शास्त्रीय पद्धत म्हणजे काय: शालेय पाठ्यपुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रांची ओळख झालेली आहे. कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यांवर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणे, हे या सर्व शास्त्रांचे वैशिष्ट्य असते. प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात.

शास्त्रीय पद्धत म्हणजे काय-Shastriya Padarth Mhanje Kay
शास्त्रीय पद्धत म्हणजे काय-Shastriya Padarth Mhanje Kay

शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? – Shastriya Padarth Mhanje Kay

शास्त्रीय पद्धत म्हणजे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी पुरावे आवश्यक असतात, म्हणजे प्रत्येक पुरावा विश्वासार्ह आहे कि नाही हे पहिले जाते. म्हणजेच प्रत्येक पुरावा हा विविध कसोटींवर तपासून तो विश्वास ठेवण्यायोग्य आहे कि नाही ते ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात.

शास्त्रीय पद्धती ही अशी तंत्रे आहेत जी प्रयोगशाळेच्या पद्धतींची मूलभूत तत्त्वे आहेत. ही रासायनिक विश्लेषणाची पारंपारिक पद्धत आहे जी आजपर्यंत शास्त्रज्ञ वापरत आहेत. शास्त्रीय पद्धत दोन पद्धतींमध्ये विभागली आहे: विश्लेषणाची गुणात्मक आणि परिमाणात्मक पद्धत.

शास्त्रीय पद्धतीचे फायदे

शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. उदा.,पर्यावरणशास्त्र. पर्यावरणशास्त्र ज्याप्रमाणे पर्यावरणाची हानी, प्रदूषण यांसारखे प्रश्न आणि त्यांवरचे उपाय यांचा अभ्यास करते, त्याप्रमाणे प्रत्येक शास्त्र आपापल्या विषयांचा अभ्यास करते. इतिहास भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो.

आपल्या जन्मापासूनच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. असे असले, तरी आजीआजोबा, आईवडील इत्यादी माणसे आपल्या लहानपणच्या गमतीच्या गोष्टी सांगत असतात. त्या गोष्टी त्यांच्या आठवणीत असतात. एकाच गोष्टीची आठवण वेगवेगळ्या व्यक्ती सांगतात, तेव्हा त्यांच्या सांगण्यात थोडाफार फरक असू शकतो. अशा वेळेस नेमके बरोबर कोणते असा प्रश्न आपल्याला पडतो. नेमके बरोबर कोणते हे ठरवण्यासाठी, सांगितल्या गेलेल्या गोष्टींची बारकाईने तपासणी करावी लागते.

भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसते. त्यामुळे इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे. असे असले, तरी त्यातील पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो. त्यासाठी आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते. हे सर्व विचारात घेऊन इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते. इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही.

प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी, कोरीव लेख, ताम्रपट, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा-कहाण्या, लोकगीते इत्यादींना ‘इतिहासाची साधने’ असे म्हणतात. या साधनांचे भौतिक, लिखित आणि मौखिक असे तीन प्रकार असतात. भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले, याचा शोध घेण्यासाठी या साधनांमधून मिळणाऱ्या पुराव्यांच्या खरेखोटेपणाची कसून तपासणी केली जाते. कसोटीला उतरलेल्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. ही शास्त्रीय पद्धत होय.

सारांश

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? – Itihasachi Shastriya Padhat Mhanje Kay बद्दल जाणून घेतली. जर तुम्हाला ही शास्त्रीय पद्धत म्हणजे काय? बद्दल माहिती मराठीत आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

पुढे वाचा:

Leave a Reply