गरज सरो वैद्य मरो निबंध मराठी – Ggaraj Saro ni Vaidya Maro in Marathi

प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारची गरज लागते. ज्याला कशाचीही गरज लागत नाही असा माणूस मिळणे विरळाच ! पण ज्यांनी आपली गरज भागवली, त्यांना विसरणे हा तर शुद्ध कृतघ्नपणा आहे. काही लोक असे असतात की एखाद्या माणसाजवळ गरज असेपर्यंत ओळख ठेवतात. गरज सरली की ती ओळख सोयीस्करपणे विसरतात.

बऱ्याचवेळा गरजू व्यक्तींना मदत मागायला गेलेल्या व्यक्तींकडून नको ते बोलून घ्यावे लागते. म्हणूनच गरजवंताला अक्कल नसते असे उपरोधाने म्हटले जाते. ज्याची गरज काढली आहे; तोच कृतघ्नपणाने वागू लागला तर ? आजकाल कृतज्ञ माणसांपेक्षा कृतघ्न माणसे अधिक आहेत. असे बोलले जाते ते त्या कृतघ्न माणसांच्या प्रवृत्तीमुळेच ! ज्यांनी आपली गरज काढली आहे अशा व्यक्तींच्याबाबत आदर हवा, नम्रता हवी.

माणसाच्या ठिकाणी असलेली कृतघ्नपणाची भावना नष्ट होण्यासाठी सद्विचारांची जोपासना केली पाहिजे. संकटकाळी आपल्याला जे उपयोगी पडतात त्यांच्याबद्दल नेहमीच आदराची भावना निर्माण झाली पाहिजे. अशी भावना निर्माण होणे हे कृतज्ञपणाचे लक्षण आहे.

गरज सरो वैद्य मरो

पुढे वाचा:

Leave a Reply