प्रदर्शनाचे वर्णन मराठी निबंध

आमच्या शहरात दरवर्षी अनेक प्रदर्शने भरतात. यावर्षी गांधी मैदानात वार्षीक प्रदर्शन भरल्यावर मी ते पहायला गेलो. पाहून मला खूप मजा वाटली. सामान्य ज्ञानात भर पडली. आणि खूप चांगलं वाटलं. हे या ठिकाणचे सर्वात मोठे प्रदर्शन होते. हे प्रदर्शन दरवर्षी नेहरूजींच्या जन्मदिनानिमित्त भरवले जाते आणि दहा दिवस चालतं. माझ्यासोबत माझा वरूण नावाचा मित्र पण होता.

तिकिट (प्रवेशिका) घेऊन आम्ही आत गेलो. सगळीकडे मोठीच गर्दी आणि झगमगाट होता, लोकांची गर्दी पडली होती. सगळीकडे रंगी-बेरंगी उजेड, झालरी, झेंडे, फुले आणि फुगे यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. स्टॉल्स आणि दुकाने खूप लागली होती. सर्व प्रकारच्या सामानांचा ढीग पडला होता. भांडे, कपडे, खेळणे, पुस्तके, मशीन, विजेचं सामान, खाण्या-पिण्याचे पदार्थ. सगळं काही तिथं होतं. सर्व दुकानावर चिक्कार गर्दी होती. ग्राहक आपल्या पसंतीनुसार वस्तू विकत घेत होते. काही वस्तूवर आकर्षक सवलत होती. एका कोपऱ्यात आपली औद्योगीक प्रगती दर्शवणारं दुकान होतं. तर दुसऱ्या कोपऱ्यात कुटीर उद्योगाच्या वस्तू.

खादी ग्रामोद्योगाच्या दुकानात चांगलीच गर्दी होती. स्त्री-पुरूष, मुले, वृद्ध सगळेजण तिथे होते. परंतु स्त्रीयांची संख्या जास्त दिसत होती. मनोरंजनाचे अनेक साधने तिथे होते. मोठ-मोठाले झुले, मॅजिक शोज, सिनेमा शोज, संगीताचे कार्यक्रम, कठपुतली नृत्य, लोकनृत्य, आदी लोकांचे मनोरंजन करीत होते. आम्ही संपूर्ण प्रदर्शन पाहून घेतलं. काही वस्तू देखील विकत घेतल्या आणि चहापणी घेतलं, ज्यावेळी आमची पाय दुःखायला लागल्यावर आम्ही प्रदर्शनाचा निरोप घेतला हसत-हसत.

प्रदर्शनास/आनंद नगरीस भेट मराठी निबंध

मी एक छोट्या गावात रहाते. या सुटीत मी व माझी आई पुण्याला माझ्या काकांकडे गेलो होतो. सुटीचे दिवस असल्याने शहरात अनेक कार्यक्रमांची रेलचेल होती. एके दिवशी माझ्या काकूनी एका प्रदर्शनास जाण्याचा बेत ठरविला. त्याप्रमाणे काकू, माझी आई मोव माझेदोन भाऊ असे आम्ही सर्वजण दुपारी प्रदर्शनास जाण्यास निघालो. आम्ही तेथे रिक्शाने गेलो. एका मोठ्या मैदानावर भव्य मंडप घातलेला होता. बाहेर तिकीटासाठी मोठी रांग लागली होती. पार्किंगवर शेकडो गाड्या उभ्या होत्या. आम्ही तिकीटे घेतलोव आत शिरले.

आत अनेक वस्तूंचे मोठमोठे स्टॉल लागलेले होते. प्रदर्शन खूप मोठे होते. सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने होती. यात घरगुती यंत्रे, टिव्ही, संगणक, प्रिंटर, व्हॅक्यूम क्लिनर, ओव्हन, टेलीफोन यांची रेलचेल होती. सर्वकंपन्यांची उत्पादने व त्यांच्या किमती पहाता आल्या. आईला नवीन मिक्सर घ्यायचा होता त्यामुळे आम्ही सर्व कंपन्यांचे मिक्सर बघितले व त्यापैकी सर्वांना आवडलेला मिक्सर निवडला. त्यानंतर आम्ही कपड्यांच्या दुकानांच्या दालनात आलो. येथे सर्व प्रकारचे कापड, तयार कपडे, चादरी, रजया, गालीचे यांची दुकाने होती. देशाच्या निरनिराळ्या भागातुन आलेले हे कापड व त्यावरील कलाकुसर पाहून काय घ्यावे ते सुचेना. शेवटी काकूने दोन चादरी व काही लहान-लहान वस्तू खरेदी केल्या. आईने एक रेशमी साडी घेतली. या विभागाच्या बाजूलाच दागिन्यांची दुकाने होती. मी तेथून लाखेच्या बांगड्या घेतल्या.

त्यानंतरचा विभाग होता खेळण्यांचा. माझ्या दोन्ही भावांना येथे जाण्याची खूप उत्सुकता होती. तेथील विविध प्रकारची खेळणी पाहून त्यांना खूप आनंद झाला. मग आम्ही वरीच खेळणी विकत घेतली. खेळण्यातील गाड्या, बंदुका, काही बौद्धिक खेळ यांसारख्या वस्तू खरेदी केल्या.

प्रदर्शनात गेले २-३ तास फिरुन आम्ही सर्व जण खूप थकलो होतो. म्हणून प्रदर्शना जवळच असलेल्या खाद्यपदार्थ विभागात आम्ही गेलो. तेथे आम्ही भेळ, समोसा. कचोरी आइसक्रीम या पदार्थांचा आस्वाद घेतला. तेथे आम्हाला कळले को प्रदर्शनातील एका विभागात रेल्वे विभागाचे स्टॉल लागलेले आहेत. याठिकाणी रेल्वेची संपूर्ण माहिती, इतिहास व वेगवेगळ्या काळातील इंजीने ठेवलेली होती. वाफेवर चालणारे इंजीन पाहून खूप मजा वाटली. एकूणच हा विभाग मनोरंजन व माहितीप्रद होता. अशा त-हेने आम्ही प्रदर्शन

पाहून बाहेर पडलो तेव्हा रात्र झाली होती. आम्ही परत रिक्शाने घरी आलो. गावी परत गेल्यावर मी माझ्या सर्व मैत्रिणींना या प्रदर्शनाबद्दल वर्णन केले.

पुढे वाचा:

Leave a Reply