Set 1: घड्याळ नसते तर मराठी निबंध – Ghadyal Naste Tar Nibandh Marathi

शाळेची प्रार्थनेची वेळ ? तासाचे वेळ ? कोणत्या वेळेला चाचणी परीक्षा, किती वेळ एका विषयासाठी…? बाबांची ऑफीसची वेळ ? विमानाची वेळ ? सगळाच गोंधळ झाला असता का ? शहरात सिग्नलची वेळ कळली नसती तर सर्व वहाने एकमेकांवर दणादण आपटली असती. प्लॅटफॉर्मवर रेल्वे गाड्या वेळेवर कशा आल्या असत्या ? अहो पण हा सगळा गोंधळ जर घड्याळे नसती तर झाला असता.

आज लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या हातात घड्याळे. घरात, स्टेशनवर, विमानतळावर वेगवेगळ्या आकाराची घड्याळे असतात. त्याच्या वेळेनुसारच सर्व कामे सुरळीतपणे पार पडतात. पण जर हीच घड्याळे नसती तर चाकाप्रमाणे फिरणारे माणसाचे हे जग दगडाप्रमाणे स्थिर, निर्जीव झाले असते. डॉक्टरांपासून वैज्ञानिकांपर्यंत ते सामान्य मजूरालाही आपले काम करण्यासाठी वेळेची गरज असते आणि ही वेळ कळते ती घड्याळांपासून “

मग सांगा बरे जर घड्याळे नसती तर काय झाले असते?

Set 2: घड्याळ नसते तर मराठी निबंध – Ghadyal Naste Tar Nibandh Marathi

‘घडयाळबाबा भिंतीवर बसतात दिवसभर टिक्टिक करतात ठण ठण् ठोके देतात आणि म्हणतात सहा वाजले आता उठा’ खरंच घडयाळासाठी आपण कि आपल्यासाठी घडयाळ हेच कळत नाही इतके आपले जीवन घडयाळाशी बांधले गेलेले आहे. मनुष्यजन्मात घडयाळाला अनन्यसाधारण महत्व आहे. बाळ जन्मल्याबरोबर टयाहा ऽऽ असा आवाज ऐकताच आधी घडयाळात पाहिले जाते म्हणजे बाळ कोणत्या मुहूर्तावर जन्मले याची शास्त्रीबुवांकडून कुंडली काढायची असते. जन्मल्यापासून ते निवृत्तीपर्यंत घडयाळाशी निगडीत असे. जीवन घडयाळाच्या काटयाबरोबर बांधलेले असते.

विदयार्थीदशेत घडयाळ पाहूनच अभ्यास, खेळ यांची दैनंदिनी बनवली जाते. घडयाळ पाहून शाळेत येणे, जाणे, नाष्टा करणे, जेवणे एवढेच नव्हे तर भूक लागली नसेल तरीही ‘अरे घडयाळात नऊ वाजले तुझी जेवायची वेळ झाली असा आईच्या तोंडाचा गजर कानी पडतो. त्यामुळे खेळता-खेळता किंवा हातातील कामे टाकून ताटावर येवून बसावे लागते.

मूल शाळेत जावू लागले की अभ्यासापेक्षा त्याला आधी जाणीव होते ती वेळेची जी घडयाळातून कळते. ‘अरे बाळा, ऊठ सकाळचे सात वाजले, लवकर आवर, नाही तर आठची बस चूकेल’ त्यापासून ते थेट नोकरीला जावू लागले तरी मस्टर वाचविण्यासाठी ८-१२ ची लोकल चुकवून चालणार नाही. संध्याकाळी सातच्या ठोक्याला घरात पोहोचणारे पतीदेव आज सात वाजून पाच मिनिटे झाले तरी अजून आले नाहीत म्हणून तणावग्रस्त स्थितीत सैरभैर होणारी पत्नी पतीची वाट पाहत दारातच बसून राहील.

घडयाळात अचूक वेळ सांगितली तरी गंमत करताना, खेळताना टोल वाजले किंवा साखरझोपेत असताना गजर वाजला तर घडयाळाचा खूप राग येतो. काही तापट लोकतर हातातील घडयाळ फेकूनही देतात. त्यामुळे त्यांचेच नुकसान होते. पण वेळ थांबवता येत नाही हेच खरे.

असे हे अचूक वेळ सांगणारे घडयाळच नसते तर ! कल्पनाच करवत नाही. कारण घडयाळ नसेल तर उठल्यापासून म्हणजे झोपून उठलोच तर रात्री झोपेपर्यंत वेळेचे सर्व गणित चूकेल. घडयाळ नाही तर उठायचे कधी, शाळेत जायचे-यायचे कधी हे काहीच समजणार नाही. घडयाळ नसल्याने मारकुटे मास्तर तासाची वेळ संपवून वर्गातून बाहेर पडण्याचीही शक्यता नसणार, त्यामुळे त्यांचा मार जास्त वेळ सहन करावा लागणार.

आई सकाळी शाळेसाठी सात वाजता उठवण्याऐवजी वेळ न कळून पहाटे सहालाच उठवू शकते त्यामुळे थंडीने कुडकुडतच सर्व तयारी करावी लागणार. रात्री झोपायला वेळापत्रक नसणार त्यामुळे खूप वेळ झोपायची किंवा लोळायची मजा घेता येणार नाही. घडयाळच नाही तर प्रत्येक तासानंतर शिपाई घंटा कशी वाजवणार. घंटाच नाही तर एक शिक्षक वर्गाबाहेर जावून दुसरे शिक्षक वर्गात कधीही येणार ! त्यामुळे खेळाचा तास जास्त मजेत जाणार पण रटाळ गणिताचा तास जास्त वेळ सहन करावा लागणार. घडयाळच नसल्याने कार्यालयातही केव्हा जायचे व परत केव्हा यायचे काहीच कळणार नाही. घडयाळ नाही त्यामुळे रॅडो, टायटन, यासारख्या कंपन्या दुसरी उत्पादने सुरु करणार प्रत्येकाच्या मनगटावर घडयाळाऐवजी दुसरे काही तरी बांधलेले आढळेल जे वेळ सांगण्याऐवजी सौंदर्य वाढविण्यास मदत करेल.

घडयाळच नसेल तर मित्रमैत्रीणी किंवा कार्यालयीन व्यक्तीनां भेटीच्या वेळा कशा ठरवणार ? उशीरा किंवा लवकर पोहोचल्याने दुसऱ्याची वाट पाहण्यातच जास्त वेळ लागणार. घडयाळच नसेल तर वेळेचे गुलाम न बनता ‘खाओ, पिओ ऐश करो’ असेच केले तरी रोजच्या त्याच त्याच गोष्टी करण्याचा उबग येईल. लोकांमध्ये शिस्त किंवा नियमावली राहणार नाही. त्यामुळे सगळीकडे अंदाधुंदी माजेल, एस्. टी., रेल्वे, विमानसेवा यांना परिपत्रक नसल्याने अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होईल. अशाने आळशी लोकांना आनंद होईल पण कष्ट करणाऱ्यांना अशा गोष्टींचा त्रास होईल. सगळीकडे आळशीपणाचेच वातावरण राहिल.

त्यामुळे अशा बेधुंद जगात राहण्यापेक्षा वेळेचे भान दाखविणारे दोन हातांचे हे घडयाळ माणसाला माणसाप्रमाणे, माणूसकीने जगायला शिकवते. पशुपेक्षा मानवजीवन वेगळे आहे याची जाणीव करून देते आणि घडयाळ, म्हणजेच वेळ पाहून काम करायला शिकवते.

घड्याळ नसते तर मराठी निबंध – Ghadyal Naste Tar Nibandh Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply