माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी
माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी

माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी

शाळा असते म्हणून सुट्टी आवडते. शाळाच नसती आणि नुसतीच सुट्टी असती तर कंटाळाच आला असता. वार्षिक परीक्षेचा अभ्यास केल्यावर, परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर जी मोठी सुट्टी मिळते तीच खरी सुट्टी होय. अशी सुट्टी आम्हा मुलांना दर वर्षी उन्हाळ्यात मिळते.

सुट्टी लागली की सुरूवातीचे काही दिवस मी अगदी आरामात घालवतो. मला शाळा नसते, अभ्यास नसतो की कसलेच काम नसते. त्यामुळे मी घड्याळाकडे न पाहाता हवे तेव्हा उठतो. रात्री जागून संगणकावर खेळ खेळतो. आंघोळ वेळेवर करीत नाही. दोनचार दिवस आई सगळे लाड चालवून घेते पण नंतर तिच्या रागाचा पारा वाढू लागतो. तेव्हा मला निदान आंघोळ तरी वेळेवर करणे भाग पडते.

ह्या वर्षी मात्र माझी उन्हाळ्याची सुट्टी खूपच चांगल्या ठिकाणी गेली. त्याचे असे झाले की माझा अरूणकाका लष्करात मेजर आहे. त्याची नेमणूक ह्या वर्षी अरूणाचल प्रदेश येथे झाली आहे. त्याने आम्हा सर्व पुतणेकंपनीला त्याच्याकडे बोलावले होते. त्यामुळे आम्ही सहा मुले आणि सोबत आमचे बाबा असे अरूणाचल प्रदेश येथे उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलो.

अरूणाचल प्रदेश हे तिबेटच्या सीमेवरील राज्य असल्यामुळे तिकडला शत्रू आहे चीन. ह्या प्रदेशावर चीन नेहमीच दावा सांगत आलेला आहे. परंतु अरूणाचल- वासीयांना मात्र आपल्या भारतीयत्वाचा अभिमान आहे. तिबेटी संस्कृतीला गिळंकृत केले तसे चीन आपल्याही संस्कृतीला गिळंकृत करील अशी त्यांना भीती वाटते. परंतु त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही कारण भारताचे लष्कर त्यांना तोडीस तोड उत्तर द्यायला समर्थ आहे.

अरूणाचल प्रदेशात एवढी थंडी होती म्हणून सांगू? त्यामुळे आम्हाला उकाडा अजिबातच वाटला नाही. तवांग येथे तर भरपूर गरम कपडे घालूनच बसावे लागत होते. अरूणाचलचे सृष्टीसौंदर्य अगदी पाहाण्यासारखे आहे. तिथे आम्ही ऑर्किडच्या फुलांचे प्रदर्शन पाहिले. हे सीमावर्ती राज्य लष्करी अंमलाखाली असल्याने इथे मुद्दामच मोठे रस्ते बांधले नाहीत, त्यामुळे शत्रू अधिक वेगाने आत येऊ शकत नाही. रस्ते लहान असल्यामुळे जीपपेक्षा मोठ्या वाहनाने प्रवास करता येत नाही. अरूणकाकाने आम्हाला नथुला पास येथे नेले. तिथे भारतीय चौकी आहे. पलीकडे चिनी सैन्याचे ठाणे आहे. काकाच्या ओळखीमुळे आम्हाला चिनी सैनिकांशी हस्तांदोलन करायला मिळाले.

तिथे मी चांगला महिनाभर दिवस राहिलो त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी कशी गेली ते कळलेच नाही.

माझी उन्हाळ्याची सुट्टी निबंध मराठी

पुढे वाचा:

Leave a Reply