कन्हाळगाव अभयारण्य
कन्हाळगाव अभयारण्य

राज्यातील 50 वे अभयारण्य कन्हाळगाव – Kanhalgaon Abhayaranya Information in Marathi

चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव परिसरास अभयारण्य घोषित करण्यात आले. हे महाराष्ट्रातील 50 वे अभयारण्य आहे. कन्हाळगावचे एकूण अभयारण्य क्षेत्र हे 269 चौरस किलोमीटर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुक्यात या अभयारण्याचे क्षेत्र येते.

याच दरम्यान म्हणजे 4 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या 16 व्या बैठकीत राज्यातील 10 नवीन संवर्धन राखीव क्षेत्र जाहीर करण्यात आले. एकाच वेळी अभयारण्य व दहा संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. पश्चिम घाटातील नऊ तर विदर्भातील दोन अशी एकूण अकरा राखीव संवर्धन क्षेत्र पुढीलप्रमाणे :

  1. आंबोली डोडा मार्ग (सिंधुदूर्ग)
  2. चंदगड (कोल्हापूर)
  3. आजरा-भुदरगड (कोल्हापूर)
  4. गगनबावडा (कोल्हापूर)
  5. पन्हाळगड (कोल्हापूर)
  6. विशालगड (कोल्हापूर)
  7. जोरजांभळी (सातारा)
  8. मायनी (सातारा)
  9. महेंद्री (अमरावती)
  10. मुनिया (नागपूर)
  11. तिलारी (कोल्हापूर)

राज्यात सध्या एकूण 17 संवर्धन राखीव क्षेत्रे आहेत. उर्वरित यापूर्वी मान्यता मिळालेले सहा राखीव क्षेत्र पुढीलप्रमाणे –

  1. बोरखडा (नाशिक) – 2008
  2. कोलामार्का (गडचिरोली) – 2013
  3. मुक्ताई भवानी (जळगाव-धुळे) 2014
  4. मामदापूर (नाशिक) – 2014
  5. तोरणमाळ (नंदूरबार) – 2016
  6. अंजनेरी (नाशिक) – 2017

संवर्धन राखीव क्षेत्रामध्ये वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत संरक्षित होतात. कन्हाळगावचे जंगल आधीपासूनच अतिशय प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांनी या क्षेत्राला ‘शूटिंग ब्लॉक’ म्हणून घोषित केले होते. या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाघ आहेत. कन्हाळगावचे जंगल हे वाघांच्या प्रजननासाठी उपयुक्त आहे. ताडोबातून येथे वाघीण प्रजननासाठी येतात. हा भाग ताडोब्याच्या दक्षिणेकडे मोडतो. कन्हाळगावच्या पश्चिमेस टिकेश्वर अभयारण्य आहे. या अभयारण्यामुळे ताडोबातील वाघांचा भ्रमणमार्ग अधिक सुकर होणार आहे.

कन्हाळगाव अभयारण्य माहिती-Kanhalgaon Abhayaranya Information in Marathi
कन्हाळगाव अभयारण्य माहिती, Kanhalgaon Abhayaranya Information in Marathi

पुढे वाचा:

प्रश्न १. कन्हाळगाव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे

उत्तर- चंद्रपूर

प्रश्न २. कन्हाळगाव अभयारण्य कोठे आहे

उत्तर- चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव परिसरास अभयारण्य घोषित करण्यात आले. हे महाराष्ट्रातील 50 वे अभयारण्य आहे.

कोरडा खोकला का येतो | Korda Khokla Ka Yeto

रात्री खोकला का येतो | Ratri Khokla Ka Yeto

सर्दी खोकला घरगुती उपाय | Sardi Khokla Gharguti Upay

खोकला घरगुती उपाय मराठी | Khokla Gharguti Upay in Marathi

खोकला किती दिवस राहतो | Khokla Kiti Divas Rahato

लहान मुलांना ताप किती असावा? | Lahan Mulancha Tap Kiti Asava

भारतीय संविधानात किती कलमे आहेत 2024?

शिवाजी महाराज किती वर्षे जगले?

गरोदर आहे हे किती दिवसात कळते?

घेवडा लागवड माहिती | Ghevda Lagwad Mahiti

Leave a Reply