भगवान महावीर निबंध मराठी – Bhagwan Mahavir Essay in Marathi

भगवान महावीर जैन धर्माचे महान तीर्थकार होते. त्यांना जैन धर्माचा प्रवर्तक मानले जाते. महावीर स्वामींचा जन्म किमान २५०० वर्षापूर्वी लिच्छवी वंशाचे राजा सिद्धार्थ यांच्या येथे कुंडलग्राममध्ये झाला होता. ते क्षेत्रिय वर्णाचे होते. त्यांच्या आईचे नाव त्रिशला देवी होते. त्या अंत्यत धार्मीक स्वभावाच्या महिला होत्या. महवीरांचे बालपणीचे नाव वर्धमान असं होतं.

ते किशोरवयीन असतानाच एका मदमस्त हत्तीला आणि एका भयंकर सर्पाला स्वतःच्या प्रभावाने शांत केले होते. त्या दिवसापासूनच त्यांना महावीर असे म्हणण्यात येऊ लागले. बालपणापासून त्यांनी आपल्या इंद्रियावर आणि इच्छांवर विजय मिळवला होता. म्हणून देखील त्यांना महावीर असे संबोधण्यात येते.

तारूण्यात त्यांचा विवाह एका सुंदर राजकुमारीसोबत झाला परंतु त्यांचे मन संसारात काही रमले नाही. ते सतत ध्यान धारणा आणि मनन-चिंतनात गढलेले असत. वडिलाच्या मृत्यूनंतर तर त्यांना अधिकच वैराग्य आले.

महावीरांने मोक्षाला जीवनाचा एकमेव उद्देश असल्याचे सांगितले त्यासाठी उच्च नैतीक आचरण, अहिंसा आणि अस्तेय अर्थात चोरी आदी न करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यांनी जीवनात वस्तूंचा संग्रह करण्याला देखील विरोध केला. जैन धर्माचे अनुयायी महावीरांनी सांगितलेल्या साधना मार्गावरून चालून मोक्षप्राप्तीचा प्रयत्न करताना दिसतात. भारतात अनेक ठिकाणी महावीरजींचे देवालय तसेच जैन मंदीर पहायला मिळते.

भगवान महावीर निबंध मराठी – Bhagwan Mahavir Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply