दूरचित्रवाणीचे फायदे निबंध मराठी – Durchitravani Che Fayde in Marathi

आज आपल्या देशात दूरचित्रवाणी अतिशय लोकप्रिय झाली आहे. श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना दूरचित्रवाणीने वेड लावले आहे. म्हणून दूरचित्रवाणीचे फायदे-तोटे तपासले पाहिजेत.

दूरचित्रवाणीचे खूप तोटे आहेत. दूरचित्रवाणीमुळे लोक त्या संचासमोर तासन्तास बसून राहतात. मुलांचा अभ्यास बुडतो. मोठ्या माणसांची कामे अडून राहतात. मुले खेळायला जात नाहीत. लोक मित्रांकडे, नातेवाईकांकडे जाणे टाळतात, लोक आळशी बनतात. मात्र, दूरचित्रवाणीचे फायदेही आहेत.

दूरचित्रवाणीमुळे जगातील निरनिराळे प्रदेश घरबसल्या पाहायला मिळतात. जगातल्या घटना कळतात. थोर लोकांची भाषणे ऐकायला मिळतात. ‘रामायण’ व ‘महाभारत’ यांसारख्या मालिकांमधून प्राचीन काळाचे दर्शन घडते. ‘पोलिओ’चा डोस देणे, ‘झाडे लावा, झाडे वाचवा’ यांसारख्या उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवता येते. शैक्षणिक दृष्टीने तर दूरचित्रवाणी फार मोठे कार्य करते.

आपण दूरचित्रवाणीचा तारतम्याने उपयोग केला पाहिजे. तरच आपला फायदा होणार आहे.

दूरचित्रवाणीचे फायदे निबंध मराठी – Durchitravani Che Fayde in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply