रुखवताची भांडी यादी – Rukhwat Bhandi

लग्नामध्ये मुलीला सासरी जाताना काही भांडी देण्याची पद्धत आहे. प्रत्येक जातीजमातीत काही वेगळी भांडी दिली जातात. आपली सांपत्तिक परिस्थिती आणि हौस ह्यावर देण्याघेण्याच्या गोष्टी अवलंबून असतात. हौसेने तुम्ही मुलीसाठी खूप भांडी घेऊ शकता. तरी पण रीतीप्रमाणे जे काही द्यावे लागते त्याची यादी देत आहे.

  • एक चहासाठी स्टीलचे भांडे
  • दोन चहासाखरेचे डबे
  • एक ट्रे, कपबशा वगैरे
  • पाच पितळेची पातेली (शिधा घालून)
  • एक परात, एक स्टीलचे पिंप किंवा हंडा कळशी
  • एक समई, एक तुपासाठी भांडे
  • एक सहाण, एक काशाची वाटी
  • एक गडू, एक ताम्हण, एक तांब्या, एक भांडे
  • दोन वाट्या (तेल हळदीसाठी)
  • एक तबक, पानसुपारीचा डबा
  • एक आरसा, एक कंगवा, जोडवी, हिरव्या बांगड्या
  • मणी मंगळसूत्र, कुंकवाचा करंडा,
  • पाच बाटल्या मोरंब्यासाठी.

पुढे वाचा:

Leave a Reply