एक रम्य सकाळ निबंध मराठी – Ek Ramya Sakal Nibandh

गेल्या वर्षीचा प्रसंग आहे. पावसाळ्याचे दिवस होते. आम्ही गावी गेलो होतो. एकदा सकाळी आईबाबा आणि मी फिरायला निघालो. त्या वेळचे दृश्य अजूनही मला आठवते.

संपूर्ण डोंगरावर हिरवळ पसरली होती. सगळीकडे हिरवा रंग पसरला होता. डोंगरावरून शुभ्र धबधबे कोसळत होते. नदी शांतपणे वाहत होती. नदीत काठावरील झाडांचे प्रतिबिंब दिसत होते. झाडांवर पक्ष्यांचा किलबिलाट चालू होता. काही पक्षी आकाशाकडे झेपावत होते. शेतकरी गुरांना रानात नेत होते.

आईने आम्हांला नदीच्या पाण्यात पाहायला सांगितले. पाण्यात आकाशाचे प्रतिबिंब होते. हळूहळू आकाशात नारिंगी रंग दिसू लागला. थोड्याच वेळात सूर्य उगवताना दिसू लागला. आम्ही तो नदीच्या पाण्यात पाहत होतो. असा सूर्योदय मी कधीच पाहिला नव्हता. ती सकाळ मी कधीच विसरणार नाही.

पुढे वाचा:

This Post Has One Comment

  1. Umaima

    Thank you so much for the essay on ek ramay sakad…🌿🌿

Leave a Reply