नवीन संसद भवन माहिती : 10 डिसेंबर 2020 रोजी नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाचे भूमीपूजन केले. देशाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी (अमृत महोत्सवी वर्ष) नव्या संसद भवनातून दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरु केले जाणार आहे. या इमारतीचे बांधकाम 2022 सालापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन, संसद भवन, नॉर्थ ब्लॉक, साऊथ ब्लॉक, इंडिया गेट व इतर अभिलेखागार कार्यालये ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रास संयुक्तपणे सेंटल विस्टा असे म्हणतात. नवीन संसदेची इमारत बांधण्यासंबंधी प्रकल्प म्हणजे सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट होय.

नवीन संसद भवन
नवीन संसद भवन

नवीन संसद भवन माहिती – New Parliament House Information in Marathi

नवीन संसद भवन वैशिष्ट्ये

 • नवीन इमारत त्रिकोणाकृती असेल.
 • टाटा प्रोजेक्टस् लिमिटेड द्वारे इमारत बांधणी केली जाणार आहे. एचसीपी डिझाईन आणि प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रा.लि. ने त्याचे डिझाइन तयार केले आहे.
 • चार मजली इमारत असणार आहे.
 • लोकसभेत खासदारासाठी सुमारे 888 आणि राज्यसभा खासदारासाठी सुमारे 326 पेक्षा जास्त सीट्स असणार आहेत. पार्लमेंट हॉलमध्ये एकूण 1 हजार 224 सदस्य एकाच वेळी बसू शकतील अशी क्षमता असेल. भविष्यात दोन्ही सभागृहांची वाढीव संख्या लक्षात ठेवून असे करण्यात आले आहे.
 • क्षेत्रफळ 64 हजार 500 चौरस मीटर असणार आहे. 16 हजार 921 चौ.मी. अंडरगाऊंड असेल.
 • 971 कोटी खर्च बांधकामावर होण्याचा अंदाज आहे.
 • केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग ही संसदेची नवीन इमारत बांधण्यासाठीची नोडल एजन्सी असेल.
 • भारताचा लोकशाही वारसा प्रदर्शित करण्यासाठी ‘संविधान सभागृह’, संसद सदस्यासाठी लाऊंज सभागृह, ग्रंथालय, अनेक समित्यांच्या खोल्या, भोजनगृहे या इमारतीत राहणार असून वाहने उभे करण्यासाठी पुरेशी जागाही ठेवण्यात येणार आहे.
 • हे नवीन भवन आत्मनिर्भर भारताचे उदाहरण असेल ते पूर्णपणे भारतीय नागरिक तयार करतील.
नवीन संसद भवन माहिती-new parliament house information in marathi
नवीन संसद भवन माहिती

सध्याचे संसद भवन

 • पायाभरणी : 12 फेब्रुवारी 1921, द ड्यूक ऑफ कॅनॉट
 • बांधकाम पूर्ण : 1927
 • खर्च : 83 लाख रुपये
 • उद्घाटन : 18 जानेवारी 1927, लॉर्ड आयर्विन
 • आकार : वर्तुळाकार
 • आसनक्षमता : लोकसभा – 552, राज्यसभा – 250
 • क्षेत्र : 6 एकर

पुढे वाचा:

कोरडा खोकला का येतो | Korda Khokla Ka Yeto

रात्री खोकला का येतो | Ratri Khokla Ka Yeto

सर्दी खोकला घरगुती उपाय | Sardi Khokla Gharguti Upay

खोकला घरगुती उपाय मराठी | Khokla Gharguti Upay in Marathi

खोकला किती दिवस राहतो | Khokla Kiti Divas Rahato

लहान मुलांना ताप किती असावा? | Lahan Mulancha Tap Kiti Asava

भारतीय संविधानात किती कलमे आहेत 2024?

शिवाजी महाराज किती वर्षे जगले?

गरोदर आहे हे किती दिवसात कळते?

घेवडा लागवड माहिती | Ghevda Lagwad Mahiti

Leave a Reply