आपले सामाजिक कर्तव्य निबंध मराठी – Aple Samajik Kartavya Nibandh in Marathi
आज सव्वाकोटीपेक्षा जास्त लोक मुंबई महानगरीत राहत आहेत. एकेकाळी सोन्याची लंका म्हणून शाहीरांनी गौरविलेली ही महानगरी आज गलिच्छ गटारे व झोपडपट्ट्यांनी वेढलेली व दुर्गधीमुळे डासांच्या कचाट्यात सापडलेली दुर्दैवी नगरी झाली आहे. उघडी गटारे, प्लाष्टिक पिशव्यांचा खच, बिसलरीच्या बाटल्या पाण्याच पाईप, सांडपाण्याचे पाईप फुटून झालेली दलदल आणि त्यामुळे माशा, चिलटे, डास, मलेरिया, इन्फ्यूएंझा सारख्या रोगाना बळी पडावे लागते.
एका घराला गरजेंपुरते पाणी मिळण्याऐवजी नळ सोडून किंवा पाईपलाईन फोडून पाणी वाया घालवले जाते. गटारेनाले तुडूंब भरुन वाहतात. त्यातय अशिक्षित वृत्तीमूळे कचरा प्लाष्टिक पिशवीत भरुन गटारात टाकला जातो त्यामुळे तो तिथेच सडतो. पाण्याचा प्रवाह अडवला जातो व ते दुर्गंधयुक्त पाणी डासाचा प्रार्दुभाव वाढविण्यास मदत करते व रोगांना आमंत्रण देते, त्यातुन सांसर्गिक रोगांना बळी पडावे लागते.
अस्वच्छता हा मनुष्य प्राण्याचा मूळ दुर्गुण आहे. त्यामुळे कचराडबा असूनही कचरा डब्यात न पडता, इमारतींच्या आजूबाजूला व कचराडव्याच्या भोवताली पडतो आणि आपले ते काम नसून महानगरपालिकेचे आहे व त्यांचे सफाई कामगार ते साफ करतील या वृत्तीमुळे जिकडेतिकडे घाणीचे साम्राज्य पसरुन पुन्हा रोगराई घरापर्यंत आली तरी समजत नाही.
सार्वजनिक स्वच्छतागृहे देखील साफ रहात नाहीत व आपले नैतिक, सामाजिक कर्तव्य ध्यानात घेतले जात नाही. फॅशन, व्यसने, खाण्याच्या सवयी सोईनुसार परदेशातून उचलल्या जातात पण त्यांच्यातील स्वच्छतावृत्ती सहजी स्वीकारली जात नाही. पान, तंबाखू खाऊन इतरत्र थुकणे यातच आपला मोठेपणा समजला जातो पण तो न टाकता सार्वजनिक परिसर स्वच्छ राखण्यास मदत करणेही तितकेच फायद्याचे आहे हे समजले जात नाही.
कारखानदार देखील कारखाने काढून समाजाला अस्वच्छतेच्या खाईतच ढकलतात. सांडपाण्याचे, कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंचे योग्य नियोजन नसल्याने लोकवस्त्यांना कितीतरी संकटाना सामोरे जावे लागते. ‘आपला तो बाब्या व दुसऱ्याचे ते कार्टे’ या उक्तीप्रमाणे आपली घरे स्वच्छ बनवून कचरा अंगणात व परिसरातच फेकला जातो परंतु याच गोष्टीचे सुनियोजन असेल तर आपल्या राष्ट्रीय संपत्तीचे संरक्षण होईल. प्रत्येक नागरिक सुजाण बनेल व राष्ट्र, राज्य, शहर, गाव खऱ्या अर्थाने सुजलाम, सुफलाम बनेल हाच आपल्या देशाचा गौरव ठरेल, मानाया मुजरा ठरेल.
पुढे वाचा:
- आपले शेजारी देश निबंध मराठी
- (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन माहिती
- माझा देश निबंध मराठी
- स्वातंत्र्य दिन मराठी निबंध
- आदर्श विद्यार्थी मराठी निबंध
- आदर्श नागरिक मराठी निबंध
- आत्महत्या सुटकेचा अनैतिक मार्ग निबंध मराठी
- आणि झाडे गप्प झाली निबंध मराठी
- आठवड्यामध्ये रविवार नसता तर निबंध मराठी
- आजकालचे लग्नसमारंभ निबंध मराठी
- आकाश दर्शन निबंध मराठी
- अस्वच्छता आणि प्रदूषण मराठी निबंध
- ध्वनि प्रदूषण मराठी माहिती
- मृदा प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती
- हवा प्रदूषण मराठी माहिती
- जल प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती