आमंत्रणासाठी पत्राचा नमुना मराठी – Amantran Patra in Marathi

॥ श्री ॥

आनंदराव गोडबोले
आनंदनगर, डॉ. गोडबोले रस्ता,
दादर, मुंबई – २८
१-१२-९१

सप्रेम नमस्कार,

आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, चि. कल्पनाचा विवाह २६ डिसेंबर ९१ रोजी चि. भारत (सौ. शकुंतला व श्री. दुष्यंत पटवर्धन यांचा ज्येष्ठ पुत्र) याच्याशी करण्याचे ठरविले आहे.

खरे म्हणजे आम्ही प्रत्यक्ष येऊन बोलावणे करायला हवे होते. परंतु अंतर आणि वेळ या गोष्टी लक्षात घेता ते शक्य नाही. म्हणून आज ह्या पत्ररूपाने बोलावणे करीत आहोत. हे प्रत्यक्ष येऊन केलेले बोलावणे आहे असे समजावे.

आपण सर्वांनी लग्नाला उपस्थित राहावे व कार्याला शोभा आणावी अशी आमची फार इच्छा आहे. आपण सगळ्यांनी सकाळपासून हॉलवर यावे. लग्न समारंभ, भोजन व रिसेप्शन ह्या सर्व कार्यक्रमात आमच्याबरोबर सहभागी व्हावे. आपल्या येण्याने आमचा आनंद वाढणार आहे.

आमंत्रण पत्रिका छापून आल्यानंतर रीतसर पाठवत आहोच.

कळावे.

आपले,
आनंदराव गोडबोले
सौ. स्मिता गोडबोले

वरील मसुद्यात लग्नाची वेळ, स्थळ, स्वागत समारंभाची वेळ इ. तपशील दिल्यास वेगळी आमंत्रण पत्रिका छापण्याची गरज नाही.


पुढे वाचा:

Leave a Reply