तेच नरेंद्राचे गुरू झाले.
परमेश्वर सर्वत्र आहे आणि तो मानवातही आहे, ही शिकवण परमहंसांनी नरेंद्राला दिली. सुरवातीला नरेंद्राला हे मान्य झाले नाही. नंतर परमहंसांच्या शिकवणीतून हे सत्य नरेंद्राला प्रतीत झाले. तो कालिमातेचा भक्त बनला. रामकृष्ण परमहंसांनी या जगाचा निरोप घेताना नरेंद्राला सांगितले की, तू हिंदुत्वाचा प्रसार कर आणि त्यातील अमर तत्त्वज्ञान साऱ्या जगाला सांग.
१८९३ मध्ये नरेंद्र अमेरिकेतील सर्वधर्मीय परिषदेला उपस्थित राहिले. लोक त्यांना ‘स्वामी विवेकानंद’ म्हणून ओळखू लागले. त्या जागतिक परिषदेत विवेकानंदांनी भाषणाला सुरवात करताना ‘सभ्य स्त्रीपुरुषहो’ असे न संबोधता ‘माझ्या बंधु-भगिनीनो’ असे संबोधून उपस्थितांची मने जिंकली. त्या सभेत विवेकानंदांनी हिंदू धर्माचे माहात्म्य सर्वांना पटवून दिले. आपले उर्वरित आयुष्यही त्यांनी या महान कार्यासाठी वेचले.
स्वामी विवेकानंद निबंध मराठी 300 शब्द – Swami Vivekananda Nibandh in Marathi 230 Words
स्वामी विवेकानंद हे एक थोर पुरूष आपल्या देशात होऊन गेले. त्यांचे तत्वज्ञान, त्यांचे विचार आजही भारतभर वाचले जातात आणि त्यांचा अभ्यासही केला जातो.
स्वामीजींचा जन्म १२ जानेवारी, १८६३ रोजी कलकत्त्यातील कायस्थ जमीनदार कुटुंबात झाला. त्यांचे पाळण्यातील नाव नरेंद्रनाथ होते. त्यांना नऊ भावंडे होती. त्यांचे वडील विश्वनाथ दत्तवकील होते. तर आई भुवनेश्वरी गृहिणी होती. नरेंद्रांचे आजोबा दुर्गाचरण हे संस्कृत आणि पर्शियनचे विद्वान होते. त्यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षीच संन्यास घेतला होता. कदाचित नरेंद्रांमध्ये त्यांचे गुण आले असतील. नरेंद्र लहानपणापासूनच खूप तेजस्वी होते. त्यांचा ओढा अध्यात्माकडे होता. सुरूवातीला त्यांच्यावर ब्राम्हो समाजाचा प्रभाव होता. परंतु पुढे त्यांनी रामकृष्ण परमहंसांचे शिष्यत्व पत्करले.
परमहंसांनी त्यांना शिकवण दिली की सर्व जीव एकाच परमात्म्यापासून निर्माण झाले आहेत आणि मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. रामकृष्णांच्या मृत्यूनंतर विवेकानंदांनी संपूर्ण भारतीय उपखंडात पदयात्रा काढली आणि ब्रिटिशांच्या सत्तेखालील भारताची काय अवस्था आहे ह्याची प्रत्यक्ष माहिती मिळवली.
त्यांचे इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व होते. १८९३ साली अमेरिकेत जागतिक धर्मपरिषद भरली तेव्हा हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंदांना पाठवले गेले. तिथे त्यांनी माझ्या अमेरिकेतील बंधूंनो आणि भगिनींनो’ अशी सुरूवात करून श्रोत्यांचे मन जिंकून घेतले. त्यानंतर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि अन्य युरोपीय देशांत दौरे केले. त्या दौ-यांत व्याख्याने देऊन पाश्चात्यांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख करून दिली.
त्यानंतर त्यांच्या अनुयायांची संख्या सातत्याने वाढू लागली. १६ सप्टेंबर, १८९६ रोजी स्वामी स्वदेशी परतले. परतल्यावर त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन ह्या संस्था स्थापन केल्या.
पाश्चात्य जगाला वेदान्ताचे हिंदू तत्वज्ञान आणि योग ह्याची माहिती करून देण्यात स्वामी विवेकानंदांचा पुढाकार होता. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जागतिक स्तरावर हिंदू धर्माला त्याचे स्थान मिळवून देण्यात ते यशस्वी झाले.
ते एक देशभक्त संन्यासी म्हणून प्रसिद्ध होते. १८९७ साली हिंदुस्थानात प्लेगची साथ आली तेव्हा स्वामींनी दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी संघटना उभी केली. मुर्शिदाबाद, ढाका, कलकत्ता, मद्रास इत्यादी ठिकाणी सेवाश्रम उघडले. आपल्या प्रवचनांतून देशभक्ती, बंधुभाव, मानवसेवा, अस्पृश्यता निर्मूलनाचा संदेश दिला. देशभर अनेक शैक्षणिक केंद्रे उघडली. आजही कन्याकुमारी येथे विवेकानंद स्मारक उभे आहे.
४ जुलै, १९०२ साली ह्या तेजःपुंज संन्याशाचे देहावसान झाले. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ आजही आपल्याला मार्ग दाखवत आहेत.
स्वामी विवेकानंद निबंध मराठी 320 शब्द – Swami Vivekananda Nibandh in Marathi 320 Words
हिंदू धर्माची पताका अमेरिकेत फडकवण्याचे कार्य एका महान संन्याशाने केले त्याचे नाव स्वामी विवेकानंद. स्वामीजींचा जन्म १२ जानेवारी, १८६३ रोजी कलकत्ता येथील एका कायस्थ जमीनदार घराण्यात झाला. त्यांचे नाव त्यांच्या मातापित्यांनी नरेंद्रनाथ असे ठेवले होते. नरेंद्रनाथ हे नऊ भावंडांपैकी एक होते. त्यांचे पिता विश्वनाथ दत्त हे कलकत्ता उच्च न्यायालयात वकील होते. तर आई भुवनेश्वरी गृहिणी होती. नरेंद्रांचे आजोबा दुर्गाचरण हे संस्कृत आणि पर्शियनचे विद्वान होते. त्यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षीच संन्यास घेतला होता.
कदाचित नरेंद्रांमध्ये त्यांचे गुण आले असतील. नरेंद्र लहानपणापासूनच खूप तेजस्वी होते. त्यांचा ओढा अध्यात्माकडे होता. सुरूवातीला त्यांच्यावर ब्राम्हो समाजाचा प्रभाव होता. परंतु पुढे त्यांनी रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्यत्व पत्करले. रामकृष्णांनी त्यांना शिकवण दिली की सर्व जीव एकाच परमात्म्यापासून निर्माण झाले आहेत आणि मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. रामकृष्णांच्या मृत्यूनंतर विवेकानंदांनी संपूर्ण भारतीय उपखंडात पदयात्रा काढली आणि ब्रिटिशांच्या सत्तेखालील भारताची काय अवस्था आहे ह्याची प्रत्यक्षमाहिती मिळवली.
त्यांचे इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व होते. त्यामुळे १८९३ साली जेव्हा अमेरिकेत जागतिक धर्मपरिषद भरली तेव्हा हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंदांना पाठवले गेले. तिथे त्यांनी ‘ माझ्या अमेरिकेतील बंधूंनो आणि भगिनींनो’ अशी सुरूवात करून श्रोत्यांचे मन जिंकून घेतले. त्यानंतर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि उर्वरित युरोप येथे दौरे केले. त्या दौ-यांत व्याख्याने देऊन पाश्चात्यांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख करून दिली. त्यामुळे त्यांच्या अनुयायांची संख्या सातत्याने वाढू लागली. १६ सप्टेंबर, १८९६ रोजी स्वामी स्वदेशी परतले . परतल्यावर त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन ह्या संस्था स्थापन केल्या.
पाश्चात्य जगाला वेदान्ताचे हिंदू तत्वज्ञान आणि योग ह्याची माहिती करून देण्यात स्वामी विवेकानंदांचा पुढाकार होता. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जागतिक स्तरावर हिंदू धर्माला त्याचे स्थान मिळवून देण्यात ते यशस्वी झाले. ते एक देशभक्त संन्यासी म्हणून प्रसिद्ध पावले.
पण त्यांचे कार्य तेवढ्यावरच संपत नाही. १८५७ साली हिंदुस्थानात प्लेगची साथ आली तेव्हा स्वामींनी दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी संघटना उभी केली. मुर्शिदाबाद, ढाका, कलकत्ता, मद्रास इत्यादी ठिकाणी सेवाश्रम उघडले. आपल्या प्रवचनांतून देशभक्ती, बंधुभाव, मानवसेवा, अस्पृश्यता निर्मूलनाचा संदेश दिला. देशभर अनेक शैक्षणिक केंद्रे उघडली.
४ जुलै, १९०२ साली ह्या तेजःपुंज संन्याशाचे देहावसान झाले. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ आजही आपल्याला मार्ग दाखवत आहेत.
स्वामी विवेकानंद निबंध मराठी 350 शब्द – Swami Vivekananda Nibandh in Marathi 350 Words
भारतात नवजागरणाचा शंखनाद करणाऱ्या महापुरुषांमध्ये स्वामी विवेकानंदांचे स्थान अनन्यसाधारण आहे. स्वामीजींचा जन्म इ. स. १८६३ मध्ये झाला. त्यांचे नाव नरेंद्रनाथ होते. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धी आणि उच्च विचारांची देणगी त्यांना मिळालेली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. १८८४ मध्ये त्यांनी पदवी परीक्षा पास केली. त्यांच्या आईची इच्छा त्यांनी वकील बनावे अशी होती. परंतु स्वामीजींचा कल अध्यात्माकडे होता.
शेवटी ते स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या संपर्कात आले. स्वामी रामकृष्ण परमहंसांचा साधेपण, सरळपणा, दृढ आत्मविश्वास तत्त्वज्ञान आणि वाणीमधील अद्भुत शक्ती यामुळे ते त्यांचे भक्त बनले. स्वामीजींकडून त्यांनी आध्यात्म आणि वेदान्ताचे ज्ञान प्राप्त केले. स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व विलक्षण आकर्षक होते. त्यांच्या चेहऱ्यावर अद्वितीय तेज होते. भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञानाचे त्यांना चांगले ज्ञान होते. स्वामी विवेकानंदांनी बरीच वर्षे हिमालयात तपश्चर्या केली. तिथे त्यांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले. परंतु त्यांची निष्ठा आणि आध्यात्मिक शक्तीने त्यांना बळ दिले. ते तपस्व्यांच्या सहवासात राहिले. त्यानंतर त्यांनी देशभर प्रवास केला. त्यांची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढू लागली.
इ. स. १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे विश्वधर्म संमेलनात भाग घेण्यासाठी गेले. स्वामीजींचे विद्वत्तापूर्ण, ओजस्वी आणि प्रवाही वक्तृत्व ऐकून तेथील जनता मंत्रमुग्ध झाली. त्यांना अनेक विद्यापीठांनी आमंत्रित केले, अनेक पाद्री आणि मोठमोठ्या धर्मगुरूंनी चर्चमध्ये भाषणांसाठी त्यांना बोलावले. तीन वर्षे अमेरिकेत राहून त्यांनी वेदांताचा प्रचार केला. भारतीय तत्वज्ञान व संस्कृती यांची ओळख करुन दिली. त्यानंतर ते इंग्लंडला गेले. त्यांच्या अनुयायांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. स्वामीजी १६ सप्टेंबर १९९६ ला स्वदेशी येण्यास निघाले. भारतात परत आल्यानंतर त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. देशभर दौरे करुन शांती व समतेचा संदेश दिला.
स्वामीजी मानव सेवेलाच ईश्वर सेवा समजत. त्यांनी भारतीयांच्या मध्ये स्वातंत्र्य प्राप्तीची इच्छा निर्माण केली. १८५७ मध्ये प्लेगची साथ आली. तेव्हा स्वामीजींनी दीन दुबळ्यांच्या सेवेसाठी संघटना उभी केली. मुर्शिदाबाद, ढाका, कलकत्ता, मद्रास आदी ठिकाणी सेवाश्रम उघडले. त्यांनी आपल्या प्रवचनांमधून लोकांना आत्मविश्वास, देशप्रेम, बंधुभाव, मानव सेवा, अस्पृश्यतेचा संदेश दिला. विवेकानंदांनी शिक्षणावर खूप भर दिला व देशभर अनेक शैक्षणिक केंद्रे उघडली.
४ जुलै १९०२ ला स्वामीजींचे देहावसान झाले. आज स्वामीजी आपल्यात नाहीत परंतु त्यांचे जीवन चरित्र दीपस्तंभाप्रमाणे आपणास मार्गदर्शन करीत आहे. त्यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशनच्या शाखा आजही वेदांताचा प्रसार-प्रचार करीत आहेत व जनसेवा करीत आहेत.
स्वामी विवेकानंद निबंध मराठी 400 शब्द – Swami Vivekananda Nibandh in Marathi 400 Words
भारतात नवजागरणाचा शंखनाद करणाऱ्या महापुरुषांमध्ये स्वामी विवेकानंदांचे स्थान अनन्यसाधारण आहे. स्वामीजींचा जन्म इ. स. १८६३ मध्ये झाला. त्यांचे नाव नरेंद्रनाथ होते. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धी आणि उच्च विचारांची देणगी त्यांना मिळालेली होती. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. १८८४ मध्ये त्यांनी पदवी परीक्षा पास केली. त्यांच्या आईची इच्छा त्यांनी वकील बनावे अशी होती. परंतु स्वामीजींच्या मनात एक आध्यात्मिक भूक जागृत झाली होती. ती शांत करण्यासाठी ते जास्तीत जास्त वेळ साधू-संतांच्या सहवासात घालवीत होते. परंतु त्यांना असा कोणी अध्यात्मिक गुरू मिळाला नाही ज्याच्याकडून दीक्षा मिळेल.
सत्याच्या शोधात ते सतत भटकत राहिले पण त्यांना शांती मिळाली नाही. शेवटी ते स्वामी रामकृष्ण परमहंसांच्या संपर्कात आले. त्यांनी स्वामीजींना आपल्या शंका विचारल्या. स्वामी रामकृष्ण परमहंसांचा साधेपण, सरळपणा, दृढ आत्मविश्वास तत्त्वज्ञान आणि वाणीमधील विजेसारखी अद्भुत शक्ती यामुळे ते त्यांचे भक्त बनले. स्वामीजींकइन त्यांनी आध्यात्म आणि वेदान्ताचे ज्ञान प्राप्त केले.
स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व विलक्षण आकर्षक होते. त्यांच्या चेहऱ्यावर अद्वितीय तेज होते. भारतीय धर्म आणि तत्त्वज्ञानाचे त्यांना चांगले ज्ञान होते. स्वामी विवेकानंदांनी बरीच वर्षे हिमालयात तपश्चर्या केली. तिथे त्यांना कठीण परिस्थितीला तोंड घावे लागले. परंतु त्यांची निष्ठा आणि आध्यात्मिक शक्तीने त्यांना विचलित होऊ दिले नाही. ते तपस्व्यांच्या सहवासात राहिले. त्यानंतर त्यांनी देशभर प्रवास केला. त्यांची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढू लागली.
इ. स. १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे विश्वधर्म संमेलनात भाग घेण्यासाठी गेले. पैसा कमी असल्यामुळे त्यांना तिथे कष्ट करावे लागले. स्वामीजींचे विद्वत्तापूर्ण, ओजस्वी आणि प्रवाही वक्तृत्व ऐकून तेथील जनता मंत्रमुग्ध झाली. त्यांना अनेक विद्यापीठांनी आमंत्रित केले, अनेक पाद्री आणि मोठमोठ्या धर्मगुरूंनी चर्चमध्ये भाषणांसाठी त्यांना बोलावले. लोक त्यांचे भाषण ऐकण्यासाठी नियोजित वेळेपूर्वी काही तास आधीच येत. तीन वर्षे अमेरिकेत राहून त्यांनी वेदांताचा प्रचार केला. त्यानंतर ते इंग्लंडला गेले. त्यांची कीर्ती तेथे आधीच जाऊन पोहोचली होती. तसेच त्यांच्या अनुयायांची संख्याही दिवसें दिवस वाढू लागली. अनेक व्यापारी, प्राध्यापक, वकील आणि राजकीय नेते त्यांचे शिष्य बनले. जवळपास एक वर्ष ते इंग्लंडमध्ये राहिले. चार वर्षानंतर स्वामीजी १६ सप्टेंबर १९९६ ला स्वदेशी येण्यास निघाले. भारतात आल्यावर ठिकठिकाणी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यांनी संपूर्ण भारताचा दौरा केला. लाहोर, राजपुताना, सियालपूर येथे प्रवचने केली. याच काळात त्यांनी दोन मठांची स्थापना केली.
स्वामीजी मानव सेवेलाच ईश्वर सेवा समजत. त्यांनी भारतीयांच्या मध्ये स्वातंत्र्य प्राप्तीची इच्छा निर्माण केली. १८५७ मध्ये प्लेगची साथ आली. स्वामीजींनी दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी अनेक साधुसंतांची संघटना उभी केली. मुर्शिदाबाद, ढाका, कलकत्ता, मद्रास आदी ठिकाणी सेवाश्रम उघडले. त्यांनी आपल्या प्रवचनांनी लोकांमध्ये आत्मविश्वास, देशप्रेम, बंधुभाव, मानव सेवा, अस्पृश्यतेचा संदेश दिला.
आत्यंतिक परिश्रमामुळे स्वामीजी आजारी पडले तरी त्यांनी समाधी लावणे सोडले नाही. ४ जुलै १९०२ ला स्वामीजींचे देहावसान झाले. आज स्वामीजी आपल्यात नाहीत परंतु त्यांचे जीवन चरित्र दीपस्तंभाप्रमाणे आपणास मार्गदर्शन करीत आहे. त्यांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशनच्या शाखा आजही वेदांताचा प्रसार-प्रचार करीत आहेत व जनसेवा करीत आहेत.
पुढे वाचा:
- मकरसंक्रांत निबंध मराठी
- प्रजासत्ताक दिन निबंध मराठी
- नवीन वर्ष निबंध मराठी
- पावसाळा निबंध मराठी
- मानव आणि पर्यावरण
- पर्यावरण निबंध मराठी
- माझा आवडता प्राणी सिंह
- माझा आवडता प्राणी गाय
- माझा आवडता प्राणी कुत्रा
- माझा आवडता प्राणी निबंध
- माझा आवडता प्राणी हत्ती निबंध
- माझा आवडता पक्षी पोपट
- पोपट पक्षी माहिती मराठी
- शिवाजी महाराज निबंध मराठी
- माझा आवडता शिक्षक निबंध मराठी
- माझी मायबोली मराठी निबंध
- माझा महाराष्ट्र निबंध मराठी
- माझे आजोळ निबंध मराठी
- स्वतःवर निबंध मराठी
- माझी बहिण निबंध
- माझी शाळा मराठी निबंध
- माझी आई निबंध मराठी
- दिवाळी सणाची माहिती मराठीत
- दिवाळी निबंध मराठी
- माझे आजोबा निबंध मराठी
- माझी आजी निबंध मराठी
- माझे बाबा निबंध मराठी
- मी पाहिलेला अपघात निबंध
- माझा आवडता खेळ निबंध
प्रश्न.१ स्वामी विवेकानंद यांचा जन्म कधी झाला?
उत्तर- स्वामी विवेकानंद यांचा जन्म १२ जानेवारी, १८६३ रोजी झाला.
प्रश्न.२ स्वामी विवेकानंदांचा मृत्यू कधी झाला?
उत्तर- स्वामी विवेकानंदांचा मृत्यू ४ जुलै, १९०२ रोजी झाला.