धनुरासन माहिती मराठी – Dhanurasana Information in Marathi

धनुरासन या आसनात शरीर धनुष्याचा आकार धारण करते म्हणून यास धनुरासन म्हणतात.

धनुरासन माहिती मराठी, Dhanurasana Information in Marathi
धनुरासन माहिती मराठी, Dhanurasana Information in Marathi

धनुरासन करण्याची पद्धत

  1. चटईवर पालथे पडा.
  2. पाय आणि बाहू जमिनीवर सरळ ताणून धरा.
  3. दोन्ही बाहू शरीराच्या बाजूला टेकवा.
  4. दोन्ही पाय गुडघ्यात मुडपा.
  5. दोन्ही टाचा दोन्ही पुठ्ठ्यांवर ठेवा.
  6. दोन्ही हात मागे घ्या.
  7. डाव्या पायाच्या खालच्या भागाला डाव्या हाताने आणि उजव्याला उजव्या हाताने पकडा.
  8. सावकाश श्वास घ्या.
  9. कुंभक करा.
  10. बाहू आणि पायांना आकाशाच्या दिशेने ताणून धरून हळूहळू छाती वर उचला.
  11. मान मागे मुडपून आकाशाकडे पाहा.
  12. सर्व शरीराला ताण देऊन अंतिम स्थितीत या.
  13. श्वास सोडून पूर्वस्थितीत या.
  14. पाय सरळ करा.
  15. बाहू बाजूला समांतर ठेवून आराम घ्या.
  16. 2/3 सेकंद हे आसन करा.
  17. आसनाचा वेळ हळूहळू वाढवा.
  18. हे आसन 2/3 वेळा करा.

धनुरासन करताना सावधगिरी

धुकधुकी, रक्तदाब आणि हार्निया असणाऱ्या व्यक्तींनी हे आसन करू नये.

धनुरासन चे फायदे मराठी

  1. भुजंगासन आणि शलभासन या आसनास धनुरासन हे पूरक आसन आहे. यामुळे दोन्ही आसनांचे लाभ प्राप्त होतात.
  2. पाठ, पाठीचा कणा, कंबर, पोट, छाती, फुफ्फुस आणि बाहू या अवयवांना पुरेसा व्यायाम मिळून ते सशक्त होण्यास या आसनाची मदत होते.
  3. या आसनाने भूक वाढते. पोटातील वायू बाहेर पडतो.
  4. लठ्ठपणा कमी होण्यास या आसनाची मदत होते. छाती रुंद व आकर्षक बनते.

धनुरासन विडिओ मराठी

अजून वाचा:

Leave a Reply