Set 1: आमच्या शाळेतील ग्रंथालय निबंध मराठी – Essay On Library in Marathi
आमच्या शाळेतील ग्रंथालय मला खूप आवडते. तिथे पुस्तकांचा खजिनाच आहे. तिथे गेले की मला कुठले पुस्तक घेऊ आणि कुठले नको असे होऊन जाते. लहान मुलांचे खेळण्यांच्या दुकानात गेल्यावर जसे होते तसे होते अगदी माझे.
आमच्या शाळेच्या ग्रंथालयात शिरल्यावर सर्वप्रथम सरस्वतीची मूर्ती दिसते. सरस्वतीसमोर छान उदबत्त्या लावलेल्या असतात. त्यांच्या सुवासामुळे प्रसन्न वाटते. ग्रंथालयात साधारणपणे २००० पुस्तके आहेत. त्याशिवाय मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, मासिकेसुद्धा नियमितपणे घेतली जातात. आमच्या वेळापत्रकानुसार आठवड्यातील एक तास ग्रंथालयाचा असतो. त्या दिवशी ग्रंथपाल केळकरबाई आम्हाला वेगवेगळी पुस्तके वाचायला देतात. ग्रंथालयात आम्हा विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाके आहेत. पुस्तकांसाठी काचेची सत्तरऐशी कपाटे आहेत. सगळीकडे पंखे आहेत. भरपूर खिडक्या आहेत. अशा सोयींमुळे ग्रंथालय मोकळे, हवेशीर बनले आहे.
शाळेच्या वेळात ग्रंथालय उघडे असते. परीक्षेच्या काळात रात्री नऊ वाजेपर्यंत ते उघडे असते. तेव्हा विद्यार्थी ग्रंथालयात बसून अधिक काळ अभ्यास करू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याला एका वेळी दोन पुस्तके दिली जातात. पुस्तकाचे पंधरा दिवसांनी पुन्हा नूतनीकरण करून घेता येते.
ग्रंथालयात शांतता पाळण्याचा नियम आहे. कोणतेही वृत्तपत्र अथवा मासिक वाचून झाल्यावर ते जागेवर ठेवलेच पाहिजे असा दंडक आहे. क्रमिक पुस्तकांच्या जास्त प्रती असल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. वार्षिक परीक्षेत पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवणा-या मुलांना पाठ्यपुस्तके विनामूल्य दिली जातात.
आमच्या ग्रंथालयात वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके आहेत. ही सर्व पुस्तके विषयवार लावून कपाटात ठेवतात. परीक्षेच्या दिवसात रविवारीही ग्रंथालय उघडे ठेवतात. मधूनमधून आमचे मुख्याध्यापक ग्रंथालयाची पाहाणी करण्यास येत असतात.
आमच्या ग्रंथपाल केळकरबाईंना मदत करण्यासाठी रामचंद्र नावाचा सहाय्यक आहे. ते दोघे आमच्याशी आपुलकीने वागतात. मला वाचनाची आवड आहे हे लक्षात आल्यामुळे केळकरबाई माझ्यासाठी चांगली पुस्तके बाजूला काढून ठेवतात. असे आहे आमच्या शाळेचे ग्रंथालय.
Set 2: आमच्या शाळेतील ग्रंथालय निबंध मराठी – Essay On Library in Marathi
ग्रंथ + आलय = ग्रंथालय. आलय म्हणजे घर ग्रंथालय म्हणजे ग्रंथाचे घर, ज्यात निरनिराळ्या विषयांवरील ग्रंथांचा संग्रह असतो.
प्रत्येक शाळेत एक ग्रंथालय असते. आमच्या शाळेच्या ग्रंथालयात अंदाजे ५००० पुस्तके आहेत. इथे मराठी, हिंदी, इंग्रजी वृत्तपत्रे येतात. साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, पण नियमितपणे येतात. आठवड्यातून एक तास ग्रंथालयाचा असतो. त्या दिवशी ग्रंथपाल शिक्षिका आम्हाला वाचावयास पुस्तके देतात. ग्रंथालयात दहा खुा, आठ बाके, व काही टेबलं आहेत. खुर्ध्या शिक्षकांसाठी आणि बाके विद्यार्थ्यांसाठी आहेत. पुस्तके ठेवण्यासाठी ९०-९५ कपाटे आहेत. सगळीकडे पंखे लावलेले आहेत. भरपूर खिडक्या आहेत. अशा सर्व सोयींमुळे ग्रंथालय हवेशीर बनले आहे.
“शाळेच्या वेळात ग्रंथालय उघडे असते. परीक्षेच्या दिवसांत फेब्रुवारी, मार्च महिन्यात रात्री १० वाजेपर्यंत ग्रंथालय चालू असते. त्यामुळे विद्यार्थी बराच वेळ तिथे बसून अभ्यास करू शकतात. इथे प्रत्येक विद्यार्थ्याला एका वेळी दोन पुस्तके मिळतात. १५ दिवसांनंतर तीच पुस्तके नवीनीकरण झाल्यावर पुन्हा मिळू शकतात.
ग्रंथालयात ठिकठिकाणी शांतता पाळा, आपापसांत बोलू, नका अशा प्रकारच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. कोणतेही वृत्तपत्र वा मासिक वाचून झाल्यावर प्रत्येकाने ते पुन्हा जागच्या जागी ठेवणे अनिवार्य आहे. क्रमिक पुस्तकांच्या जास्त प्रती असल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. वार्षिक परीक्षेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास पाठ्यपुस्तके विनामूल्य दिली जातात. काही प्रती मागास विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात.
आमच्या ग्रंथालयात वेगवेगळया विषयांवरील पुस्तके आहेत. ही सर्व पुस्तके क्रमाने लावून मोठमोठ्या कपाटां-मध्ये ठेवलेली असतात. मोठी मुले लायब्ररीत बसून अभ्यास करु शकतात. परिक्षांच्या दिवसांत रविवारीही ग्रंथालय उघडे असते. आमचे मुख्याध्यापक अनेकदा ग्रंथालयाची पहाणी करण्यासाठी येतात.
ग्रंथालयात ग्रंथपालास मदत करण्यासाठी एक सहायक ग्रंथपाल आहेत. ते आमच्याशी आपुलकीने वागतात. मला आमच्या ग्रंथालयाचा अभिमान आहे. ग्रंथालयात दरवर्षी नव्या पुस्तकांची खरेदी केली जाते. असे उत्तम ग्रंथालय असल्याने आम्हाला वेगवेगळया विषयांवरील पुस्तके वाचायला मिळतात. मला वाचनाची आवड निर्माण झाली ती आमच्या या ग्रंथालयामुळेच.
Set 3: आमच्या शाळेतील ग्रंथालय निबंध मराठी – Essay On Library in Marathi
पुस्तकाचे महत्त्व सर्वांना माहीत आहे. ग्रंथालयासारखी महत्त्वपूर्ण गोष्ट जगात दुसरीकडे नसेल. पुस्तकाच्या रूपात तिथे ज्ञानाचे भांडार असते. हे ज्ञान प्राप्त करून आपण महान शास्त्रज्ञ, कलाकार, राजकारणी आदी बनू शकतो. पुस्तके आपली सर्वात जास्त जवळचे मित्र आहेत. पुस्तकाच्या संगतीने अज्ञानाचा अंधार दूर होतो.
एखादं ग्रंथालय सार्वजनीक, वैयक्तीक तसेच खाजगी पण असू शकतं. इथे सदस्यत्त्वाची नोंद करून पुस्तकांना घरी घेऊन जाता येऊ शकतं. पुस्तकाशिवाय तिथे अनेक प्रकारचे दैनिके, मासिके, आदी पण असतात. आपल्या देशात अनेक प्राचीन आणि प्रसिद्ध ग्रंथालय आहेत. परंतु असे असले तरी त्यांची संख्या अपुरीच आहे. गाव आणि वाड्या तांड्यावर ती नसल्यासारखीच आहेत. आपल्याला चालत्या फिरत्या ग्रंथालयाची अंत्यत आवश्यकता आहे. साक्षरता वाढविण्यासाठी त्याची फार मदत मिळते.
शाळा-कॉलेज आणि विद्यापीठात ग्रंथालय निश्चितच असते. ग्रंथालयाशिवाय शिक्षण संस्थाची कल्पनाच आपण करू शकत नाही. एखाद्या देशाची प्रगती त्या देशात असणाऱ्या ग्रंथालयावरून लावल्या जावू शकते. जितके जास्त ग्रंथालय असतील, देशाने तितकेच प्रगती
केलेली असेल.
पुढे वाचा:
- आमच्या गावची जत्रा मराठी निबंध
- आमच्या गावचा बाजार निबंध मराठी
- आमचे पशुमित्र निबंध मराठी
- आपले सामाजिक कर्तव्य निबंध मराठी
- आपले शेजारी देश निबंध मराठी
- (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिन माहिती
- माझा देश निबंध मराठी
- स्वातंत्र्य दिन मराठी निबंध
- आदर्श विद्यार्थी मराठी निबंध
- आदर्श नागरिक मराठी निबंध
- आत्महत्या सुटकेचा अनैतिक मार्ग निबंध मराठी
- आणि झाडे गप्प झाली निबंध मराठी
- आठवड्यामध्ये रविवार नसता तर निबंध मराठी
- आजकालचे लग्नसमारंभ निबंध मराठी
- आकाश दर्शन निबंध मराठी