अपंग आणि मी निबंध मराठी
अपंग आणि मी निबंध मराठी

अपंग आणि मी निबंध मराठी

एकदा एक अंध गृहस्थ रस्त्याने जात होते. तेवढ्यात त्यांचा पाय चुकून एका खड्ड्यात पडला आणि ते कोलमडून खाली पडले. आजूबाजूचे काही लोक मोठमोठ्याने चालू लागले. हसू लागले. मला खूप वाईट वाटले. मी धावत गेलो. त्यांना उठण्यास मदत केली. ते उभे राहिले.

त्यांनी माझे आभार मानले आणि चालू लागले. चालताना मदत करण्यासाठी मी पुढे झालो. पण त्यांनी मदत नाकारली आणि शांतपणे मला आश्चर्य वाटले. पण माझ्या लक्षात आले, त्यांना जेवढ्यास तेवढीच मदत हवी होती. पण पुढे मात्र त्यांना स्वत:च्या बळावर चालायचे होते. म्हणजेच त्यांना दया नको होती.

म्हणजेच अपंगांना कीव केलेली आवडत नाही. मला वाटते, अपंगांशी प्रेमाने वागावे. त्यांना व्यंगावरून चिडवू नये. ते क्रूरपणाचे आहे. अपंग असणे, हा काही त्यांचा दोष नव्हे. त्यांना इतर मित्रांसारखेच वागवले पाहिजे. तरच त्यांना आयुष्यात आनंद मिळवता येईल.

पुढे वाचा:

Leave a Reply