Christmas Essay in Marathi : ख्रिसमस म्हणजेच नाताळ वर निबंध लिहिणे हा लहान मुलांसाठी आणि सर्व वयोगटातील लोकांच्या आवडीचा विषय आहे. ख्रिसमस हा सर्वात लोकप्रिय सणांपैकी एक आहे, जो जगभरातील विविध समुदायातील लोक मोठ्या प्रमाणावर साजरा करतात. हा सण ख्रिश्चन लोक मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. सांताक्लॉजकडून भरपूर भेटवस्तू मिळाल्याने लहान मुले या सणाचा आनंद लुटतात.

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी हा नाताळ या शुभ सणाचे सार समजून घेण्यासाठी तरुण विद्यार्थ्यांसाठी आहे. शाळेत किंवा कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात त्यांना या विषयावर निबंध तयार करण्यास सांगितले जाते तेव्हा ते ख्रिसमसबद्दलचा निबंध नमुना म्हणून वापरू शकतात.

येथे ख्रिसमस वर अनेक लहान मोठे निबंध आहे ज्याचा संदर्भ मुले स्वतः एक निबंध लिहिताना घेऊ शकतात.

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी
ख्रिसमस नाताळ निबंध मराठी

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी – Christmas Essay in Marathi

मुलांसाठी ख्रिसमस वर 10 ओळी निबंध – 10 Lines on Christmas in Marathi

  1. ख्रिसमस हा ख्रिश्चनांचा प्रसिद्ध सण आहे.
  2. 25 डिसेंबरला ख्रिश्चन हा सण साजरा करतात.
  3. ख्रिसमसच्या या सुंदर दिवशी येशूचा जन्म झाला आहे, म्हणूनच लोक हा दिवस सण म्हणून साजरा करतात.
  4. ख्रिश्चन विविध कार्यक्रम आयोजित करून आणि जवळच्या लोकांना आमंत्रित करून ख्रिसमस साजरा करतात.
  5. ख्रिसमसमध्ये लोक अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवतात.
  6. ख्रिसमसच्या दिवशी लोक त्यांची घरे सजवतात.
  7. ख्रिश्चन देखील ख्रिसमस ट्री सजवतात.
  8. लोकांचा असा विश्वास आहे की या दिवशी सांताक्लॉज मुलांना भेटवस्तू देण्यासाठी दिसतात.
  9. या खास प्रसंगी संपूर्ण कुटुंब एकत्र गाणी गाते.
  10. ख्रिश्चन लोकांसाठी ख्रिसमस हा एक अद्भुत आणि पवित्र सण आहे.
10 Lines on Christmas in Marathi
10 Lines on Christmas in Marathi

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी – Short Paragraph on Christmas in Marathi

भारत हा विविधतापूर्ण देश आहे. भारतात अनेक धर्मांचे लोक राहतात. प्रत्येकाच्या रीतीरिवाजाप्रमाणे सण, पोषाख, आहाराच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. हिंदूंची दिवाळी, मुस्लिमांचा ईद आणि ख्रिश्चन लोकांचा नाताळ हा मोठा सण असतो. हा सण संपूर्ण जगभर ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे २५ डिसेंबर, येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस असतो. ख्रिश्चन बांधव हातात क्रॉस घेऊन आदल्या दिवशी रात्री चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात तसेच २५ डिसेंबरलाही नवीन कपडे घालून पुन्हा चर्चमध्ये जाऊन उपासना करतात. प्रत्येक घरात गोडधोड पदार्थ, केक केले जातात. या सणात नाताळबाबा लहान मुलांना खाऊ, खेळणी देतो अशी समजूत आहे. या दिवशी ख्रिश्चन बांधवांना इतर धर्मांचे लोकही ‘हॅपी ख्रिसमस’ अशा शुभेच्छा देतात.

कठीण शब्दार्थ :- धर्म – Religion; रीतीरिवाज – Custom; क्रॉस – Cross; चर्च – Church; शुभेच्छा – Wishes; विविधतापूर्ण – Full of Variety.

Short Paragraph on Christmas in Marathi
Short Paragraph on Christmas in Marathi

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी – Short Essay on Christmas in Marathi

[मुद्दे : ख्रिस्त बांधवांचा सण – येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस – लोक घरे सजवतात – चांदणी टांगतात – रोषणाई करतात – २४ डिसेंबरला रात्री केक – व – चर्चमध्ये – घरी अन्य गोड पदार्थ – एकमेकांना शुभेच्छा – सांताक्लॉज- मुलांना खेळणी व गरिबांना दानधर्म – आनंदाचा सण.]

नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा सण आहे. हा सण २५ डिसेंबर या दिवशी साजरा करतात. हा भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. म्हणून हा सण मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

या दिवशी ख्रिस्ती बांधव आपली घरे सजवतात. दारात कागदाची चांदणी टांगतात. सर्वत्र रोषणाई करतात. नवीन कपडे परिधान करून लोक २४ डिसेंबर रोजी रात्री चर्चमध्ये जमतात. तेथे ते ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करतात. नाताळची गाणी गात गात फेर धरून नाचतात.

या दिवशी ख्रिस्ती बांधव घरी केक व अन्य गोड पदार्थ करतात. सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देतात. नाताळबाबा म्हणजे सांताक्लॉज येऊन मुलांना खाऊ व खेळणी देतो. तो गरिबांना कपडे व खाऊ वाटतो. असा हा सर्वांना आनंद देणारा सण आहे.

Short Essay on Christmas in Marathi
Short Essay on Christmas in Marathi

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी – Christmas Essay in Marathi

नाताळ हा ख्रिश्चन धर्मीय लोकांचा सण दर वर्षी २५ डिसेंबर रोजी येतो. ह्या दिवशी येशू खिस्ताचा जन्म झाला. त्याच्या आईचे नाव मेरी असे होते. त्याचा जन्म बेथलहेम येथे झाला. त्याचा जन्म झाला तेव्हा आकाशातून एक तेजस्वी तारा तुटला. त्या वेळेस तीन शहाण्या माणसांना साक्षात्कार झाला की देवाचा पुत्र जन्माला आलेला आहे.

येशूला लोक ज्यूंचा राजा मानत होते म्हणून रोमनांनी आणि ज्यू पुजा-यांनी येशूला क्रुसावर चढवले.

नाताळ हा सण युरोप, अमेरिका आणि जगात जिथेजिथे ख्रिश्चनधर्मीय आहेत तिथेतिथे साजरा केला जातो. ह्या दिवशी लोक चर्चमध्ये जाऊन येशूची प्रार्थना करतात. ह्या दिवशी लहान मुले खूप खुशीत असतात. ती रात्री झोपी जातात तेव्हा सांताक्लॉज हा पांढ-या दाढीचा जादूचा म्हातारा येतो आणि त्यांच्या मोज्यांमध्ये चॉकलेट, खाऊ आणि खेळणी ठेवून जातो. खरे सांगायचे तर त्यांचे आईबाबाच त्या वस्तू ठेवत असतात पण हे मुलांना न कळल्यामुळे त्यांना वाटते की सांताक्लॉजनेच ह्या वस्तू ठेवल्या आहेत.

असा हा नाताळ सण फारच उत्साहाने सर्वत्र साजरा होतो.

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी–Christmas Essay in Marathi
ख्रिसमस नाताळ निबंध मराठी, Christmas Essay in Marathi

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी – Essay on Christmas in Marathi

[मुद्दे : ख्रिस्ती बांधवांचा मोठा सण – येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस – घराची स्वच्छता, सजावट – इतरांना भेटी व शुभेच्छा – ख्रिसमस ट्री – प्रार्थना नाताळबाबा सर्वांसाठी सुखशांतीची मागणी.]

‘नाताळ’ हा ख्रिस्ती बांधवांचा सर्वांत मोठा सण आहे. आज इतर धर्मांचे लोकही या सणाचा आनंद लुटतात. नाताळ म्हणजे ख्रिसमस हा सण दरवर्षी पंचवीस डिसेंबरला साजरा केला जातो. हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आहे. चोवीस डिसेंबरची रात्र ही नाताळची रात्र म्हणून साजरी केली जाते.

या दिवशी ख्रिस्ती बांधव आपले घर पताका, फुले यांनी सजवतात. पांढऱ्या शुभ्र कागदाची चांदणी आकाशकंदील म्हणून टांगतात. या सणाच्या निमित्ताने ख्रिस्ती बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात. काही घरांतून ‘ख्रिसमस ट्री’ सुद्धा तयार करतात.

नाताळच्या दिवशी सर्व ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जाऊन परमेश्वराची प्रार्थना करतात. नाताळच्या रात्री घरातील सर्व लहानमोठी माणसे एकत्र येऊन नाताळाची गाणी गातात. त्या रात्री नाताळबाबा छोट्यांना भेटी देतो. नाताळात गरिबांना दानधर्म केला जातो. ‘सर्वांना सुखशांती लाभो’, अशी सदिच्छा या दिवशी सर्वजण व्यक्त करतात.

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी – Natal Nibandh in Marathi

ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मीयांचा सण आहे. २५ डिसेंबर ह्या दिवशी त्यांच्या धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त ह्याचा जन्म झाला म्हणून हा सण दर वर्षी त्याच दिवशी साजरा केला जातो. जेरूसलेमजवळील बेथलेहेम येथील एका गोठ्यात येशूचा जन्म झाला होता. त्याच्या मातेचे नाव मेरी आणि पित्याचे नाव जोसेफ असे होते. त्याच्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यासाठी जगभरहा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो.

युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका ह्या खंडातील देशांमधली बहुसंख्य जनता ख्रिश्चन असल्याने जगात हा सण ब-याच ठिकाणी साजरा केला जातो. २५ डिसेंबरच्या दोनतीन आठवडे आधीपासूनच सा-या बाजारपेठा नवनव्या वस्तूंनी भरभरून जाऊ लागतात. नवीन कपडे, नव्या भेटवस्तू आणि मिठाया ह्यांनी दुकाने भरून वाहू लागतात.

सणाच्या काही दिवस अगोदर लोक आपल्या घरांची, कचे-यांची साफसफाई करून घेतात. ब-याच लोकांच्या अंगणात खिसमस ट्री असतो. तो ख्रिसमस ट्री ह्या दिवसात छान सजवला जातो. त्यावर चित्रे, फळे, फुले, फुगे आणि त-हे त-हेच्या माळा लावल्या जातात. चर्चचीसुद्धा सजावट केली जाते.

ख्रिसमसच्या दिवशी रात्री बारा वाजता चर्चमध्ये प्रार्थना आणि गीते गायली जातात. ह्या सणाचा सोहळा २५ डिसेंबरपासून १ जानेवारीपर्यंत चालतो. लोक आपल्या स्नेह्यांना मिठाई देतात. एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात. नातेवाईकसुद्धा ह्याच काळात एकमेकांना भेटतात. रात्री दिव्यांची रोषणाई केल्यामुळे सारे शहर झगमगू लागते. ठिकठिकाणी येशू ख्रिस्ताच्या जीवनावरची नाटके सादर केली जातात.

ख्रिसमसची आणखी एक गंमत म्हणजे सांताक्लॉज. सांताक्लॉज हा एक दाढीधारी काल्पनिक म्हातारा ह्या सणाला अवतरतो आणि झोपलेल्या लहान मुलांच्या उशाशी भेटवस्तू ठेवून जातो अशी कथा आहे. प्रत्यक्षात त्या मुलांच्या आईबाबांनीच सांताक्लॉजच्या वतीनं त्या भेटवस्तू आणून आपल्या मुलांच्या उशाशी ठेवलेल्या असतात.

संपूर्ण जगातच हल्ली हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती भारतीय ख्रिश्चन बंधूबांधवांना ह्या दिवशी शुभेच्छा देतात.

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी – Christmas Essay in Marathi

ज्याप्रमाणे दसरा आणि दीपावलीचा संबंध राम आणि कृष्णाशी आहे , गोकुळाष्टमी चा संबंध कृष्णाशी आहे त्याचप्रमाणे ख्रिसमसचा संबंध येशू ख्रिस्ताशी आहे. ख्रिसमसचा सण दरवर्षी २५ डिसेंबरला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच दिवशी लोकोद्धारक, परम दयाळू, गरिबांचा सेवक येशूचा जन्म झाला होता. जगात ते मसीह (मृतांना जीवन देणारा) म्हणून विख्यात झाले. म्हणून त्यांना इसा मसीह म्हटले जाते.

२५ डिसेंबरच्या आधी आठवडाभर धूमधाम सुरू होते. लोक आपल्या घरांची स्वच्छता करतात. घरे, दुकाने, कार्यालये, शाळा, महाविद्यालयांत स्वच्छता अभियान चालविले जाते. बंगल्यापासून झोपडीपर्यंत घरे झगमगू लागतात. दुकाने मालाने गच्च भरली जातात. मिठाया, नवी वस्त्रे, नव्या भेटवस्तू लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

ख्रिसमस (नाताळ) सणाच्या आनंदात घराच्या अंगणात ख्रिसमसचा वृक्ष सजविला जातो. त्यावर चित्रे, फळे, फुळे, फुगे, खेळणी अडकविली जातात. चर्चची सजावट केली जाते. सणाचा प्रारंभ चर्चमध्ये विशेष स्तोत्रे व आनंद गीते गाऊन होतो. हा सण २५ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत चालतो. लोक आपल्या स्नेह्यांना मिठाई देतात. एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा व्यक्त करतात. प्रीतिभोजाचे आयोजन केले जाते. रात्री दिवे आणि लाईटमुळे सारा गाव प्रकाशित होतो. ठिकठिकाणी येशू ख्रिस्ताच्या जीवनावर नाटक सादर केले जाते. मोठ्या शहरांत मिरवणूक काढली जाते. ख्रिसमसच्या रात्री मुलांच्या उशाशी चॉकलेट, खेळणी, मिठाई ठेवली जाते. सकाळी मुलांना सांगितले जाते की हे सर्व दयाळू, वृद्ध सांताक्लॉजने भेट म्हणून दिले आहे.

ख्रिसमसचा सण पुनर्मिलनाचा सण आहे. या दिवशी लोक आपल्या कुटुंबीयांना भेटतात. त्यासाठी आपल्या दूर असलेल्या नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणांहून आपल्या गावी येतात. संपूर्ण जगात हा सण उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू लोक आपल्या ख्रिश्चन मित्रांना शुभेच्छा व भेटवस्तू देतात. राष्ट्रपती आणि पंतप्रधान देशातील ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा संदेश देतात. ख्रिसमसचा सण आपणास सेवा, त्याग आणि क्षमाशीलतेचा संदेश देतो. हा दिवश येशू ख्रिस्ताच्या महानतेची आठवण करून देतो.

ख्रिसमस नाताळ निबंध मराठी – Christmas Essay in Marathi

नाताळ म्हणजेच ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मीयांचा सण आहे. त्यांच्या धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त ह्याचा २५ डिसेंबर ह्या दिवशी जन्म झाला म्हणून हा सण दर वर्षी त्याच दिवशी साजरा केला जातो.

जेरूसलेमजवळील बेथलेहेम येथील एका गोठ्यात येशूचा जन्म झाला होता. त्याच्या मातेचे नाव मेरी आणि पित्याचे नाव जोसेफ असे होते. त्याच्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यासाठी जगभर हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो. युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका ह्या खंडातील देशांमधली बहुसंख्य जनता ख्रिश्चन असल्याने जगात हा सण ब-याच ठिकाणी साजरा केला जातो.

२५ डिसेंबरच्या दोनतीन आठवडे आधीपासूनच सा-या बाजारपेठा नवनव्या वस्तूंनी भरभरून जाऊ लागतात. नवीन कपडे, नव्या भेटवस्तू आणि मिठाया ह्यांनी दुकाने भरून वाहू लागतात. सणाच्या काही दिवस अगोदर लोक आपल्या घरांची, कचे-यांची साफसफाई करून घेतात. ब-याच लोकांच्या अंगणात खिसमस ट्री असतो. तो ख्रिसमस ट्री ह्या दिवसात छान सजवला जातो. त्यावर चित्रे, फळे, फुले, फुगे आणि त-हे त-हेच्या माळा लावल्या जातात. चर्चचीसुद्धा सजावट केली जाते.

नाताळच्या दिवशी रात्री बारा वाजता चर्चमध्ये प्रार्थना आणि गीते गायली जातात. त्या प्रार्थनागीतांना कॅरल असे म्हटले जाते. ह्या सणाचा सोहळा २५ डिसेंबरपासून १ जानेवारीपर्यंत चालतो. लोक आपल्या स्नेह्यांना मिठाई देतात. एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा देतात. नातेवाईकसुद्धा ह्याच काळात एकमेकांना भेटतात. रात्री दिव्यांची रोषणाई केल्यामुळे सारे शहर झगमगू लागते. ठिकठिकाणी येशू ख्रिस्ताच्या जीवनावरची नाटके सादर केली जातात.

नाताळची आणखी एक गंमत म्हणजे सांताक्लॉज. सांताक्लॉज हा एक दाढीधारी काल्पनिक वृद्ध ह्या सणाला अवतरतो आणि झोपलेल्या लहान मुलांच्या उशाशी भेटवस्तू ठेवून जातो अशी कथा आहे. प्रत्यक्षात त्या मुलांच्या आईबाबांनीच भेटवस्तू आणून आपल्या मुलांच्या उशाशी ठेवलेल्या असतात.

संपूर्ण जगातच हल्ली हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती भारतीय ख्रिश्चन बंधूबांधवांना ह्या दिवशी शुभेच्छा देतात.

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी निबंध – Christmas Essay in Marathi

ज्याप्रमाणे दसरा आणि दीपावलीचा संबंध राम आणि कृष्णाशी आहे, गोकुळाष्टमी चा संबंध कृष्णाशी आहे त्याचप्रमाणे ख्रिसमसचा संबंध येशू ख्रिस्ताशी आहे. ख्रिसमसचा सण दरवर्षी २५ डिसेंबरला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच दिवशी लोकोद्धारक, परम दयाळू, गरिबांचा आणि रोग्यांचा सेवक येशूचा जन्म झाला होता. जगात ते मसीह (मृतांना जीवन देणारा) म्हणून विख्यात झाले. म्हणून त्यांना इसा मसीह म्हटले जाते.

२५ डिसेंबरच्या आधी आठवडाभर घूमधाम सुरू होते. लोक आपल्या घरांची स्वच्छता करतात. ज्याप्रमाणे दीपावलीच्या पूर्वी केली जाते, घरे, दुकाने, कार्यालये, शाळा, महाविद्यालयांत स्वच्छता अभियान चालविले जाते. बंगल्यापासून झोपडीपर्यंत घरे झगमगू लागतात. दुकाने मालाने गच्च भरली जातात. मिठाया, नवी वस्त्रे, नव्या भेटवस्तू लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

नाताळ सणाच्या आनंदात घराच्या अंगणात ख्रिसमसचा वृक्ष सजविला जातो. त्यावर चित्रे, फळे, फुळे, फुगे, खेळणी अडकविली जातात. चर्चची सजावट केली जाते जशी हिंदू मंदिरांची करतात. सणाचा प्रारंभ चर्चमध्ये विशेष स्तोत्रे व आनंद गीते गाऊन होतो.

ख्रिसमस हा सण २५ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत चालतो. लोक आपल्या स्नेह्यांना मिठाई देतात. एकमेकांच्या घरी जाऊन शुभेच्छा व्यक्त करतात. प्रीतिभोजाचे आयोजन केले जाते. रात्री दिवे आणि लाईटमुळे सारा गाव प्रकाशित होतो. ठिकठिकाणी येशू ख्रिस्ताच्या जीवनावर नाटक सादर केले जाते. मोठ्या शहरांत मिरवणूक काढली जाते. ख्रिसमसच्या रात्री मुलांच्या उशाशी चॉकलेट, खेळणी, मिठाई ठेवली जाते. सकाळी मुलांना सांगितले जाते की हे सर्व दयाळू, वृद्ध सांताक्लॉजने भेट म्हणून दिले आहे.

ख्रिसमसचा सण पुनर्मिलनाचा सण आहे. या दिवशी लोक आपल्या कुटुंबीयांना भेटतात. त्यासाठी आपल्या दूर असलेल्या नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणांहून आपल्या गावी येतात. संपूर्ण जगात हा सण उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू लोक आपल्या ख्रि श्चन मित्रांना शुभेच्छा व भेटवस्तू देतात. राष्ट्रपती आणि पंतप्रधान देशातील ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा संदेश देतात. ख्रिसमस चा सण आपणास सेवा, त्याग आणि क्षमाशीलतेचा संदेश देतो.

पुढे वाचा:

प्रश्न १. ख्रिसमस कधी असतो?

उत्तर – २५ डिसेंबरला ख्रिश्चन ख्रिसमस हा सण साजरा करतात.

प्रश्न २. ख्रिसमस सण का साजरा केला जातो?

उत्तर – ख्रिश्चन त्यांच्या धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त ह्याचा २५ डिसेंबर ह्या दिवशी जन्म झाला म्हणून हा सण दर वर्षी त्याच दिवशी साजरा केला जातो.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

मना घडवी संस्कार मराठी निबंध

“मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”

भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | Bhartatil Vansanpatti Essay Marathi

भारतीय लोकशाही मराठी निबंध | Bhartiya Lokshahi Marathi Nibandh

Leave a Reply